Jump to content

ऑस्ट्रियाची ॲन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रियाची ॲन
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वस्पेन, फ्रान्स, पोर्तुगालचे राजतंत्र संपादन
स्थानिक भाषेतील नावAna de Austria संपादन
जन्म-नावAna María Mauricia de Austria y Austria-Estiria संपादन
लग्नानंतरचे नावAnne de France संपादन
दिलेले नावAna, María, Mauricia संपादन
उत्कृष्ट पदवीInfante of Spain, Queen Consort of France, Prince of Portugal संपादन
जन्म तारीख२२ सप्टेंबर 1601 संपादन
जन्मस्थानवायादोलिद संपादन
मृत्यू तारीख२० जानेवारी 1666 संपादन
मृत्यूस्थानपॅरिस संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणस्तनाचा कर्करोग संपादन
चिरविश्रांतीस्थानBasilica of Saint-Denis संपादन
वडीलफिलिप तिसरा, स्पेन संपादन
आईMargaret of Austria, Queen of Spain संपादन
वैवाहिक जोडीदारतेरावा लुई, फ्रान्स संपादन
अपत्यचौदावा लुई, फ्रान्स, Philippe I, Duke of Orléans संपादन
कुटुंबSpanish House of Habsburg, हाब्सबुर्ग राजघराणे संपादन
GodparentRanuccio I Farnese, Catalina de la Cerda संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषास्पॅनिश भाषा संपादन
व्यवसायराणी संपादन
पदgovernor of Brittany संपादन
धर्मकॅथलिक चर्च संपादन
Depicted byPortrait of Anne of Austria संपादन

ऑस्ट्रियाची ॲन (मूळ नाव:आना मारिया मॉरिसिया; फ्रेंच: ॲन दॉत्रिच; स्पॅनिश: आना दि ऑस्त्रिया; २२ सप्टेंबर, १६०१ २० जानेवारी, १६६६:पॅरिस, फ्रांस) ही १६१५ ते १६४३ पर्यंत फ्रांसची राणी होती. तिचा विवाह राजा लुई तेरावा यांच्याशी झाला होता. १६२० तिच्या पतीच्या मृत्यूनंतर १६५१ पर्यंत तिने आपल्या अल्पवयीन मुलगा लुई चौदावा याच्या नावाने राज्यकारभार चालवला.

वयाच्या अकराव्या वर्षी अ‍ॅनचा फ्रांसचा राजा लुई तेरावा याच्याशी लग्न ठरले. [] या वेळी तिच्या वडिलांनी तिला हुंड्यात ५,००,००० क्राउन आणि अनेक सुंदर दागिने दिले. [] [] लुई तेराव्याची तब्येत नाजुक असल्याने स्पॅनिश दरबाराने या लग्नासाठी अट घातली की जर लुई अकाली मरण पावला तर अ‍ॅन तिचा हुंडा, दागिने आणि कपडे घेऊन स्पेनला परत येईल. [] लग्नापूर्वी अ‍ॅनने ऑस्ट्रियाच्या राज्यावरील स्वतःचा आणि लुई पासून होणाऱ्या तिच्या वंशजांचे सर्व वारसाहक्क सोडून दिले परंतु अशी तरतूद केली गेली की जर ती निपुत्रिक विधवा राहिली तर तिला तिचे हक्क परत मिळतील. १८ ऑक्टोबर १६१५ रोजी लुई आणि अ‍ॅन यांचे बर्गोसमध्ये दूरस्थ लग्न लागले. त्याच सुमारास लुईची बहीण फ्रांसची एलिझाबेथ आणि अ‍ॅनचा भाऊ स्पेनचा चौथा फिलिप यांचे लग्न बोर्दूमध्ये असेच दूरस्थ लग्न लागले. [] हे विवाह फ्रान्स आणि स्पेनमधील लष्करी आणि राजकीय संबंध दृढ करण्याच्या परंपरेतील होते. अशा विवाहांची परंपरा १५५९ मध्ये स्पेनचा फिलिप दुसरा आणि व्हालवाची एलिझाबेथ यांच्या लग्नाने सुरू झाली होती. अ‍ॅन आणि एलिझाबेथची देवाणघेवाण स्पेन आणि फ्रांसच्या मधील एक बेटावर झाली. [] ती तिच्या तारुण्यात सुंदर होती. [] [] ती उत्तमप्रकारे घोडेस्वार देखील होती. तिचा मुलगा चौदाव्या लुईला तिने हा वारसा दिला होता. लग्नाआधी व नंतरही अ‍ॅनचे अनेक चाहते होते, ज्यात बकिंगहॅमचा ड्यूक देखील होता. तिच्या जवळच्या लोकांना वाटत होते की अ‍ॅन इतर पुरुषांशी थट्टामस्करी करीत असली तरी ती बाहेरख्याली नव्हती. [] इतिहासकार डेसमंड सुअर्ड यांच्या लिखाणानुसार १६२५मध्ये बकिंगहॅम फ्रांसला आलेला असताना तो राणी संध्याकाळी फिरायला जात असलेल्या एका खाजगी बागेत चढला आणि कदाचित तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला असावा. अ‍ॅनने तेव्हा आरडाओरडा करून तिच्या सेवकांना बोलावून घेतले. []

पीटर पॉल रुबेन्सने काढलेले राज्याभिषेक पोशाखात अ‍ॅनचे चित्र

चौदा वर्षांच्या अ‍ॅन आणि लुई यांच्यावर लग्न रद्द होण्याची शक्यता टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव आणला गेला [] परंतु लुईने त्याच्या पत्नीकडे दुर्लक्षच केले. [] लुईची आई मरिया दे मेदिचीने सुद्धा तिला बाजूला टाकल्यासारखे केले. इकडे अ‍ॅन इनेस दि ला तोरे आणि इतर स्पॅनिश सख्यांच्या मदतीने आपल्या स्पॅनिश पद्धतीने राहिली. तिने आपले मोडकेतोडके फ्रेंच सुधारण्याचा प्रयत्नही केला नाही.[]

कालांतराने १६१९ मध्ये राजाला त्याच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा राणीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. [] त्याच सुमारास अ‍ॅन आजारी पडली. या काळत लुईला तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले

यानंतर अ‍ॅनचे अनेक गर्भपात झाल्याने त्यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला.

अशातही राणी पुन्हा एकदा गर्भवती झाली.[a] किंवा इतिहासकारांच्या मते, मागील महिन्यात कधीतरी झालेल्या शाही दौऱ्यामुळे घडली. [b] लुई चौदावाचा जन्म ५ सप्टेंबर १६३८ रोजी झाला आणि बर्बन वंश पुढे जाणे शक्य झाले. गॅझेट दि फ्रांस या अधिकृत वृत्तपत्राने याला अनपेक्षित चमत्कार म्हणले. []

१६४३ मध्ये लुईच्या मृत्यूनंतर अ‍ॅन चौदाव्या लुईच्या वतीने कारभारी झाली.

चार्ल्स ब्यूब्रुनने काढलेले अ‍ॅनचे शेवटचे व्यक्तिचित्र

१६६४मध्ये अ‍ॅनचा आजार बळावला तेव्हा [] ती व्हाल-दि-ग्रासच्या कॉन्व्हेंटमध्ये[१०] रहायला गेली. २० जानेवारी १६६६ रोजी तेथे कर्करोगाने तिचे निधन झाले. [११] [१२]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 4 5 6 7 8 9 Kleinman 1985, पान. 15. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "FOOTNOTEKleinman1985" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. 1 2 3 4 Freer 1864, पान. 5. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "FOOTNOTEFreer1864" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. Seward 2022.
  4. Kleinman 1993, पान. 193.
  5. Noone 1988, पान. 42.
  6. Kleinman 1993, पाने. 193–194.
  7. Kleinman 1993, पान. 194.
  8. Fraser 2007.
  9. Arikha, Noga (2007). Passions and tempers : a history of the humours. Internet Archive. New York, NY : Ecco. ISBN 978-0-06-073116-8.
  10. Motteville, Françoise de; Wormeley, Katharine Prescott (1902). Memoirs of Madame de Motteville on Anne of Austria and her court. With an introd. by C.A. Saint-Beuve. Translated by Katharine Prescott Wormeley. Robarts - University of Toronto. Boston Hardy, Pratt.
  11. Kleinman, Ruth (1997). "Facing Cancer in the Seventeenth Century: The Last Illness of Anne of Austria, 1664-1666". Advances in Thanatology. 4 (1): 37–55.
  12. "The Last Illness of Anne of Austria". The Boston Medical and Surgical Journal. 174 (5): 185–186. 1916-02-03. doi:10.1056/NEJM191602031740520.
  1. According to a contemporary account,[] on the night of 5 December 1637, the King was caught in a storm in the centre of Paris and was unable to reach his own bed, which had been arranged for him at the Condé estate in Saint-Maur, south-east of Vincennes. Cut off from his household staff, he was persuaded by the Captain of the Queen's Guard to spend the night at the Louvre; as a result, the King and Queen ate together and, since there was no royal bed available except the Queen's, slept together as well, resulting in Louis XIV's birth exactly nine months later.[][]
  2. The reliable La Gazette recorded that the royal couple lodged in St Germain from 9 November till 1 December 1637, before heading to Paris. On 2 December, the King travelled from Paris to Crosne–instead of Saint-Maur–whence he went to Versailles on 5 December while the Queen remained in Paris. Kleinman contends that the King might well have stopped over in Paris on his way to Versailles, but even if he had spent the night of 5 December with the Queen, it doesn't imply this was the first time they shared a bed since August. The Queen's doctor, Charles Bouvard, calculated that her pregnancy had begun at the end of November.[]
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.