Jump to content

कडलुंडी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
دریائے کادالنڈی; دریائے کادالنڈی; Sungai Kadalundi; ڪادالوندي ندي; Kadalundi River; Кадалунди; കടലുണ്ടിപ്പുഴ; Kadalundi River; کادالوندی چایی; कडलुंडी नदी; కదలుండి నది; نهر كادالوندى; Abhainn Kadalundi; Afon Kadalundi; कडलुंडी नदी; கடலுண்டி ஆறு; río de la India; ভারতের নদী; cours d'eau du Kerala, Inde; ભારતની નદી; river in India; Fluss in Indien; rio da Índia; river in India; भारतका नदी; rivero en Barato; נהר; نهر فى كيرالا; river in India; річка в Індії; rivier in India; river in India; भारत में नदी; భారతదేశంలోని కేరళ లో ప్రవహించే నాలుగు ప్రధాన నదులలో ఒకటి; abhainn san India; ভাৰতৰ নদী; نهر في الهند; انڊيا ۾ ندي يا درياهه; மலப்புறம் மாவட்டத்தில் பாயும் முக்கிய நதிகளில் ஒன்று; കടലുണ്ടി പുഴ; Kadalundi River; கடலுண்டிபுழா
कडलुंडी नदी 
river in India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानकेरळ, भारत
लांबी
  • १३० km
नदीचे मुख
Map११° ०७′ ००.१२″ N, ७५° ४९′ ००.१२″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

कडलुंडी नदी ही भारताच्या केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्हा आणि कोळिकोड जिल्ह्यातून वाहणाऱ्या चार प्रमुख नद्यांपैकी एक आहे. इतर तीन म्हणजे चालियार, भरतपुळा आणि तिरूर नदी ह्या आहेत.[] ही पावसाळी नदी १३० किलोमीटर (८१ मैल) लांब आणि म्हणून जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे.[] कडलुंडी नदी ही केरळमधील सहाव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. ती पंडिक्कड, मंजेरी, मलप्पुरम, पनाक्कड, परप्पपूर, वेंगारा, तिरुरंगडी, परप्पनगडी, वल्लीकुन्नू, वल्क्कुंडम या गावांमधून वाहत अरबी समुद्रात जाते.[] कडलुंडी नदी सायलेंट व्हॅलीच्या पश्चिम सीमेवर पश्चिम घाटातून उगम पावते आणि पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यातून वाहते.[] ओलिपुझा आणि वेलियार हे एकत्र विलीन होऊन मेलात्तूरजवळ कडलुंडी नदी बनते. [] कडलुंडी नदी एरनाड आणि वल्लुवनड या ऐतिहासिक प्रदेशांमधून जाते.[]

मुझिरिस नंतर चेर राजवंशाचे दुसरे सर्वात मोठे व्यापारी बंदर असलेले टिंडिस हे प्राचीन बंदर वल्लीकुन्नू येथील या नदीच्या मुखाशी ओळखले जाते.

कडलुंडी पक्षी अभयारण्य हे बेटांच्या समूहावर पसरलेले आहे जिथे कडलुंडी नदी अरबी समुद्रात वाहते.[] दरवर्षी येथे स्थानिक पक्ष्यांच्या शंभराहून अधिक प्रजाती आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या सुमारे ६० प्रजाती मोठ्या संख्येने आढळतात.[]

कडलुंडी नदीचे विहंगम दृश्य

संदर्भ

[संपादन]
  1. "Malappuram District Rivers". Malappuram.net. 13 October 2006 रोजी पाहिले.
  2. "Kerala Government - General Features". Official Website of Kerala Government. 2 November 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 October 2006 रोजी पाहिले.
  3. 1 2 3 4 5 "Rivers in Malappuram district". malappuram.nic.in. 23 November 2019 रोजी पाहिले.
  4. "Wild Life Tourism in Kerala". keralaeverything.com. 13 October 2006 रोजी पाहिले.