ककू नखाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


व्यक्तिगत जीवन[संपादन]

ककू यांना हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), डीएसपी फिनान्शिअल कन्सल्टंट्स, आणि सिटीबॅंक अशा तीन ठिकाणच्या नेमणुकांच्या ऑफर्स आल्या. यात त्यांनी “डीएसपी फिनान्शिअल कन्सल्टंट्स” याची निवड केली. कारण ही एक बुटिक इन्व्हेस्टमेंट बॅंकिंग फर्म होती. यात त्यांना वेगवेगळी क्षेत्र, वेगवेगळ्या कंपन्या, नवे ट्रेंड्स, व्हॅल्युएशन मेट्रिक्स या गोष्टी शिकायला मिळणार होत्या. १९८९ साली ककू डीएसपी मध्ये रुजू झाल्या. काही वर्षे या नोकरीत गेल्यानंतर न्यूयॉर्कमधल्या मेरील लिंचसाठी काम करण्याच्या संधीची ऑफर त्यांना फर्मनं दिली. वॉल स्ट्रीटवरची ही सर्वोत्तम फर्म होती. पण ककू यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी भारतातच राहायचा निर्णय घेतला. २००९ मध्ये बॅंक ऑफ अमेरिका आणि मेरील लिंच यांच्या विलिकरणानंतर त्यांना मोठी भूमिका दिली गेली आणि संयुक्त जागतिक बाजारपेठांच्या व्यवसायाची धुरा ककू यांकडे सोपवण्यात आली. २०१० मध्ये ककू यांना बॅंक ऑफ अमेरिका प्रेसिडेंट आणि कंट्री हेडच्या पदाची संधी मिळाली.

शिक्षण[संपादन]

ककू यांचे शिक्षण आर. ए. पोतदार कॉलेज ऑफ कॉमर्स. (मुंबई) सोबतच सी. ए. चा अभ्यास सुरु करून वडिलांच्या ऑफिस मध्ये पार्ट टाईम जॉब सुरु केला. काही काळानंतर सी. ए. अभ्यास सोडून व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेण्यासाठी नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) मध्ये दाखल झाल्या. NMIMS मध्ये त्या स्टॉक मार्केट बद्दल शिकल्या सोबतच प्रेझेंटेशन स्कील्सना वाव मिळाली.

संदर्भ[संपादन]