Jump to content

करण संजय देवतळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करण संजय देवतळे
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1995 संपादन

करण संजय देवतळे (१९९५ - ) [] हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हे २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षातर्फे वरोरा मतदारसंघातून १५व्या विधानसभेवर निवडून गेले.

देवतळे हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवासी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले संजय वामनराव देवतळे यांचे पुत्र आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथून बीई सिव्हिल पदवी मिळवली आणि नंतर २०२१ मध्ये गडचिरोली येथील गोधवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या चंद्रपूर येथील श्रीमती लीना केशोर मामिडवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथून एमबीए केले. []

देवतळे कुटुंब भारतीय जनता पक्षात येण्यापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. करण देवतळेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेतले आणि २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करीत वरोरा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी ६५,१७० मते मिळवली आणि त्याचे जवळचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार मुकेश मनोज जिवतोड यांचा १५,४५० मतांनी पराभव केला. [] [] []

संदर्भ

[संपादन]
  1. "Karan Sanjay Deotale(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- WARORA(CHANDRAPUR) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-12-05 रोजी पाहिले.
  2. "Karan Sanjay Deotale(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- WARORA(CHANDRAPUR) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-12-05 रोजी पाहिले."Karan Sanjay Deotale(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- WARORA(CHANDRAPUR) - Affidavit Information of Candidate". myneta.info. Retrieved 5 December 2024.
  3. "Karan Sanjay Deotale, BJP Election Results LIVE: Latest Updates On Karan Sanjay Deotale, Assembly Election Constituency Seat". ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2024-12-05 रोजी पाहिले.
  4. "Warora, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Karan Sanjay Deotale wins Warora with 65170 votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-05 रोजी पाहिले.
  5. "Warora (Maharashtra) Assembly Election Results 2024 Live: Winner, Runner-up, Candidates List". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-05 रोजी पाहिले.