Jump to content

करडई तेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करडई या वनस्पतीच्या बीयांपासून केलेल्या तेलास करडईचे तेल म्हणतात. हे एक खाद्यतेल आहे. हे तेल रंगहिन असते तसेच हा तेलास कोणत्याही प्रकारचा गंध नसतो. या तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधने तसेच खाद्यतेल म्हणून करतात.मार्गारिन बनविण्यातही या तेलाचा वापर होतो.

करडईचे दोन प्रकार आहेत, ज्यापासून करडई तेल बनते.एका प्रकारचे तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स(ओलेईक ॲसिड) हे जास्त प्रमाणात असते तर दुसऱ्या प्रकारात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड(लिनोलेईक ॲसिड) असते.सध्या बाजारात पहिल्या प्रकारातील खाद्यतेल असते . यातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण ऑलिव्ह ऑईल पेक्षा कमी असते. दुसऱ्या प्रकाराचा वापर हा लिन्सिड ऑईल ऐवजी पेंटिंगमध्ये करण्यात येतो.पांढऱ्या पेंटमध्ये याचा वापर जास्त करतात कारण याला लिन्सिड ऑईल वापरल्यामुळे येणारी पिवळी झाक येत नाही.