कमल कुंभार
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |

कमल कुंभार ह्या एक भारतीय सामाजिक उद्योजिका, तथा क्रमागत उद्योजिका आहेत. कुंभार ह्या कमल पोल्ट्री आणि एकता प्रोड्यूसर कंपनीच्या संस्थापिका आहेत.
प्रारंभिक आयुष्य
[संपादन]कुंभार यांचा जन्म उस्मानाबाद, महाराष्ट्र येथे एका सर्वसामान्य रोजंदार मजुराच्या पोटी झाला. त्यांचे बालपण गरिबीत तसेच अपुऱ्या शिक्षणाचे गेले. त्यांचे लग्न लहानपणीच लावल्या गेले. ीसेच त्यांचा संसार देखील तुटला.आयामुळे त्यांची परिस्थिती र्थिकदृष्ट्या कअजून मकुवत झाली.
कारकिर्द
[संपादन]कुंभार या महिला बचत गटांमध्ये सहभागी झाल्या. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी ५०० रुपयाच्या गुंतवणुकीतून बांगड्या विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. पुढे अवघ्या दोन वर्षांनंतर, त्यांच्याकडे महाराष्ट्रातील महिला महासंघाचे नेतृत्व आले.
कुंभार यांनी १९९८ मध्ये व्यवसाय तसेच विपणनाचे (मार्केटिंगचे) कोणतेही ज्ञान नसताना, २००० रुपयांच्या गुंतवणुकीसह कमल पोल्ट्री आणि एकता प्रोड्यूसर नावाची कंपनी सुरू केली. सदरील कंपनीचा व्यापार दरमहा सुमारे १ लाख रुपयांचा होऊ लागला तपुढेत कुंभार यांनी महाराष्ट्रातील ५,००० हून अधिक महिलांना अशा प्रकारे विविध उद्योग सुरू करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केले. [१]
२०१२ मध्ये, त्या स्वच्छ ऊर्जा उद्योजक बनल्या आणि एसएसपीच्या "स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमातील महिला" मध्ये "ऊर्जा सखी" म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी ३००० हून अधिक घरांमध्ये सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा व्यापार केला. सदरील स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाने महाराष्ट्र आणि बिहारमधील ११०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले. सध्या त्या समानांतर सहा व्यवसाय करतात ज्यामुळे तिला "क्रमगत उद्योजक" अशी उपाधी मिळाली आहे. त्यांच्याकडे शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय आहेत. [२] [३]
पुरस्कार
[संपादन]- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सीआयआय फाउंडेशनचा महिला आदर्श पुरस्कार.
- संयुक्त राष्ट्रसंघ आणि नीती आयोगाने आयोजित केलेला महिला परिवर्तनकारी भारत पुरस्कार, २०१७. [४]
- २०२२ साली नारी शक्ती पुरस्कार मिळाला. [५]
संदर्भ
[संपादन]- ^ "citation for receiving award". Twitter (इंग्रजी भाषेत). 2022-03-09 रोजी पाहिले.
- ^ "Serial entrepreneur: Her ventures have enabled 3,000 women in the drought-prone region of Osmanabad to be financially independent". 18 March 2018.
- ^ https://www.sspindia.org/wp-content/uploads/2017/09/Profile-of-Kamal-Kumbhar-Serial-Entrepreneur.pdf [मृत दुवा]
- ^ "Women Transforming India 2017". United Nations India. 2022-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-03-11 रोजी पाहिले.
- ^ "'I Started With Rs 10 & Built 6 Ventures': Woman Helps 5000 Others Start Micro Biz". thebetterindia.com. 2025-03-11 रोजी पाहिले.