Jump to content

ऑस्ट्रियन आर्थिक मतवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑस्ट्रियन आर्थिक मतवाद ही एक आर्थिक मतवाद आहे जी पद्धतशीर व्यक्तिवादाचे कठोर पालन करण्याचे समर्थन करते, ही संकल्पना सांगते की सामाजिक घटना प्रामुख्याने व्यक्तींच्या प्रेरणा आणि कृती तसेच त्यांच्या स्वार्थातून घडतात. ऑस्ट्रियन संप्रदायाच्या सिद्धांतकारांचे मत आहे की आर्थिक सिद्धांत प्रामुख्याने सांख्यिकीय विश्लेषणातून न घेता, केवळ मानवी कृतीच्या मूलभूत स्वयंसिद्धांतांमधून, ज्याला कृतीशास्त्र म्हणून ओळखले जाते, त्यातून घेतला पाहिजे. [] [] [] []

ऑस्ट्रियन मतवादाचा उगम १८७१ मध्ये झाला. [] व्हिएन्नामध्ये कार्ल मेंगर, एउगेन फॉन बोम-बावेर्क , फ्रीडरिश फॉन वीजर आणि इतर लोकांच्या कार्यासह त्याचे उगम झाले. [] ते शास्त्रीय मतवादाच्या विरोधात होते, हा वाद 'मेथोडनस्ट्राइट' किंवा 'पद्धतीचा वाद' म्हणून ओळखला जातो. या परंपरेत काम करणारे सध्याचे अर्थशास्त्रज्ञ अनेक देशांमध्ये आहेत, पण त्यांच्या कार्याला अजूनही ऑस्ट्रियन अर्थशास्त्र म्हणून संबोधले जाते. ऑस्ट्रियन मतवादाच्या सुरुवातीच्या वर्षांतील सैद्धांतिक योगदानांमध्ये मूल्याचा व्यक्तिनिष्ठ सिद्धांत, किंमत सिद्धांतातील सीमांतवाद आणि आर्थिक गणना समस्येची मांडणी यात आहे. []

इतिहास

[संपादन]
जां-बातिस्त से . फ्रांसी उदारमतवादी राजकीय अर्थशास्त्राची मतवाद ही ऑस्ट्रियन अर्थशास्त्राच्या मतवादाची बौद्धिक पूर्वज आहे.

पूर्वसूचक

[संपादन]

सलामांका मतवाद (१६ व्या शतकातील स्पेन) आणि फ्रांसी उदारमतवादी शाळा (१९ व्या शतकातील फ्रांस) यांना अनेकदा ऑस्ट्रियन आर्थिक मतवादाचे सुरुवातीचे पूर्वसूचक मानले जाते, कारण त्यांनी मूल्याच्या व्यक्तिनिष्ठ सिद्धांतामध्ये योगदान दिले आणि मुक्त-बाजारपेठ तत्त्वांचे समर्थन केले. सलामांका विद्यापीठातील फ्रान्सिस्को दे वितोरिया आणि लुइस दे मोलिना यांसारख्या विद्वानांनी असे म्हणाले की वस्तूंचे मूल्य आंतरिक घटकांऐवजी वैयक्तिक पसंतींद्वारे निर्धारित केले जाते. त्यांनी किंमती निश्चित करण्यात पुरवठा आणि मागणीची भूमिका आणि सुदृढ पैशाचे महत्त्व यावरही भर दिला, ज्यामुळे आधुनिक आर्थिक संकल्पनांचा पाया घातला गेला, ज्यांना ऑस्ट्रियन मतवादाने नंतर परिष्कृत आणि विस्तारित केले. [] []

पहिली लाट

[संपादन]
कार्ल मेंगर

या मतवादाचा उगम ऑस्ट्रिया-हंगेरीमधील व्हिएन्ना येथे झाला. कार्ल मेंगरचे १८७१ मधील अर्थशास्त्राचे तत्त्वे (Grundsätze der Volkswirtschaftslehre) हे पुस्तक सामान्यतः ऑस्ट्रियन मतवादाचा पाया मानले जाते. हे पुस्तक सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडणाऱ्या पहिल्या आधुनिक पुस्तकांपैकी होते. ऑस्ट्रियन मतवाद ही १८७० च्या दशकातील सीमांतवादी क्रांतीच्या तीन संस्थापक प्रवाहांपैकी एक होती, आणि अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाचा परिचय करून देणे हे तिचे प्रमुख योगदान होते. [१०]

जॉन स्टुअर्ट मिल यांनी यापूर्वीही त्यांच्या १८४८ च्या राजकीय अर्थशास्त्राचे सिद्धांत(प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी) या पुस्तकात असाच विचार मांडला होता, [११] त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, खरेदीदारासाठी एखाद्या गोष्टीची उपयुक्तता हीच प्रभावीपणे ती सर्वोच्च किंमत ठरवते जी कोणीही त्या गोष्टीसाठी तर्कसंगतपणे देईल. बाजारातील किंमत उपयुक्ततेच्या या पातळीच्या खाली येऊ शकते, पण ती त्यापेक्षा जास्त वाढू शकत नाही; अजून काही खरेदीदार त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास त्या गोष्टीच्या योग्य मूल्यापेक्षा जास्त पैसे देत असतील. [१२]

जरी सीमांतवाद सर्वसाधारणपणे प्रभावशाली होता, तरी मेंगरच्या कार्याभोवती एक अधिक विशिष्ट मतवाद एकत्र येऊ लागली, जी "मानसशास्त्रीय मतवाद", "व्हिएन्ना मतवाद" किंवा "ऑस्ट्रियन मतवाद" म्हणून ओळखली जाऊ लागली. [१३] [१४] मेंगरच्या आर्थिक सिद्धांतातील योगदानानंतर लगेचच एउगेन फॉन बोम-बावेर्क आणि फ्रेडरिक फॉन वीजर यांचे योगदान आले. हे तीन अर्थशास्त्रज्ञ ऑस्ट्रियन मतवादाची "पहिली लाट" म्हणून ओळखले जाऊ लागले. बोम-बावेर्क यांनी १८८० आणि १८९० च्या दशकात कार्ल मार्क्सवर विस्तृत टीका लिहिल्या आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील मेथोडनस्ट्राइट(Methodenstreit) ऑस्ट्रियन लोकांच्या सहभागाचा ते एक भाग होते, ज्या दरम्यान त्यांनी ऐतिहासिक पंथाच्या हेगेली सिद्धांतांवर आक्रमण केला. [१५]

२० व्या शतकाच्या सुरुवातीला

[संपादन]

फ्रँक अल्बर्ट फेटर (१८६३-१९४९) हे ऑस्ट्रियन मतवादाच्या क्षेत्रातील एक नेते होते. त्यांनी १८९४ मध्ये हॅले विद्यापीठातून विद्यावाचस्पती मिळवली आणि १९०१ मध्ये कॉर्नेल विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्र आणि वित्त या विषयांचे प्राध्यापक झाले [१६]

१९२० च्या दशकात व्हिएन्ना विद्यापीठात अनेक महत्त्वाच्या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांनी शिक्षण घेतले आणि नंतर लुडविग फॉन मिसेस यांनी आयोजित केलेल्या खाजगी परिसंवादांमध्ये भाग घेतला. यामध्ये गॉटफ्रीड हॅबरलर, [१७] फ्रेडरिक हायेक, फ्रिट्झ माखलुप, [१८] कार्ल मेंगर (कार्ल मेंगरचे पुत्र), [१९] ऑस्कर मॉर्गेनस्टर्न, [२०] पॉल रोझेनस्टाईन-रोडान, [२१] अब्राहम वाल्ड, [२२] आणि मायकेल ॲं. हेलपेरिन, [२३] आणि समाजशास्त्रज्ञ आल्फ्रेड शुट्झ हे सगळे ते. [२४] [२५]

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात

[संपादन]
मिसेस संस्थेचा परिसर, ऑबर्न, अलाबामा, अमेरिका

१९३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, बहुतेक अर्थशास्त्रज्ञांनी सुरुवातीच्या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान मानलेल्या गोष्टी स्वीकारल्या होत्या. [२६] फ्रिट्झ माखलुपने हायेकचे वाक्य उद्धृत केले की "एखाद्या मतवादाचे सर्वात मोठे यश हे आहे की ती नसतेही, कारण तिची मूलभूत शिकवण सर्वमान्य विचारांचा भाग बनलेली असते". [२७] [२८]

२० व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास, गणितीय प्रतिरूपण आणि सांख्यिकीय पद्धतींना पआवडणाऱ्या मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रज्ञांनी ऑस्ट्रियन अर्थशास्त्राला मोठ्या प्रमाणात बाजूला सारले. [२९] [३०] मिसेस यांचे विद्यार्थी इस्राएल किर्झनर म्हणाले की, १९५४ मध्ये, जेव्हा किर्झनर विद्यावर्च करत होते, तेव्हा अशी कोणतीही स्वतंत्र ऑस्ट्रियन मतवाद नव्हतीच. कोणत्या पदव्युत्तर शिक्षण संस्थेत जावे याचा निर्णय घेत असताना, मिसेस यांनी त्यांना जॉन्स हॉपकिन्स येथील जायसाठी स्वीकारण्याचा सल्ला दिला होता, कारण ते एक प्रतिष्ठित विद्यापीठ होते आणि फ्रिट्झ माखलुप तिथे शिकवत होते. [३१]

१९४० च्या दशकानंतर, ऑस्ट्रियन अर्थशास्त्राला दोन आर्थिक मतवादांमध्ये विभागले जाऊ शकते आणि २० व्या शतकाच्या उत्तरार्धात या मतवादात काही प्रमाणात फूट पडली. मिसेस यांच्यासारख्या ऑस्ट्रियन लोकांचा एक गट नव-शास्त्रीय पद्धतीला अपरिवर्तनीयपणे सदोष मानतो; फ्रेडरिक हायेक यांच्यासारखा दुसरा गट नव-अभिजात पद्धतीचा मोठा भाग स्वीकारतो आणि अर्थव्यवस्थेतील सरकारी हस्तक्षेपाला अधिक स्वीकारार्ह मानतो. [३२] [२८] हेन्री हाझलिट यांनी १९३० ते १९८० च्या दशकापर्यंत अनेक प्रकाशनांसाठी अर्थशास्त्रावरील स्तंभ आणि संपादकीय लिहिले आणि ऑस्ट्रियन अर्थशास्त्राच्या विषयावर अनेक पुस्तके लिहिली. हाझलिट यांच्या विचारांवर मिसेस यांचा चांगला प्रभाव होता. [३३] त्यांच्या एका धड्यात अर्थशास्त्र(इकॉनॉमिक्स इन वन लेसन) (१९४६) या पुस्तकाच्या दहा लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आणि ते जॉन मेनार्ड केन्स यांच्या सामान्य सिद्धांट(जनरल थिअरी) या ग्रंथावरील ओळी-ओळीने केलेल्या टीकेसाठी, नव्या अर्थशास्त्राचे चूक(द फेल्युअर ऑफ द "न्यू इकॉनॉमिक्स) (१९५९) साठी देखील ओळखले जातात. [३४]

आजच्या ऑस्ट्रियन लोकांमध्ये विभागणी

[संपादन]

अर्थशास्त्रज्ञ लेलँड येगर यांनी २० व्या शतकाच्या उत्तरार्धातील मतभेदांवर चर्चा केली आणि मरे रॉथबार्ड, हान्स-हेर्मन हॉप, जोसेफ सालेर्नो आणि इतरांनी लिहिलेल्या एका चर्चेचा संदर्भ दिला, ज्यात त्यांनी हायेकवर टीका केली होती. येगर म्हणाले: "[आर्थिक गणनेतील ज्ञानाच्या भूमिकेवर] मिसेस आणि हायेक यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणे, विशेषतः हायेकचा अपमान करून, या दोन महान पुरुषांशी अन्याय करणे आणि आर्थिक विचारांच्या इतिहासाशी विश्वासघात करणे आहे". त्यांनी पुढे या मतभेदांना आर्थिक विश्लेषणासाठी आणि पूर्व युरोपीय साम्यवादाच्या पतनाच्या ऐतिहासिक समजासाठी विध्वंसक मानले. [३५] [३६]

लुडविग फॉन मिसेस संस्थेने १९९९ मध्ये प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात, [३७] हॉप यांनी प्रतिपादन केले की रोथबार्ड हे "ऑस्ट्रियन अर्थशास्त्रातील मुख्य प्रवाहाचे" नेते होते आणि त्यांनी रॉथबार्ड यांची तुलना नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक हायेक यांच्याशी केली, ज्यांना त्यांनी एक ब्रिटिश अनुभववादी आणि मिसेस व रॉथबार्ड यांच्या विचारांचे विरोधक म्हणून ओळखले. हॉप यांनी मान्य केले की हायेक हे शिक्षणक्षेत्रातील सर्वात प्रमुख ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ होते, पण त्यांनी असेही म्हटले की हायेक हे ऑस्ट्रियन परंपरेचे विरोधक होते, जी कार्ल मेंगर आणि बोम-बावेर्क यांच्यापासून मिसेसमार्गे रॉथबार्डपर्यंत पोहोचली होती. ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ वॉल्टर ब्लॉक म्हणतात की ऑस्ट्रियन मतवादाला आर्थिक सिद्धांत आणि राजकीय सिद्धांत या दोन श्रेणींद्वारे आर्थिक विचारांच्या इतर मतवादांपासून वेगळे केले जाऊ शकते. ब्लॉक यांच्या मते, हायेक यांना ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ मानले जाऊ शकते, पण राजकीय सिद्धांतावरील त्यांचे विचार स्वातंत्र्यवादी राजकीय सिद्धांताशी जुळत नाहीत, ज्याला ब्लॉक ऑस्ट्रियन मतवादाचा अविभाज्य भाग मानतात. [३८]

हॉप आणि ब्लॉक यांनी हायेकवर केलेली टीका ऑस्ट्रियन मतवादाचे संस्थापक कार्ल मेंगर यांनाही लागू होते. हॉप यावर जोर देतात की, त्यांच्या मते इंग्रजी अनुभवजन्य परंपरेतील हायेक, ऑस्ट्रियन मतवादाच्या तथाकथित बुद्धिवादी परंपरेचे विरोधक आहेत; मेंगर यांनी हायेक यांच्याप्रमाणेच आपल्या कार्यांमध्ये बुद्धिवादावर जोरदार टीका केली. [३९] [४०] मेंगर यांनी या कल्पनेवर जोर दिला की अशा अनेक संस्था आहेत ज्या मुद्दाम तयार केल्या गेल्या नाहीत, त्यांच्याकडे एक प्रकारची "श्रेष्ठ बुद्धिमत्ता" आहे आणि त्या समाजासाठी महत्त्वाची कार्ये पार पाडतात. [४१] [३९] [४२] या भूमिकांना आधार देण्यास त्यांनी एडमंड बर्क आणि इंग्रजी परंपरेबद्दलही सांगितले. [३९]

प्रभाव

[संपादन]

"पहिल्या लाटेतील" ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांनी विकसित केलेले अनेक सिद्धांत बऱ्याच काळापूर्वी मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रात सामावून घेतले गेले आहेत. [४३] [४४] यामध्ये कार्ल मेंगरचे सीमांत उपयोगितेवरील सिद्धांत, फ्रीडरिश फॉन वीजरचे संधी खर्चावरील सिद्धांत आणि एउगेन फॉन बोम-बावेर्कचे काल-प्राधान्यावरील सिद्धांत, तसेच मेंगर आणि बोम-बावेर्क यांनी मार्क्सवादी अर्थशास्त्रावर केलेल्या टीका आहेत. [४५]

अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष ॲलन ग्रीनस्पॅन म्हणाले की, ऑस्ट्रियन मतवादाच्या संस्थापकांनी "त्यांच्यापैकी बहुतेकांच्या कार्यकाळापासून खूप दूरच्या भविष्याचा वेध घेतला आणि या देशातील बहुतेक मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रज्ञांच्या मतवादावर त्यांचा खोल आणि, माझ्या मते, कदाचित अपरिवर्तनीय परिणाम झाला आहे". [४६] १९८७ मध्ये, नोबेल पारितोषिक विजेते जेम्स मॅ. बुकानन यांनी एक मुलाखतकाराला सांगितले: "मला ऑस्ट्रियन म्हटले जाण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही. हायेक आणि मिसेस मला ऑस्ट्रियन मानू शकतील, पण निश्चितपाणेच इतरांपैकी काही जण मानणार नाहीत". [४७]

सिद्धांत

[संपादन]

ऑस्ट्रियन मतवादानुसार, वैयक्तिक ज्ञान, वेळ, अपेक्षा आणि इतर व्यक्तिनिष्ठ घटकांसह व्यक्तींच्या व्यक्तिनिष्ठ निवडींमुळे सर्व आर्थिक घटना घडतात. ऑस्ट्रियन मतवादी वैयक्तिक निवडीच्या सामाजिक परिणामांचे परीक्षण करून अर्थव्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करतात, या दृष्टिकोनाला पद्धतशीर व्यक्तिवाद म्हणतात. हा दृष्टिकोन आर्थिक विचारांच्या इतर मतवादांपेक्षा भिन्न आहे, ज्यांनी व्यक्तींऐवजी एकत्रित चल, समतोल विश्लेषण आणि सामाजिक गटांवर लक्ष दिले आहे. [४८] [४९]

लुडविग फॉन मिसेस

२० व्या आणि २१ व्या शतकात, सुरुवातीच्या ऑस्ट्रियन मतवादाशी पद्धतशीर संबंध असलेल्या अर्थशास्त्रज्ञांनी अनेक विविध दृष्टिकोन आणि सैद्धांतिक दिशा विकसित केल्या. लुडविग फॉन मिसेस यांनी त्यांच्या व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाची आवृत्ती, ज्याला त्यांनी "कृतीशास्त्र" म्हटले, ती १९४९ मध्ये मानवी कृती(ह्युमन ॲक्शन) या नावाने प्रकाशित झालेल्या पुस्तकात मांडली. [५०] : ३ [५१] त्यात, मिसेस यांनी असे प्रतिपादन केले की, कृतीशास्त्राचा उपयोग पूर्वसिद्ध सैद्धांतिक आर्थिक सत्ये काढण्यास केला जाऊ शकतो आणि निगमनात्मक आर्थिक विचार प्रयोगांमधून असे निष्कर्ष निघू शकतात जे मूळ गृहितकांमधून अखंडनीयपणे निष्पन्न होतात. त्यांनी लिहिले की अनुभवजन्य निरीक्षण किंवा सांख्यिकीय विश्लेषणातून निष्कर्ष काढता येत नाहीत आणि आर्थिक प्रतिरूपकांमध्ये संभाव्यतांच्या वापराला विरोध केला. [५२]

मिसेस यांच्या काळापासून, काही ऑस्ट्रियन विचारवंतांनी त्यांचा कृतीशास्त्रिक दृष्टिकोन स्वीकारला आहे तर इतरांनी पर्यायी पद्धती अवलंबल्या आहेत. [५३] उदा., फ्रिट्झ माखलुप, फ्रेडरिक हायेक आणि इतरांनी मिसेस यांचा अर्थशास्त्राकडे पाहण्याचा प्रबळ पूर्वसिद्ध दृष्टिकोन स्वीकारला नाही. [५४] लुडविग लाखमन, एक कट्टर व्यक्तिनिष्ठतावादी, यांनी देखील मॅक्स वेबरने मांडलेल्या ' वर्स्टेहेंडे मेथोड ' ("अर्थबोधक पद्धत") च्या बाजूने मिसेसच्या कृतीशास्त्राच्या मांडणीला मोठ्या प्रमाणात नाकारले. [४८] [५५]

मूलभूत तत्त्वे

[संपादन]

१९८१ वर्षी, फ्रिट्झ माखलुप यांनी ऑस्ट्रियन आर्थिक विचारांची ठराविक मते म्हणून जे मानले त्याचा सारांश मांडला: [५६]

  • पद्धतशीर व्यक्तिवाद : आर्थिक घटनांचे स्पष्टीकरण व्यक्तींच्या कृती (किंवा निष्क्रियता) पर्यंत मागोवा घेऊनच दिले पाहिजे; गट किंवा समूह केवळ त्यांच्या वैयक्तिक सदस्यांमार्फतच कार्य करतात. गट विचार करत नाहीत; माणसे विचार करतात. [५७]
  • पद्धतिक व्यक्तिनिष्ठता : व्यक्ती बाह्य घडामोडी आणि त्यांच्या कृतींच्या परिणामांविषयीच्या स्वतःच्या ज्ञानावर, विश्वासांवर आणि अपेक्षांवर आधारित निर्णय घेतात. [५८]
  • आवड आणि पसंती : वस्तू आणि सेवांचे व्यक्तिनिष्ठ मूल्यमापन त्यांची मागणी निश्चित करते, ज्याच्यामुळे त्यांच्या किमतींवर ग्राहकांचा प्रभाव पडतो.
  • संधी खर्च : ज्या पर्यायी संधी सोडून द्याव्या लागतात, त्यांचा खर्च; जेव्हा उत्पादक सेवा एका उद्देशासाठी वापरल्या जातात, तेव्हा त्यांचे सर्व पर्यायी उपयोग सोडून द्यावे लागतात.
  • सीमांतवाद : सर्व आर्थिक रचनांमध्ये, एकूण बेरजेत जोडलेल्या किंवा वजा केलेल्या शेवटच्या घटकाच्या महत्त्वावरून मूल्ये, खर्च, महसूल, उत्पादकता इत्यादी निश्चित केले जातात.
  • उत्पादन आणि उपभोगाची काल संरचना : बचतीचे निर्णय हे नजीकच्या, दूरच्या किंवा अनिश्चित भविष्यातील उपभोगासंबंधीच्या "काल-प्राधान्य"मधून दिसून येतात आणि अधिक वेळ घेणाऱ्या उत्पादन प्रक्रिया हाती घेतल्यास जास्त उत्पादन मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे गुंतवणूक केली जाते.

माखलुप यांनी ऑस्ट्रियन अर्थशास्त्राच्या विशेषतः मिसेस संप्रदायाशी संबंधित असलेली आणखी दोन तत्त्वे देखील ओळखली:

  • ग्राहक सार्वभौमत्व : वस्तू आणि सेवांच्या प्रभावी मागणीवर आणि मुक्त बाजारपेठांमध्ये परिणामी निर्माण होणाऱ्या किमतींद्वारे, उत्पादक आणि गुंतवणूकदारांच्या उत्पादन योजनांवर ग्राहकांचा असलेला प्रभाव, ही केवळ एक वस्तुस्थिती नसून एक महत्त्वाचे उद्दिष्ट देखील आहे, जे केवळ बाजारपेठांमध्ये सरकारी हस्तक्षेप पूर्णपणे टाळून आणि उत्पादने व सेवांचे प्रमाण, गुणवत्ता आणि किमती यांसंबंधी स्वतःच्या निर्णयानुसार निर्णय घेण्याच्या विक्रेते आणि खरेदीदारांच्या स्वातंत्र्यावरील निर्बंध टाळूनच साध्य करता येते. [५७]
  • राजकीय व्यक्तिवाद : जेव्हा व्यक्तींना पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य दिले जाईल, तेव्हाच राजकीय आणि नैतिक स्वातंत्र्य सुरक्षित करणे शक्य होईल. आर्थिक स्वातंत्र्यावरील निर्बंधांमुळे, लवकर किंवा उशिरा, राज्याच्या सक्तीच्या कारवायांचा राजकीय क्षेत्रात विस्तार होतो, ज्यामुळे १९व्या शतकात भांडवलशाही समाजांनी मिळवलेल्या मूलभूत वैयक्तिक स्वातंत्र्याला सुरुंग लागतो आणि अखेरीस ते नष्ट होते. [५८]

आर्थिक विचारांमधील योगदान

[संपादन]

संधी खर्च

[संपादन]
फ्रेडरिक फॉन वीजर

संधी खर्चाचा सिद्धांत सर्वात पहिले १९व्या शतकाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ फ्रीडरिश फॉन वीजर यांनी स्पष्टपणे मांडला. [५९] संधी खर्च म्हणजे कोणत्याही कृतीचा असा खर्च, जो सोडून दिलेल्या (म्हणजे न निवडलेल्या) दुसऱ्या सर्वोत्तम पर्यायाच्या मूल्याच्या संदर्भात मोजला जातो. अनेक परस्पर-अनन्य पर्यायांमधून निवड करणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी किंवा गटासाठी असलेल्या दुसऱ्या सर्वोत्तम निवडीशी संबंधित हा एक त्यागाचा प्रकार आहे. [६०]

भविष्याबद्दलच्या अपेक्षांना देखील दुर्मिळतेचा एक प्रकार मानले जाऊ शकते; जेव्हा वेळेच्या पसंतीनुसार त्याचे परिमाण ठरवले जाते, तेव्हा वर्तमान विरुद्ध भविष्यातील गुंतवणुकीच्या पसंतीच्या संदर्भात संधी खर्चाचे देखील मूल्यमापन केले पाहिजे. संधी खर्च ही मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रातील एक प्रमुख संकल्पना आहे आणि तिचे वर्णन " दुर्मिळता आणि निवड यांच्यातील मूलभूत संबंध" व्यक्त करणारी म्हणून केले गेले आहे. [६१] संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर केला जाईल हे सुनिश्चित करण्यात संधी खर्चाची संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. [६२]

भांडवल आणि व्याज

[संपादन]
एउगेन फॉन बोम-बावेर्क

भांडवल आणि व्याजाचा ऑस्ट्रियन सिद्धांत सर्वात पहिले एउगेन फॉन बोम-बावेर्क यांनी विकसित केला. त्यांनी असे प्रतिपादन केले की व्याजदर आणि नफा हे अंतिम वस्तूंच्या बाजारातील पुरवठा आणि मागणी तसेच काल-प्राधान्याद्वारे निर्धारित केले जातात. [१५]

बोम-बावेर्क यांचा सिद्धांत भांडवल-केंद्रिततेला उत्पादन प्रक्रियेच्या अप्रत्यक्षपणेच्या प्रमाणाशी जोडतो. त्यांनी असा युक्तिवादही केला की सीमांत उपयोगितेच्या नियमातून खर्चाचा अभिजात नियम अनिवार्यपणे सूचित होतो. तथापि, नंतरच्या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांनी जसे की लुडविग फॉन मिसेस, [६३] इस्राएल किर्झनर, लुडविग लाखमन, [६४] आणि खेसुस हुएर्ता दे सोतो [६५] यांनी व्याजदरांसाठी उत्पादकतेचे स्पष्टीकरण नाकारले आणि उत्पादनाचा सरासरी कालावधी हा अभिजात आर्थिक विचारांचा अवशेष मानला. [६६]

महागाई

[संपादन]

मिसेसच्या व्याख्येनुसार, महागाई म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात होणारी वाढ: [६७]


सैद्धांतिक तपासणीत महागाईसाठी एकच अर्थ आहे जो विवेकपणे दिले जाऊ शकतो; चलनाच्या प्रमाणात वाढ(व्यापक अर्थात, ज्यात विश्वासू माध्यमही जोडले जातील), ज्याला एका संबंधित चलनाच्या(परत त्याच व्यापक अर्थाने) सरभर केलेली गर्जेची वाढ नाही आहे, तर वस्तुविनिमय मूल्य कमी होते.[६८]

हायक यांनी दावा केला की महागाईला चालना देण्यास पैशाच्या पुरवठ्यात वाढ आणि परिणामी वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये होणारी वाढ यामधील अंतराचा फायदा घेतला जातो: [६९]


आणि कारण कोणतेही महागाई, आधी कितीही मर्यादित असो, बेरोजगारी कमी करण्यास रोजगाराला चालना देऊ शकते जेव्हा ते महागाई जास्ती होत जाते, त्याला बेरोजगारी कमी करण्यास वापरले गेले आहे, ते कायमसाठी करत राहणार तोपर्यंत ते वाढत राहील. "मर्यादित" स्थिर महागाई काही मदत करु शकत नाही - त्याने फक्त साधी महागाई होईल. स्थिर महागाईचा अर्थपूर्ण परिणाम दिसून येत नाही, जे प्रोत्साहन होत असायचे ते संपून जाते आणि शेवटपणे फक्त विलंबित रूपांतरांचे एक अनुशेष राहतो, हा निर्णायक युक्तिवाद आहे मानक अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातीलही फायदेशीर म्हणून दाखवले "मर्यादित" महागाईविरुद्ध.[७०]

प्रमुख ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांनी देखील पारिभाषिक गोंधळाची नोंद घेतली आहे: ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ चलनवाढीला पैशाच्या पुरवठ्यात वाढ म्हणतात, तर बहुतेक अर्थशास्त्रज्ञ आणि साधे लोक त्याला वाढत्या किमती म्हणतात. [७१]

आर्थिक गणना समस्या

[संपादन]
फ्रायडरिक हायेक
इस्राएल किर्झनर

आर्थिक गणना समस्या ही नियोजित अर्थव्यवस्थांवरील एक टीका आहे, जी सर्वप्रथम लुडविग फॉन मिसेस यांनी त्यांच्या १९२० च्या समाजवादी कॉमनवेल्थमध्ये आर्थिक गणना(इकोनॉमिक कॅल्क्युलेशन इन द सोशलिस्ट कॉमनवेल्थ) या निबंधात मांडली. त्यानंतर मिसेस यांनी त्यांच्या या कल्पनेवर त्यांचे विद्यार्थी फ्रायडरिक हायेक यांच्याशी चर्चा केली, ज्यांनी भूदासत्वाचा रस्ता(द रोड टू सर्फडम) यासह विविध कामांमध्ये तिचा विस्तार केला. [७२] [६६] गणना समस्या असे म्हणते की किमतीच्या संकेतांशिवाय, उत्पादनाचे घटक शक्य तितक्या कार्यक्षम मार्गाने वाटले जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे नियोजित अर्थव्यवस्था अकार्यक्षम ठरतात.

मॅक्स वेबर त्यांच्या अर्थव्यवस्था आणि समाज(विर्टशाफ्ट उंड गेसेलशाफ्ट) (मरणोत्तर १९२१ मध्ये प्रकाशित) या महान पुस्तकात अशाच निष्कर्षावर पोहोचले, ज्यात त्यांनी एका जटिल आर्थिक प्रणालीच्या केंद्रीकृत नियोजनाच्या अशक्यतेवर चर्चा केली आहे. [७३]

ऑस्ट्रियन सिद्धांत बाजारपेठेच्या संघटन शक्तीवर भर देतो. हायेक यांनी असे प्रतिपादन केले की बाजारभाव अशा माहितीचे प्रतिबिंब असतात, जी संपूर्णपणे कोणत्याही एका व्यक्तीला महिती नसते आणि जी अर्थव्यवस्थेतील संसाधनांचे वाटप निश्चित करते. समाजवादी प्रणालींमध्ये वैयक्तिक प्रोत्साहन आणि किंमत निश्चिती प्रक्रियेचा अभाव असल्यामुळे, ज्याद्वारे व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक माहितीवर आधारित कृती करतात, हायेक यांनी असा युक्तिवाद केला की समाजवादी आर्थिक नियोजकांकडे चांगले निर्णय घेण्यास आवश्यक असलेल्या सर्व ज्ञान नसतो. जे या टीकेशी सहमत आहेत ते याकडे समाजवादाचे खंडन म्हणून पाहतात, जे दर्शवते की समाजवाद हा आर्थिक संघटनेचा एक व्यवहार्य किंवा शाश्वत प्रकार नाही. हा वाद १९२० आणि १९३० च्या दशकात प्रकर्षाने समोर आला आणि आर्थिक विचारांच्या इतिहासकारांमध्ये वादाचा तो विशिष्ट काळ 'समाजवादी गणना वाद' म्हणून ओळखला जाऊ लागला. [७४]

मिसेस असे म्हणाले की समाजवादी अर्थव्यवस्थांमधील किंमत प्रणाली अनिवार्यपणे सदोष होत्या कारण जर सरकार उत्पादनाच्या साधनांचे मालक असेल, तर भांडवली वस्तूंसाठी किंमती मिळवता येत नाहीत कारण समाजवादी प्रणालीमध्ये त्या केवळ वस्तूंचे अंतर्गत हस्तांतरण असतात आणि अंतिम वस्तूंप्रमाणे "विनिमयाच्या वस्तू" नसतात. म्हणून, त्यांना किंमत दिली जात नव्हती आणि त्याच्यामुळे ही प्रणाली अनिवार्यपणे अकार्यक्षम असेल कारण केंद्रीय नियोजकांना उपलब्ध संसाधनांचे कार्यक्षमतेने वाटप कसे करावे हे कळणार नाही. [७४] याच्यामुळे त्यांनी लिहिले की "समाजवादी राष्ट्रकुलात तर्कसंगत आर्थिक क्रियाकलाप अशक्य आहे". [७५]

व्यवसाय चक्रे

[संपादन]

व्यवसाय चक्राचा ऑस्ट्रियन सिद्धांत (ABCT) आर्थिक चढोतारांचे कारण म्हणून बँकांच्या पतपुरवठ्यावर लक्ष ठेवतो. [७६] जरी नंतर हायेक आणि इतरांनी याचा विस्तार केला असला तरी, हा सिद्धांत पहिले मिसेस यांनी मांडला होता, ज्यांनी असेही प्रतिपादन केले की आंशिक राखीच बँका मुद्दाम कमी व्याजदराने पतपुरवठा करतात, ज्याच्यामुळे व्यवसाय तुलनेने अप्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियांमध्ये गुंतवणूक करतात. या मुद्दाम "तेजी"मुळे संसाधनांचे गैर-वाटप होते, ज्याला त्यांनी "गैरगुंतवणूक" म्हटले, आणि याचा अंत शेवटपणे "मंदी"मध्ये होतो. [७७]

मिसेस यांनी असा अंदाज लावला की बँकिंग प्रणालीमध्ये सरकारद्वारे पैसा आणि पतपुरवठ्यामध्ये होणाऱ्या फेरफारामुळे बचत आणि गुंतवणूक असंतुलित होते, अणि त्यामुळे चुकीच्या दिशेने गुंतवणूक प्रकल्प राबवले जातात जे शेवटी टिकू शकत नाहीत, आणि अशा वेळी अर्थव्यवस्थेला सुधारणात्मक मंदीच्या काळातून स्वतःला पुन्हा एकदा संतुलित करावे लागते. [६७] ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ फ्रिट्झ माखलुप यांनी ऑस्ट्रियन दृष्टिकोनाचा सारांश मांडताना म्हटले की, "चलनाचे घटक चक्राला कारणीभूत चालवतात, पण खऱ्या घटनांमुळे चक्र आहे." [७८]

मध्यवर्ती बँका

[संपादन]

लुडविग फॉन मिसेस यांच्या मते, मध्यवर्ती बँका व्यावसायिक बँकांना कृत्रिमरित्या कमी व्याजदराने कर्ज द्यायची शक्यता तयार करतात, ज्याच्यामुळे बँक पतपुरवठ्याचा अस्थिर विस्तार होतो आणि त्यानंतरच्या कोणत्याही आकुंचनाला अडथळा येतो. त्यांनी विश्वस्त माध्यमांमधील वाढ रोखण्यासाठी चलनविषयक सुधारणा म्हणून सुवर्ण मानकाचा युक्तिवाद केला. [७९] फ्रायडरिक हायेक यांनी वेगळा दृष्टिकोन स्वीकारला, त्यांनी सोन्यावर लक्ष न देऊन मजबूत मध्यवर्ती बँकिंगद्वारे बँकिंग क्षेत्राच्या नियमनावर लक्ष केंद्रित केले. [८०] [८१]

संदर्भ

[संपादन]

तळटीप

संदर्भPage साचा:Reflist/styles.css has no content.

  1. Menger, Carl (2007). Principles of Economics (PDF) (इंग्रजी भाषेत). Dingwall, James; Hoselitz, Bert F. द्वारे भाषांतरित. Auburn, Alabama: Ludwig von Mises Institute.
  2. Heath, Joseph (1 May 2018). Zalta, Edward N. (ed.). The Stanford Encyclopedia of Philosophy. Metaphysics Research Lab, Stanford University. 1 May 2018 रोजी पाहिले Stanford Encyclopedia of Philosophy द्वारे.
  3. Ludwig von Mises. Human Action, p. 11, "Purposeful Action and Animal Reaction". Referenced 2011-11-23.
  4. Empty citation (सहाय्य)
  5. "Austrian School of Economics". Econlib (इंग्रजी भाषेत). 2024-12-19 रोजी पाहिले.
  6. Joseph A. Schumpeter, History of economic analysis, Oxford University Press 1996, आयएसबीएन 978-0195105599.
  7. Birner, Jack; van Zijp, Rudy (1994). Hayek, Co-ordination and Evolution: His Legacy in Philosophy, Politics, Economics and the History of Ideas. London, New York: Routledge. p. 94. ISBN 978-0-415-09397-2.
  8. Grice-Hutchinson, Marjorie (1952). The School of Salamanca (PDF). Oxford at the Clarendon Press.
  9. School of Salamanca |access-date= requires |url= (सहाय्य)
  10. Keizer, Willem (1997). Austrian Economics in Debate. New York: Routledge. p. 1. ISBN 978-0-415-14054-6.
  11. Ahiakpor, J. C. W. (2003): Classical Macroeconomics. Some Modern Variations and Distortions, Routledge, पृ. २१.
  12. Mill, J. S. (1848). Principles of Political Economy.
  13. Kirzner, Israel M. (1987). "Austrian School of Economics". The New Palgrave: A Dictionary of Economics. 1: 145–151.
  14. Schumpeter, Joseph A.; Schumpeter, Elizabeth Boody (1994). History of economic analysis. New York: Oxford University Press. ISBN 978-0-19-510559-9.
  15. 1 2 Blaug, Mark (1997). Economic theory in retrospect (5th ed.). Cambridge ; New York: Cambridge University Press. ISBN 978-0-521-57153-1. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":8" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  16. Ekelund, Robert B.; Hébert, Robert F. (2014). A history of economic theory & method (6th ed.). Long Grove, Ill: Waveland Press. ISBN 978-1-4786-0638-3.
  17. Salerno, Joseph T. (1 August 2007). "Biography of Gottfried Haberler (1901–1995)". Mises Institute. 2014-09-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  18. "Biography of Fritz Machlup". 5 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 June 2013 रोजी पाहिले.
  19. "About Karl Menger – Department of Applied Mathematics – IIT College of Science – Illinois Institute of Technology". www.iit.edu. 29 October 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2018 रोजी पाहिले.
  20. "Guide to the Oskar Morgenstern Papers, 1866–1992 and undated". Rubenstein Library. Duke University. 2012-10-17 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  21. "Rodan; Paul Rosenstein (1902–1985); political economist". Archive at London School of Economics. 2011-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  22. Morgenstern, Oskar (October 1951). "Abraham Wald, 1902–1950". Econometrica. The Econometric Society. 19: 361–367. doi:10.2307/1907462. JSTOR 1907462.
  23. "Studies in Economic Nationalism". 18 August 2014.
  24. Page साचा:Plainlist/styles.css has no content.साचा:Multiref
  25. Backhouse, Roger (2002). The Penguin history of economics. London New York Victoria, Australia: Penguin Books. ISBN 978-0-14-026042-7.
  26. Boettke, Peter J.; Leeson, Peter T. (2003). "28A: The Austrian School of Economics 1950–2000". In Samuels, Warren; Biddle, Jeff E.; Davis, John B. (eds.). A Companion to the History of Economic Thought. Blackwell Publishing. pp. 446–452. ISBN 978-0-631-22573-7.
  27. "Ludwig von Mises: A Scholar Who Would Not Compromise". 15 December 2004. 2014-09-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2014-09-13 रोजी पाहिले. Homage to Mises by Fritz Machlup 1981.
  28. 1 2 Wasserman, Janek (2019). Marginal revolutionaries: how Austrian economists fought the war of ideas. New Haven: Yale University Press. ISBN 978-0-300-22822-9. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":7" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  29. Backhouse, Roger E (January 2000). "Austrian economics and the mainstream: View from the boundary". The Quarterly Journal of Austrian Economics. 3 (2): 31–43. doi:10.1007/s12113-000-1002-8. 2017-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-24 रोजी पाहिले. Hayek did not fall out of favor because he was not Keynesian (neither are Friedman or Lucas) but because he was perceived to be doing neither rigorous theory nor empirical work
  30. Snowdon, Brian; Vane, Howard R. (2006). Modern macroeconomics: its origins, development and current state (Paperback ed., reprinted ed.). Cheltenham: Elgar. ISBN 978-1-84542-208-0.
  31. Kirzner, Israel. "Interview of Israel Kirzner". Ludwig von Mises Institute. 9 September 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 June 2013 रोजी पाहिले.
  32. Kanopiadmin (30 July 2014). "The Hayek and Mises Controversy: Bridging Differences – Odd J. Stalebrink" (PDF). mises.org. 14 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 1 May 2018 रोजी पाहिले.
  33. "Remembering Henry Hazlitt". The Freeman. 2013-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-11 रोजी पाहिले.
  34. "Biography of Henry Hazlitt". Ludwig von Mises Institute. 2012-01-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2013-03-11 रोजी पाहिले.
  35. Yeager, Leland (2011). Is the Market a Test of Truth and Beauty?: Essays in Political Economy. Ludwig von Mises Institute. pp. 93 ff.
  36. "The History of a Tradition: Austrian Economics from 1871 to 2016". Research in the History of Economic Thought and Methodology (इंग्रजी भाषेत). Emerald Group Publishing Limited. 2016-07-29. doi:10.1108/S0743-4154201634A. ISBN 978-1-78560-960-2.
  37. Hoppe, Hans-Hermann (1999). 15 Great Austrian Economists – Murray Rothbard (PDF). Alabama: Ludwig von Mises Institute. pp. 223 ff. 2014-10-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  38. "Dr. Walter Block: Austrian vs Chicago Schools". Mises Canada: Rothbard School 2014. 18 May 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 December 2014 रोजी पाहिले.
  39. 1 2 3 Menger, Carl. Investigations into the Methods of the Social Sciences (PDF). pp. 173–175. 2017-02-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  40. "Why I Am Not an Austrian Economist". econfaculty.gmu.edu. 2026-04-19 रोजी पाहिले.
  41. Menger, Carl. Investigations into the Methods of the Social Sciences (PDF). pp. 146–147. 2017-02-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  42. Menger, Carl. Investigations into the Methods of the Social Sciences (PDF). p. 91. 2017-02-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  43. It has also influenced related disciplines such as Law and Economics, see. K. Grechenig, M. Litschka, "Law by Human Intent or Evolution? Some Remarks on the Austrian School of Economics' Role in the Development of Law and Economics", European Journal of Law and Economics 2010, vol. 29, no. 1, पृ. ५७–७९.
  44. Kurz, Heinz D. (2017). Economic thought: a brief history. Riemer, Jeremiah M. द्वारे भाषांतरित. New York: Columbia University Press. ISBN 978-0-231-17259-2.
  45. kanopiadmin (2011-03-14). "The Austrian School's Critique of Marxism". Mises Institute (इंग्रजी भाषेत). 2019-02-02 रोजी पाहिले.
  46. Greenspan, Alan. "Hearings before the U.S. House of Representatives' Committee on Financial Services". U.S. House of Representatives' Committee on Financial Services. Washington, D.C.. 25 July 2000.
  47. "An Interview with Laureate James Buchanan". Austrian Economics Newsletter. 9 (1). Fall 1987. 2014-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-19 रोजी पाहिले.
  48. 1 2 White, Lawrence H. (2003). The Methodology of the Austrian School Economists (revised ed.). Ludwig von Mises Institute. 2014-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "White Methodology" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  49. Hodgson, Geoffrey M. (2006). How economics forgot history: the problem of historical specificity in social science. Economics as social theory (Digit. Print ed.). London: Routledge. ISBN 978-0-415-25717-6.
  50. Ludwig von Mises, Nationalökonomie (Geneva, Switzerland: Union, 1940); Human Action (Auburn, Alabama: Ludwig von Mises Institute, [1949] 1998).
  51. Roncaglia, Alessandro (2017). A brief history of economic thought. Cambridge: Cambridge University Press. ISBN 978-1-316-62736-5.
  52. "The Ultimate Foundation of Economic Science by Ludwig von Mises". Mises.org. 20 July 1962. 2012-10-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-08-13 रोजी पाहिले.
  53. Caldwell, Bruce J. (1984). "Praxeology and its Critics: an Appraisal" (PDF). History of Political Economy. 16 (3): 363–379. doi:10.1215/00182702-16-3-363.
  54. Langlois, Richard N. (1985). "From the Knowledge of Economics to the Economics of Knowledge: Fritz Machlup on Methodology and on the "Knowledge Society"" (PDF). Research in the History of Economic Thought and Methodology. 3: 225–235. 2013-10-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2012-12-06 रोजी पाहिले.
  55. Lachmann, Ludwig (1973). Macroeconomic Thinking and the Market Economy (PDF). Institute of Economic Affairs. 2014-12-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-12-16 रोजी पाहिले.
  56. Fritz, Machlup (1976). "Homage to Mises". In Moss, Laurence S. (ed.). The economics of Ludwig von Mises: toward a critical reappraisal ; [Symposium on the Economics of Ludwig von Mises, Atlanta, 1974]. Studies in economic history. Kansas City: Sheed and Ward. ISBN 978-0-8362-0651-7.
  57. 1 2 Vaughn, Karen Iversen (1998). Austrian economics in America: the migration of a tradition. Historical perspectives on modern economics (Repr. d. Ausg. von 1994 ed.). Cambridge: Cambridge Univ. Press. ISBN 978-0-521-63765-7. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":5" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  58. 1 2 Caldwell, Bruce (2008). Hayek's challenge: intellectual biography of F.A. Hayek (Nachdr. ed.). Chicago: University of Chicago Press. ISBN 978-0-226-09193-8. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":6" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  59. Kirzner, Israel M.; Lachman, Ludwig M. (1986). Subjectivism, intelligibility and economic understanding: essays in honor of Ludwig M. Lachmann on his eightieth birthday (Illustrated ed.). Macmillan. ISBN 978-0-333-41788-1.
  60. Blaug, Mark (2006). Economic theory in retrospect (5. ed., reprint ed.). Cambridge: Cambridge Univ. Press. ISBN 978-0-521-57701-4.
  61. [James M. Buchanan James M. Buchanan] Check |url= value (सहाय्य). Missing or empty |title= (सहाय्य)
  62. "Opportunity Cost". Economics A–Z. The Economist. 9 October 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-09-18 रोजी पाहिले.
  63. मिसेस (१९४९)
  64. Lachmann (1976)
  65. Huerta De Soto (2006)
  66. 1 2 Screpanti, Ernesto; Zamagni, Stefano; Field, David; Kirby, Lynn (2005). An outline of the history of economic thought (2e ed. revised and expanded ed.). Oxford (GB): Oxford university press. ISBN 978-0-19-927914-2. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":9" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  67. 1 2 White, Lawrence H. (2012). The clash of economic ideas: the great policy debates and experiments of the last hundred years. New York: Cambridge University Press. ISBN 978-1-107-01242-4. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":10" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  68. The Theory of Money and Credit, Mises (1912, [1981], p. 272)
  69. Garrison, Roger Wayne (2006). Time and money: the macroeconomics of capital structure. Foundations of the market economy (transferred to digital printing ed.). London: Routledge. ISBN 978-0-415-77122-1.
  70. Hayek, Friedrich August (1984). 1980s Unemployment and the Unions: Essays on the Impotent Price Structure of Britain and Monopoly in the Labour Market. Institute of Economic Affairs. ISBN 9780255361736.
  71. Carney, John (2012-11-29). "Krugman Isn't (Quite) Right About Austrian Economics". CNBC (इंग्रजी भाषेत). 2026-04-20 रोजी पाहिले.
  72. Lavoie, Don; Boettke, Peter J.; Storr, Virgil Henry (2015). Rivalry and central planning: the socialist calculation debate reconsidered. Advanced studies in political economy. Arlington, Virginia: Mercatus Center, George Mason University. ISBN 978-1-942951-12-4.
  73. F. A. Hayek (1935), "The Nature and History of the Problem" and "The Present State of the Debate," om in F. A. Hayek, ed. Collectivist Economic Planning, pp. 1–40, 201–243.
  74. 1 2 "The socialist calculation debate". February 18, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 20, 2020 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "School" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  75. von Mises, Ludwig. "The Principle of Methodological Individualism". Human Action. Ludwig von Mises Institute. 22 April 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-04-24 रोजी पाहिले.
  76. Murray Rothbard, America's Great Depression.
  77. Garrison, Roger Wayne (2001). Time and money: the macroeconomics of capital structure. Foundations of the market economy (1. publ ed.). London: Routledge. ISBN 978-0-415-07982-2.
  78. Hughes, Arthur Middleton (March 1997). "The recession of 1990: An Austrian explanation". The Review of Austrian Economics (इंग्रजी भाषेत). 10 (1): 107–123. doi:10.1007/BF02538145. ISSN 0889-3047.
  79. Selgin, George (1996). Bank deregulation and monetary order. International studies in money and banking. London New York: Routledge. ISBN 978-0-415-14056-0.
  80. White, Lawrence H. (1999). "Why Didn't Hayek Favor Laissez Faire in Banking?" (PDF). History of Political Economy. 31 (4): 753–769. doi:10.1215/00182702-31-4-753. 12 April 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 11 April 2013 रोजी पाहिले.
  81. Dowd, Kevin (1993). Laissez-faire banking. Foundations of the market economy series. London New York: Routledge. ISBN 978-1-134-77563-7.