ऑलिंपिक खेळांमध्ये भारतीय महिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय महिला या पानावरून पुनर्निर्देशित)
कर्णम मल्लेश्वरी ही देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी पहिली महिला होती.

आजपर्यंत अनेक भारतीय महिलांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. यापूर्वी सात महिलांनी आतापर्यंत ऑलिम्पिक पदक जिंकले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:- कर्णम मल्लेश्वरी, मेरी कॉम, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, सायखोम मीराबाई चानू आणि लोव्हलिना बोरगोहेन. साक्षी ही एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहे आणि तिने रिओ २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून दिले. उर्वरित माहिती खाली दिली आहे.

दिल्ली येथे ऑलिम्पिक ज्योत हातात घेतलेली के. मल्लेश्वरी (२००४)

ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी होती. तिने २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंगमधील ६९ किलो गटात कांस्यपदक जिंकले होते.[१][२][३]

२०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये, महिला बॉक्सिंगला प्रथमच एक खेळ म्हणून स्वीकारले गेले. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व पाच वेळा विश्वविजेती राहिलेल्या मेरी कॉमने केले होते, जी या स्पर्धेसाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय होती.[४] परंतु, उपांत्य फेरीत तिला यूकेच्या निकोला अॅडम्सकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत ती तिसऱ्या स्थानावर राहिली आणि तिने देशाला ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवून दिले.[५]

साक्षी मलिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने रिओ येथे आयोजित २०१६ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५८ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. सायना नेहवाल ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय होती.[६] २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने ४ ऑगस्ट २०१२ रोजी कांस्यपदक जिंकले. गीता फोगट ही लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये महिलांच्या ५५ किलो वजनी कुस्तीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला होती. महिला कुस्तीची घोषणा २००४ मध्ये करण्यात आली होती.[७]

पी.व्ही. सिंधू ही दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Conversations: 'I Did What I Could For My Country' - TIME". web.archive.org. 2011-11-18. Archived from the original on 2011-11-18. 2022-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ "कर्णम मल्लेश्वरी ने सिडनी ओलिंपिक में मेडल जीतकर रचा था इतिहास, बन गईं थीं 'आयरन लेडी ऑफ इंडिया'". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2021-07-12. 2022-02-04 रोजी पाहिले.
  3. ^ "कर्णम मल्लेश्वरी: ओलिंपिक में मेडल जीतने वाली पहली भारतीय महिला जो सब के लिए बनी प्रेरणा". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2020-05-26. 2022-02-04 रोजी पाहिले.
  4. ^ May 18, PTI / Updated:; 2012; Ist, 17:29. "Mary Kom qualifies for London Olympics | undefined News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-04 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ Aug 8, PTI / Updated:; 2012; Ist, 23:03. "Mary Kom didn't play her natural game, say pugilists | undefined News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-04 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  6. ^ "Saina first Indian shuttler to win Olympic medal - - Olympics News London 2012 | MSN India". web.archive.org. 2012-08-06. Archived from the original on 2012-08-06. 2022-02-04 रोजी पाहिले.
  7. ^ Apr 1, PTI | Updated:; 2012; Ist, 18:08. "Geeta becomes first Indian women wrestler to make Olympic cut | undefined News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-04 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)