Jump to content

कण्ठ्य व्यंजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कण्ठ्य व्यंजने अशी व्यंजने आहेत जी जिभेच्या मागच्या भागाचा (जिव्हापृष्ठ) मृदू टाळूवर, म्हणजेच टाळूच्या मागच्या भागावर उच्चार केले जातात.

कारण तोंडाच्या छताचा तालव्य प्रदेश तुलनेने विस्तृत आहे आणि पाठीच्या हालचाली फारशा अचूक नसल्यामुळे, कण्ठ्य व्यंजनांमध्ये सहजपणे आत्मसातीकरण होते, ज्यामुळे लगतच्या स्वरांच्या गुणधर्मानुसार त्यांचा उच्चार मागे किंवा पुढे सरकतो. याला संस्कृतमध्ये शब्दांच्या सीमेवर केले तर सन्धि म्हणतात. [] ते अनेकदा आपोआप पुढे येतात, म्हणजेच पुढील अग्र स्वराच्या आधी अंशतः किंवा पूर्णपणे तालव्य होतात, आणि मागे जातात, म्हणजेच पश्च स्वरांच्या आधी अंशतः किंवा पूर्णपणे अलिजिह्वीय होतात.

तालव्यीकृत कण्ठ्य (मराठीतले /k/ कीमा किंवा कीड मध्ये सारखे) यांना कधीकधी तालव्यकण्ठ्य व्यंजने म्हटले जाते. अनेक भाषांमध्ये ओष्ठ्यकृत कण्ठ्य व्यंजने देखील असतात, जसे की [kʷ]. या व्यंजनामधीळ ओठांच्या गोलाकार होण्यासोबत उच्चार केला जातो. तसेच ओष्ठ्यतालव्य व्यंजने देखील असतात. यांचा उच्चार टाळू व ओठांवर दुहेरी होतो, जसे की [k͡p]. [w] हा अन्तस्थ व्यंजन असल्यामुळे हा भेद नाहीसा होतो, कारण ओष्ठ्यीकरणामध्ये ध्वनीमध्ये ओष्ठ्य्य समीपस्थ उच्चारणाची भर घातली जाते आणि या परिस्थितीला अनेकदा ओष्ठ्यकण्ठ्य म्हटले जाते.

अंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक संघटनानुसार कण्ठ्य कंपन किंवा ताडित शक्य नाही. कण्ठ्य स्थितीत, कंपन किंवा ताडितशी संबंधित प्रकारची हालचाल करण्यासाठी जिभेची क्षमता अतिशय मर्यादित असते आणि कण्ठ्य कंपन किंवा ताडित तयार करण्यासाठी जिभेच्या मुख्य भागाला पुरेशा वेगाने हालचाल करण्याचे शक्यता नसते. []

उदाहरणे

[संपादन]

आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेनुसार ओळखले जाणारे काही कण्ठ्य व्यंजने खालीलप्रमाणे आहेत:

आयपीए व्याख्या उदाहरण
भाषा लिपी आयपीए अर्थ
ŋ̊ अघोष कण्ठ्य अनुनासिक बर्मी[] ငှါး/ङा [ŋ̊á] 'कर्ज घेणे'
ŋ घोष कण्ठ्य अनुनासिक इंग्रजी ring/रिं [ɹʷɪŋ] 'अंगठी'
k अघोष कण्ठ्य स्पर्श मराठी का [käm] 'काम'
ɡ घोष कण्ठ्य स्पर्श मराठी [gɐʈ] 'गट'
k͜x अघोष कण्ठ्य संघर्षी कोरियन /किउडा [k͜xɯ̽da] 'मोठे'
ɡ͡ɣ घोष कण्ठ्य संघर्षी इंग्रजी[a] good/गूड ɡ͡ɣʊˑd̥] 'चांगले'
x अघोष कण्ठ्य ऊष्मन जर्मन Bauch/बाउख़ [baʊx] 'उदर'
ɣ घोष कण्ठ्य ऊष्मन ग्रीक γάτα/ग़ाता ɣata] 'मांजर'
ɰ घोष कण्ठ्य अन्तस्थ आयरिश naoi/न्वु [n̪ˠɰiː] 'नव'
ʍ अघोष ओष्ठ्यकण्ठ्य अन्तस्थ इंग्रजी which/ह्वि[b] [ʍɪtʃ] 'कोणते'
w घोष ओष्ठ्यकण्ठ्य अन्तस्थ इंग्रजी witch/वि [wɪtʃ] 'चेटकीण'
k͜𝼄 अघोष कण्ठ्य पार्श्विक संघर्षी आर्ची[] лӀон/ƛon/प्लोन [k͜𝼄on] 'कळप'
ɡ͡ʟ̝ घोष कण्ठ्य पार्श्विक संघर्षी हिउ qē/क्व्ग्ली [kʷg​͡ʟɪ] 'डॉल्फिन'
𝼄 अघोष कण्ठ्य पार्श्विक ऊष्मन् वांगी[] /नोल [no𝼄˩] 'पाणी'
ʟ̝ घोष कण्ठ्य पार्श्विक ऊष्मन् आर्ची наӏлъдут [naˤʟ̝dut] 'नीळे'
ʟ घोष कण्ठ्य पार्श्विक अन्तस्थ वांगी aʟaʟe/आलाले [aʟaʟe] 'चक्कर'
ʟ̆ घोष कण्ठ्य पार्श्विक ताडिक मेल्पा  
कण्ठ्य बाह्यस्फोटक स्पर्श आर्ची кӀан [an] 'खालील'
k͜xʼ कण्ठ्य बाह्यस्फोटक संघर्षी हाद्जा dlaggwa [c͜𝼆ʼak͜xʷ’a] 'हळुवार उचलणे'
कण्ठ्य बाह्यस्फोटक ऊष्मन् ह्लिकीत áa [xʼáːxʼ]ⓘ 'सफरचंद'
k͜𝼄ʼ कण्ठ्य पार्श्विक बाह्यस्फोटक संघर्षी सांदावे tl’ungu [k͜𝼄ʼùŋɡȕ] 'आकाश'
ɠ̊ (ƙ) अघोष कण्ठ्य स्तंभिक रोधक उस्पान्तेक[] k'aam [ɠ̊aːm] 'दोरी'
ɠ घोष कण्ठ्य स्तंभिक रोधक सिंधी ڳرو/g̈əro [ɠəro] 'भारी'
ʞ कण्ठ्य मुक्त चुटत्कार वोलोफ (शब्दोतर संप्रेषण) [ʞ] (उपध्वनिक अलिजिह्व्यासह [ʞ᫢]) 'हो'

कण्ठ्य व्यंजनांचा अभाव

[संपादन]

ज्या भाषांमध्ये कण्ठ्य व्यंजने (आणि कोणतेही जिव्हापृष्ठीय व्यंजन) नाहीत अशा नोंदवलेल्या भाषांमध्ये शावांते, प्रमाण ताहिती (जरी /tVt/ चा उच्चार [kVt] असा होतो, जो हवाईयीच्या नीहाऊ बोलीतही आढळतो) आणि कदाचित अनेक स्कोऊ भाषांचा ( वुतुंग, वानिमोच्या डुमो बोलीत आणि बोबे ) असतो, ज्यांमध्ये कोडा(अंत्य व्यंजन) [ŋ] आहे. त्याचे विश्लेषण अनुनासिक स्वरांचे प्रकटीकरण म्हणून केले गेले आहे. पेरूची एक स्वतंत्र भाषेत ओमुरानोच्या कोणतेही कण्ठ्य व्यंजन सापाडले नाही. [] पिराहां भाषेत, पुरुषांमध्येच एकमेव कण्ठ्य व्यंजन नसते.

अघोष स्पर्श [k] सोडून इतर कोणतेही कण्ठ्य व्यंजन जास्तीप्रमाणे सामान्य नाही. /ɡ/ हा स्वनिम असू शकत नाही. मँडरिन चीनीसारख्या, ज्या भाषेत घोष स्पर्श व्यंजने नाहीत, [c] पण इतरत्र ते तुरळकपणे अनुपस्थित आहे. 'वर्ल्ड ॲटलास ऑफ लँग्वेज स्ट्रक्चर्स'मध्ये सर्वेक्षण केलेल्या भाषांपैकी, सु. फक्त १०% भाषांमध्ये, ज्यांच्यातील अन्यथा /p b t d k/ आहेत, त्यांच्यात /ɡ/ हा गहाळ आहे . []

कण्ठ्यपृष्ठ व्यंजने

[संपादन]

साधी कण्ठ्य व्यंजने पृष्ठकण्ठ्य असतात: जिभेचा पृष्ठभाग वर येऊन मृदू टाळूला स्पर्श करतो. विकृत वाणीमध्ये कण्ठ्यपृष्ठ स्पर्श व्यंजने देखील असतात, ज्यांचा उच्चार याच्या उलट असतो: कण्ठ्य खाली येऊन जिभेला स्पर्श करतो, जी स्थिर राहते. विकृत वाणीसाठीच्या आयपीएच्या विस्तारांमध्ये, कण्ठ्य व्यंजनासाठीचे आयपीए अक्षर उलट करून हे व्यंजन लिहिले जाते, उदा. [𝼃] अघोष कण्ठ्यपृष्ठ स्पर्शासाठी, [d] [𝼁] घोषा कण्ठ्यपृष्ठ स्पर्शासाठी, आणि [𝼇] अनुनासिकेसाठी.

extIPA वर्णन
𝼃 अघोष कण्ठ्यपृष्ठ स्पर्श
𝼁 सघोष कण्ठ्यपृष्ठ स्पर्श
𝼇 कण्ठ्यपृष्ठ अनुनासिक

ही पद्धत ऊष्मन् व्यंजने x आणि ɣ साठी लागू होणार नाही, जरी अधोगामी [𝼃̞], [𝼁᫛], व [𝼁̞] यांचा वापर अंतर भरण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  • कण्ठ्यीकरण
  • उच्चारणाचे स्थान
  • ध्वनिविज्ञान विषयांची यादी
  1. Stroud, Kevin (August 2013). "Episode 5: Centum, Satem and the Letter C | The History of English Podcast". The History of English Podcast. 24 August 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 January 2017 रोजी पाहिले.
  2. अंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमला
  3. Ladefoged & Maddieson (1996).
  4. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "Handout" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. Donald J. Phillips (1976). Wahgi Phonology and Morphology (PDF). B-36. Pacific Linguistics. p. 18.
  6. Bennett, Ryan; Harvey, Meg; Henderson, Robert; Méndez López, Tomás Alberto (September 2022). "The phonetics and phonology of Uspanteko (Mayan)". Language and Linguistics Compass (इंग्रजी भाषेत). 16 (9). doi:10.1111/lnc3.12467. ISSN 1749-818X.
  7. Empty citation (सहाय्य)
  8. दी वर्ल्ड ॲटलस ऑफ लॅंग्वेज स्ट्रक्चर्स
  1. स्काउस, कॉकनी, आणि रीसीव्ड उच्चाराच्या काही भाषिकांचे /ɡ/चे नैमित्तिक उपध्वनी
  2. dialectमधल्या बोलीभाषा ज्या which आणि witch या शब्दांमध्ये फरक असतो त्यांच्यात
  3. फीनयीनमध्ये ज्याला 'g' असे लिहिले आहे ते /k/ आहे, जरी त्याला [ɡ] असे अनाघात मात्रांमध्ये उपध्वनी आहे.
  4. The old letter for a back-released velar click, turned-k साचा:Angbr IPA, was used from 2008 to 2015.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.