Jump to content

कमल सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराज कमल बहादूर सिंह

कार्यकाळ
५ एप्रिल १९५७  २ एप्रिल १९६२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील अनंत प्रसाद शर्मा
मतदारसंघ बक्सर
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ५ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ उत्तर-पश्चिम शाहबाद

जन्म २९ सप्टेंबर १९२६
डुमराव, भोजपूर जिल्हा, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता डुमराव, भोजपूर जिल्हा, बिहार, भारत)
मृत्यू ५ जानेवारी २०२० (वय : 93)
डुमराव, भोजपूर जिल्हा, बिहार, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अपक्ष
पत्नी उषा राणी (घटस्फोट), नंतर फणिंद्र राज्यलक्ष्मी
अपत्ये २ पुत्र आणि १ कन्या
गुरुकुल कर्नल ब्राऊन केंब्रिज विद्यालय, डेहराडून
डी.ए.व्ही. महाविद्यालय, डेहराडून
पाटणा विधी महाविद्यालय, पाटणा
अलाहाबाद विद्यापीठ
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

महाराज कमल बहादूर सिंह (२९ सप्टेंबर १९२६ — ५ जानेवारी २०२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. कमल बहादूर सिंह हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून बिहार राज्याच्या उत्तर-पश्चिम शाहबाद मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच बक्सर मतदारसंघातून २ऱ्या लोकसभेचे सदस्य होते.

कमल बहादूर हे डुमराव संस्थानचे शेवटचे राजे होते. तसेच ५ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या निधनासमयी ते १ल्या लोकसभेचे एकमात्र हयात खासदार होते. त्यांच्या निधनानंतर १ल्या लोकसभेचे एकही खासदार आता हयात नाहीत.