ऑस्ट्रेलियाला देशांतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑस्ट्रेलिया मध्ये देशांतर करण्यासाठी दोन प्रकारे व्हिसा मिळू शकतो. एक मानवताधारीत (ह्युमनेटेरियन) गुणवत्ता आधारीत (स्किल बेस्ड). या व्हिसावर कायमचा राहण्याचा परवाना परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया (Permanenat Resisidency) मिळतो. आफ्रिकेतील अनेक देशांतून जसे सुदान, इथियोपियाश्रीलंका या ठिकाणांहून मानवताधारीत व्हिसावर अनेक लोक देशांतरीत झाले आहेत.

मात्र नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेण्यासाठी मुळ देशाचे नागरिकत्व सोडावे लागत नाही. जर मुळ देश दुहेरी नागरिकत्व मान्य करत असेल तर व्यक्ती दोन्ही देशांची नागरिक राहू शकते. जसे की पाकिस्तान.

ऑस्ट्रेलियाचे देशांतर कार्यालय (इंग्रजी:Immigration Office) गुणवत्ता आधारीत व्हिसाला प्राधान्य देते. भारतातून येणारे लोक मात्र मुख्यतः गुणवत्ता आधारीत (इंग्रजी: Skill Based) व्हिसावर येतात. हा व्हिसा मिळवण्यासाठी व्यक्तीचे अनुभव ऑस्ट्रेलियातील व्यवसाय गरजेनुसार निर्धारीत केलेल्या श्रेणीतले असणे गरजेचे आहे. शासन ही यादी गरजेनुसार बदलत असते. देशांतर करण्यासाठी व अधिक ताज्या माहीतीसाठी हा बाह्यदुवा पहा शासकीय माहिती हा दुवा शासकीय असल्याने येथे दिली जाणारी माहिती विश्वसनिय आहे. तसेच ही माहिती वारंवार ताजी केली जाते.

ऑस्ट्रेलियाला देशांतर करण्या आधी आय. इ. एल. टी. एस. (IELTS) ही इंग्लिश भाषाची परिक्षा ५.५ या गुणवत्तेने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परिक्षा फक्त दोन वर्षेच अधिकृत असते. दोन वर्षा आधी दिलेली परिक्षा ग्राह्य धरली जात नाही. अधिक माहिती ब्रिटिश काऊंसील लायब्ररी मध्ये मिळेल. बाह्यदुवा आय. इ. एल. टी. एस. तसेच या संकेतस्थळावरही मिळेल.

देशांतराचे अर्ज देण्यासाठी कामाचे अनुभव पत्रे मिळवणे गरजेचे आहे. या अनुभव पत्रात कामाचे स्वरूप त्याचे बारकावे लिहिणे आवश्यक आहे. (हे व्यक्तीगत पत्र नाही/नसावे त्यामुळे या पत्रात व्यक्ती म्हणून पात्रता, जसे विश्वसनियता आदी, याचा उल्लेख करण्या ऐवजी कामाच्या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे!) सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर साधारणपणे ५५ आठवड्यात परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया (Permanent Resident) हा व्हिसा मिळतो. असा व्हिसा असल्यावर नोकरी मिळवणे सोपे जाते.

ऑस्ट्रेलियाला फिरायला येण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पर्यटन हे पान पहा.