ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८९-९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९८९-९०
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १५ – १९ मार्च १९९०
संघनायक जॉन राइट ॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकाल न्यूझीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९९० मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यूझीलंडने १-० ने जिंकली. कसोटी सामन्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला. ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिका जिंकली.

याआधी नोव्हेंबर १९८९ मध्येच या दोन देशांनी ऑस्ट्रेलियात एक कसोटी खेळली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा दौरा केला. तिरंगी मालिकेनंतर हा कसोटी सामना खेळविण्यात आला. वेलिंग्टन मधील बेसिन रिझर्व या स्थळावर सामना झाला. न्यूझीलंडने एकमेव कसोटी सामना ९ गडी राखून जिंकत ट्रान्स-टास्मन चषक पुन्हा मिळवला.

कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी[संपादन]

वि
११० (४५.२ षटके)
पीटर टेलर २९ (७३)
रिचर्ड हॅडली ५/३९ (१६.२ षटके)
२०२ (१२१ षटके)
जॉन राइट ३६ (१४९)
टेरी आल्डरमन ४/४६ (२९ षटके)
२६९ (१०९.२ षटके)
पीटर टेलर ८७ (१५३)
जॉन ब्रेसवेल ६/८५ (३४.२ षटके)
१८१/१ (६३.४ षटके)
जॉन राइट ११७* (१९७)
ग्रेग कॅम्पबेल १/२३ (७ षटके)
न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: जॉन राइट (न्यूझीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.