कमलेश भडकमकर
कमलेश भडकमकर हे एक संवादिनी वादक आहेत.
जीवन व कारकीर्द
[संपादन]कमलेश भडकमकर यांचा जन्म महाराष्ट्र राज्याच्या राजधानी मुंबई येथील दादर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.त्यांचे बालपण खांडके बिल्डिंग येथील एका चाळीत गेले. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून कमलेश यांनी पेटी शिकावयास सुरुवात केली.किंग जॉर्ज शाळेत शिकत असताना ते प्रत्येक वर्षी संगीत क्षेत्रातील प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असत.चेतना कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांनी कॉलेजच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन ऐलोमा पैलोमा या नाटकाच्या संगीताची जबाबदारी पार पाडली.तेव्हा त्यांना संगीतासाठी पहिले बक्षीस मिळाले होते.नंतर त्यांनी रुपारेल कॉलेज मध्ये असताना पद्मा वाडकर यांच्या यारा सिलिसिली गाण्यासाठी साथ दिली होती. त्यांचे संगीतातील शिक्षण खालील संगीतकाराकडे झाले.
त्यांनी खालील दिग्गज संगीतकारांबरोबर सहाय्यक, संगीत संयोजक,वादकांसाठी नोटेशन इत्यादी अनेक कामे केली.
त्यांना दूरदर्शनवरील ताकधीनाधीन या कार्यक्रमासाठी शीर्षक गीत करण्याची संधी मिळाली.त्या कार्यक्रमाच्या २५० व्या भागासाठी भारतरत्नलता मंगेशकर आल्या होत्या आणि त्या संपूर्ण चार तास थांबल्या होत्या आणि त्यांनी कौतुक केले होते.नंतर त्यांना झी मराठी वरील सा रे ग म प कार्यक्रमात संवादिनी वादक म्हणून प्रसिद्धी मिळाली.[१]
संदर्भ यादी
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स,मुंबई टाईम्स,बुधवार,३१ डिसेंबर २०२५