ऑलिंपिक एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक एअर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ऑलिंपिक एर ही ग्रीस मधील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. ही एजियन एरलाइन्सची सहायकारी एरलाइन आहे. या कंपनीची सुरुवात ६ एप्रिल, इ.स. १९५७ रोजी ऑलिम्पिक एरवेज नावाने झाली. ही कंपनी बंद झाल्यानंतर २९ सप्टेंबर २००९ रोजी ऑलिम्पिक एरची मर्यादित स्वरुपात सेवा सुरू झाली. पुढील दोनच दिवसात म्हणजे १-१०-२००९ रोजी या कंपनीचे कार्यालयीन कामकाज चालू झाले. याचे अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुख्य केंद्र आहे आणि ऱ्होडस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुय्यम सेवा केंद्र आहे. या एरलाइन्सची मुख्य कार्यालये स्पार्टा येथिल अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमारत क्रमांक ५७ मध्ये आहेत.[१]

ऑलिम्पिक एर प्रथम IATA कोड OA, त्यानंतर ICAO कोड OAL व नंतर OAL कोड वापरू लागली.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


इतिहास[संपादन]

१६ सप्टेंबर २००८ रोजी ग्रीस सरकारने ऑलिम्पिक एरलाइन्समध्ये बदल करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पॅंथिऑन एरवेजची मदत घेतली आणि ऑलिम्पिक एरलाइन्सचे खाजगीकरण करण्याचे ठरविले.[२] एप्रिल २००९ पर्यंत पॅंथिऑन एरवेजने ऑलिम्पिक एरलाइन्स बरोबर विमान सेवा पुरवली आणि ऑलिम्पिक एरलाइन्सची सेवा बंद झाल्यानंतर सर्व मार्गांवर पॅंथिऑन एरवेजने विमान सेवा पुरवली. पॅंथिऑनचे नाव ऑलिम्पिक केले गेले आणि सहा वर्तुळ लोगो वापरावयाचे. ऑलिम्पिक एरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना आणि मालमत्तेला ऑलिम्पिक एरमध्ये सरळ सामाऊन घेण्याचे कायदेशीर हक्क नव्हते.

मालकी[संपादन]

ऑलिम्पिक एर १००% मालकीची आहे. एजीयन एरलाइनने ७२ दशलक्ष पौंडला ही खरेदी केली व त्याची परतफेड हफ्ते पद्धतीने करण्याचे ठरले आहे.[३] दि. २२ ऑक्टोबर २०१२ रोजी २० दशलक्ष पौंड दिले आणि बाकी ५ हप्त्यात वार्षिक हप्त्याने देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता २२ ऑक्टोबर २०१३ रोजी दिला होता. दोन्ही एरलाइनचे लोगो जसेच्या तसे वापरात आणावयाचे ठरले.

व्यवसाय कल[संपादन]

ऑलिम्पिक एर सन २००९ या वर्षी चालू झाल्यापासून तिचे एजियन एरलाइन कडे हस्तांतर होईपर्यंत तोट्यात होती. जरी ती आत्तापर्यन्त स्वतंत्रपणे स्वताच्या ब्रॅंडने विमान सेवा पुरवत होती तरी तिचे पूर्ण व्यवहार एजियन एर ग्रुपशी निगडीत होते. डिसेंबरच्या अखेरपर्यंत तिचे आर्थिक व इतर बाबी पुढीलप्रमाणे होत्या.

२००९ ऑक्ट-डिसे २०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५
उलाढाल (दशलक्ष पौंड) ६३.३ ३३.४ २४०.५ २१६.३ १७१.६ १०६.१ आत्ता
विना कर नफा (दशलक्ष पौंड) -८१.२ -७९.६ -३८.६ -६.८ -१२.७ २२.९ एजिन
निव्वळ नफा (दशलक्ष पौंड) -८१.६ -८०.९ -३७.६ -८.६ -१३.९ ३२.९ संघाचा
एकूण कर्मचारी(वर्ष अखेर) ११८३ १११२ ९३९ ७३३ ४५० ३२७ एक
एकूण प्रवाशी (दशलक्ष) ४.३ ३.४ २.९ ०.५ भाग
प्रवासी लोड (%) ६४ ६३ ६३ ६८ ६२
एकूण विमाने (वर्ष अखेर) ३२ २९ २४ १९ १५ १४ १४
टीप / साधन

(*वरील परिस्थिति वरून लक्षात येते की या विमान सेवेची सुरुवात २९ सप्टेंबर २००९ रोजी झाली होती.) (**जरी एजियन आईर्लिनने या एरलाइनचा २३ ऑक्टोबर २०१३ रोजी ताबा घेतला असला तरी त्या वर्षीचे सर्व आकडे या एरलाइनचे आहेत.पुढील दोन वर्षाचे आकडे दोन्ही एर लाइनचे एकत्रित आहेत.)

चिन्ह[संपादन]

या एर लाइनचा लोगो पदाधिकाऱ्यांची ऑन लाइन मते घेऊन ठरविला. ओलोगो.जीआर या वेब साईट वर तीन चिन्हे होती त्यातिल आवडत्यावर मत देण्याचे होते. जियाणीस पापथन्सियूस आणि त्रिनांताफील्लोपौळस यांनी ती चिन्हे तयार केलेली होती त्यातील ऑलिम्पिक एर लाइन हे चिन्ह जिंकले. हा लोगो म्हणजे ग्रीस आणि ५ खंड असा ६ वर्तुळांचा समुदाय आहे.[४] ऑलिम्पिक एर लाइनचे कर्मचाऱ्यांच्यासाठी ड्रेस कोड ही तीन निवडक नमुन्यातून पदाधिकाऱ्यांच्या मतदानाने ठरविला आणि तो तयार करण्यासाठी तज्ञांना पाचारण केले.त्यातील केलीय कृथरीओटी यांनी सर्व ड्रेस बनविले तेच कर्मचारी वापरू लागले.

विमान संच[संपादन]

ऑलिम्पिक एर लाइनचा सरासरी १० ते ८ वर्ष वय असणारा विमान संच खालील प्रमाणे आहे.[५]

विमाने सेवेत असणारी मागणी प्रवाशी शेरा
एटीआर ४२-६०० TBD SX-OAW हे जुलै २०१६ मध्ये मिळण्याची श्याका व SX-OAW हे ऑगस्ट २०१६ मध्ये मिळणण्याची शक्यता आहे.
बोंबर्डीर डास ८-१०३ - ३७
बोंबर्डीर डास ८क्यू४०० १० ७८
एकूण १४

विमान प्रशिक्षण केंद्र[संपादन]

नोवेंबर २००९ मध्ये विमान चालविणे प्रशिक्षन चालू झाले.सभासदांनी ऑलिम्पिक एर आणि डेल्टा एर लाइन विमानाकडून अनेक मैल प्रवास मिळविला आणि भाडेपत्त्याने कार आणि हॉटेल सेवा सुद्धा! सभासदासाठी ब्ल्यु,शिल्व्हर आणि गोल्ड असया तीन वर्गवारी ठेवलेल्या होत्या. या क्लबचे सभासदासाठी या एर लाइन ने ३००० किलोमीटर प्रवासाचा बोनस जाहीर केलेला होता. २४ नोवेंबर २०१४ रोजी एजियन एर लाइन ने हे केंद्र आपल्याकडे वर्ग करून घेतले.

अवॉर्ड[संपादन]

  • २०१० कार्पोरेट कमुनिकेशन साठी शील्व्हर एफ्फी अवॉर्ड
  • २०१० / २०११ एर लाइन ऑफ द यर म्हणून ERA शिल्व्हर अवॉर्ड[६]
  • २०११ टॉप डोमेस्टिक एर लाइन म्हणून कोंडेज नास्ट ट्रवल्लस २०११ रीडर्स चॉइस अवॉर्ड

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ऑलिम्पिक एर हेललेनिक पॅरालिम्पिक समिती अधिकृत प्रायोजक बनली".
  2. ^ "ऑलिम्पिक एरलाईन्स कंपनी बद्दल".
  3. ^ "एजियननी ऑलिम्पिक एरची मालकी संपादन केली".
  4. ^ "ऑलिम्पिक एरचा चिन्ह (लोगो)".
  5. ^ "ऑलिम्पिक एरच्या विमान संच बद्दल".
  6. ^ "ऑलिम्पिक एर ला ERA सिल्वर अवॉर्ड मिळाला".