कमला दास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Kamala das


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


(३१ मार्च १९३४ - ३१ मे २००९) कमला दास म्हणजे एक अत्यंत विमनस्क कवयित्री , लेखिका. कमला दास यांचा जन्म १९३४ केरळमधील राजघराण्यात झाला. माध्वीकुट्टी या टोपण नावाने कमला दास ओळखल्या जात .

व्यतिगत जीवन[संपादन]

वडील कलकत्यातील एका विश्वविख्यात कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. आई बालमणी अम्मा, या लेखिका. त्यामुळे लहानपणामुळेच साहित्याची आवड निर्माण झाली. कलकत्यातील एका मिशनरी शाळेत त्याचं शिक्षण झाले. तिथले जात-धर्माबद्दलचे अनुभव फार दु:खदायक होते. वयाच्या १५ वर्षीच त्यांचं लग्न लावून दिल. त्यांचे पती माधव दास बँकेत वरिष्ठ अधिकारी होते. माधव  दास यांनीच त्यानं लिखाणासाठी प्रोसाहित केले . कमला दास यांनी इंग्रजी आणि मल्याळम भाषेतून लिखाण करण्यास सुरवात केली . एका इंग्रजी वृत्तपत्रात त्याच्याबद्दल म्हंटल होतं, 'दि मदर ऑफ मॉडर्ण इंग्लिश इंडियन पोएट्री'- भारतातील आधुनिक इंग्रजी काव्याची जननी !'

आत्मचरित्र[संपादन]

इ.स. १९७२ मध्ये माय स्टोरी (एन्टेकथा) हे आत्मचरित्र प्रसिध्द झालं. प्रसिध्द झाल्या झाल्याच ते अपरंपार, सर्वाधिक लोकप्रिय झालं तेवढच वादग्रस्तही ठरलं. पंधरा दिवसांतच पन्नास हजार प्रती खपल्या. या आत्मचरित्रात स्त्रीच्या लैगिक भावनाचा उद्रेक, आशा, अपेक्षा यांच्यावरभार दिलेला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी "माय स्टोरी " हे आत्मचरित्र लिहिले . मूलतः हे आत्मचरित्र मल्याळम भाषेतून  " इंटे कथा "  या नावाने प्रसिद्ध झाले . नंतर ते "माय स्टोरी " या मथळ्याखाली इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाले. नंतर त्यांनी आत्मचरित्राचा बराचसा भाग काल्पनिक असल्याचे सांगितले.

कथासंग्रह[संपादन]

 • पद्यावती : दि हार्लेट अँँण्ड अदर स्टोरीज
 • दि केप्ट वूमन
 • चाइल्डहूड ऑफ मलबार
 • अ डॉल फॉर चाइल्ड प्राँँस्टिटयूट
 • बचपन कि यादे
 • अमावसी

कवितासंग्रह[संपादन]

 • दि ओल्ड प्ले हाउस
 • दि डीसेंडन्टस
 • समर इन कलकत्ता
 • या अल्ला
 • क्लोजर - सम पोएम्स अँँण्ड ए कॉन्व्हर्सेशन
 • ओन्ली दि सोल नोज हाऊ टू सिंग

संदर्भ[संपादन]