कमर डागर
Indian calligrapher | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
कमर डागर ह्या एक भारतीय सुलेखनकार आहेत. त्या कलामकारी क्रिएटिव्ह कॅलिग्राफी ट्रस्टच्या संस्थापक आहेत. २०१६ मध्ये, डागर यांना महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभिक आयुष्य
[संपादन]डागर यांचा जन्म नवी दिल्ली येथे शास्त्रीय ध्रुपद संगीतकारांच्या कुटुंबात झाला. [१] [२] त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली. [२] सुलेखनकार हसन मसूदी आणि मोहम्मद एल्बाज हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. [२]
कारकिर्द
[संपादन]डागर ह्या एक व्यावसायिक सुलेखनकार आहेत. त्या आपल्या कामात अमूर्त चित्रमय सुलेखन शैलीचा वापर करतात.[३] सीएनबीसी टीव्ही १८ ने त्यांना भारतातील "सर्वात प्रसिद्ध चित्रमय सुलेखनकार" म्हटले.[४]
डागर यांचे एकल प्रदर्शन भारत, फ्रान्स आणि अमेरिका आदी देशांमध्ये झाले आहेत.[५][६] २०१९ मध्ये, त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात एका समूह प्रदर्शनात भाग घेतला होता.[२][७]
कॅलिग्राफीच्या स्वतःच्या व्यावसायिक वापराव्यतिरिक्त, त्या आपली संस्था, 'कलामकारी क्रिएटिव्ह कॅलिग्राफी ट्रस्ट' च्या माध्यमातून भारतातील कलाप्रकार जतन करण्याचे काम करत असतात.[३][१] कलाकारांना आपले काम लोकांसोबत शेअर करण्यासाठी आणि कॅलिग्राफीची कला जिवंत ठेवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डागर यांनी या ट्रस्टची स्थापना केली आहे.[१] डागर यांनी आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी महोत्सवांचे आयोजन देखील केले होते. [२] त्यांच्या कॅलिग्राफी कार्यशाळा भारतातील पर्यटकांसाठी सांस्कृतिक आकर्षण ठरल्या आहेत. यामुळे त्यांना माध्यमांनी चांगली प्रसिद्धी मिळवून दिली आहे.[४][८][९] स्कूल्झ द्वारे आयोजित केलेल्या सेलिब्रिटी कार्यक्रमात सूत्रसंचालक श्रीमती निधी कुमार यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी मुलांना कॅलिग्राफीबद्दल माहिती दिली.[१०]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]२०१६ मध्ये, तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी डागर यांना महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला. [११] [१२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c Parvez, Subuhi (2012-03-01). "Calligraphy: Reviving the dying art". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
- ^ a b c d e Banerjee, Sudeshna (2019-03-24). "Different strokes". The Asian Age. 2020-05-15 रोजी पाहिले.
- ^ a b Jones, Vivien; Pokharel, Sugam (2020-04-01). "Qamar Dagar, the woman fighting to keep India's calligraphy culture alive". CNN Travel (इंग्रजी भाषेत). 2020-04-02 रोजी पाहिले.
- ^ a b "Art: Learning calligraphy with Qamar Dagar". CNBC TV18 (इंग्रजी भाषेत). 9 August 2019. 2020-04-02 रोजी पाहिले.
- ^ Raghib, Qazi M. (2018-05-16). "Qamar Dagar: Combining spirituality with calligraphy". National Herald (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
- ^ "Youngsters bring alive art of calligraphy". Business Standard (इंग्रजी भाषेत). 2014-05-12. 2020-05-16 रोजी पाहिले.
- ^ Varghese, Shiny (2019-02-12). "Telling Strokes: An exhibition honours Mahatma Gandhi through handmade paper and calligraphy". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
- ^ "23 exclusive experiences at India's top hotels". Condé Nast Traveller India (इंग्रजी भाषेत). 2019-06-26. 2020-05-16 रोजी पाहिले.
- ^ Hill, Bee (8 March 2018). "A Mindful Guide To Visiting India". Nylon (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
- ^ "Fish Tank-CALLIGRAPHY". Skoolz.in. Skoolz. 4 September 2022 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Awardees- Ms. Qamar Dagar, Delhi | Ministry of Women & Child Development | GoI". Ministry of Women and Child Development. 2020-04-02 रोजी पाहिले.
- ^ "आधुनिक भारत में लड़का-लड़की में भेदभाव की कोई जगह नहीं: राष्ट्रपति". Amar Ujala. 2017-03-09. 2020-05-16 रोजी पाहिले.