ऑरोव्हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑरोविलचे प्रतीक

मातृमंदिर, ऑरोविल
मातृमंदिर, ऑरोविल

ऑरोविलचे प्रतीक[संपादन]

केंद्रस्थानी असलेला बिंदू ऐक्याचे प्रतीक आहे, परमश्रेष्ठाचे प्रतीक आहे; आतील वर्तुळ हे निर्मितीचे, नगरीच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते; बाहेरील पाकळ्या त्या संकल्पनेच्या अभिव्यक्तीचे, मूर्तरूपाचे सामर्थ्य दर्शवितात.

ऑरोविलचे स्थान[संपादन]

ऑरोव्हिल तथा ऑरोविल हे भारतातील एक शहर आहे. ही एक आहे प्रायोगिक वैश्विक नगरी आहे. ही नगरी विल्लुपुरम जिल्हा, तामिळनाडू येथे आहे. भारतातील पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ ही नगरी आहे.

ऑरोविलची स्थापना आणि हेतू[संपादन]

श्रीमाताजींच्या ऊर्फ मीरा अल्फान्सा यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने ऑरोविल या आंतरराष्ट्रीय नगरीची स्थापना करण्यात आली. दि. ०२८ फेब्रुवारी १९६८ रोजी, तामिळनाडूच्या दक्षिणेस पाँडिचेरीच्या उत्तरेस, युनेस्को समर्थित हा आंतरराष्ट्रीय समुदाय स्थापन करण्यात आला. मानवी एकता साध्य करणे हे या आंतरराष्ट्रीय नगरीचे ध्येय आहे. इ.स.१९६० मध्ये श्रीमाताजीनी ऑरोविल या प्रायोगिक नगरीची संकल्पना भारताच्या सरकारपुढे मांडली आणि त्यांच्या पाठिंब्याने ती युनेस्कोमध्ये मांडण्यात आली. इ.स.१९६८ मध्ये मानवतेच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून युनेस्कोने त्यास एकमताने मान्यता दिली.

ऑरोविलच्या स्थापना-दिनी श्रीमाताजींनी फ्रेंच भाषेत भाषण दिले होते आणि ते ऑल इंडिया रेडिओ वरून थेट प्रसारित करण्यात आले होते. श्रीमाताजींनी दिलेल्या संदेशात ऑरोविलचा हेतू स्पष्ट केला तो असा - ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे.

ऑरोविल नगरीचा उद्घाटन सोहळा[संपादन]

ऑरोविल ह्या उषानगरीच्या प्रकल्पाचे उद्घाटन दि.२८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. १२४ देशांतील व भारताच्या २३ राज्यांतील प्रत्येकी एक युवक व एक युवती अशा प्रतिनिधींनी आपापल्या मायभूमीतून मूठभर माती आणली आणि ती ऑरोविलच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संगमरवरी कमळामध्ये समारंभपूर्वक ठेवण्यात आली. श्रीमाताजींनी फ्रेंचमध्ये लिहिलेली ऑरोविलची सनद देखील ह्यासोबत ठेवण्यात आली. अशाप्रकारे ऑरोविलची पायाभरणी झाली. वैश्विक एकतेचा पाया रचला गेला.

ऑरोविलची सनद[संपादन]

०१) ऑरोविल ही कोणा एकाची मालमत्ता नव्हे. ऑरोविल हे अखिल मानववंशासाठी आहे. पण ऑरोविलमध्ये राहावयाचे असल्यास व्यक्ती ही दिव्य चेतनेची स्वेच्छाभावी सेवक असावयास हवी. ०२) ऑरोविल हे कधीही न संपणाऱ्या शिक्षणाचे, सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि वार्धक्यविरहित तारुण्याचे स्थान असेल. ०३) ऑरोविल भूतकाळ आणि भविष्यकाळ यांतील सेतू बनण्याची मनीषा बाळगत आहे. आंतरिक आणि बाह्य शोधांचे लाभ घेत, ऑरोविल हे भावी साक्षात्कारांच्या दिशेने धीटपणे झेपावेल. ०४) खऱ्याखुऱ्या मानवी एकतेचे मूर्तरूप व्हावे या हेतूने केलेल्या भौतिक व आध्यात्मिक संशोधनांचे ऑरोविल हे स्थान असेल.

युनेस्कोसाठी दिलेला संदेश[संपादन]

दि. ०१ फेब्रुवारी १९७२ रोजी श्रीमाताजींनी युनेस्कोसाठी संदेश लिहून दिला. तो असा - अतिमानसिक वास्तवाचे आगमन पृथ्वीवर त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविलची निर्मिती आहे. जग जसे असावयास हवे तसे ते नाही असे ज्यांना वाटते त्या सर्वांच्या सहकार्याचे येथे स्वागत आहे. प्रत्येकाला हे माहीत असावयासच हवे की, त्याला मृत्युपंथाला लागणाऱ्या जुन्यापुराण्या जगामध्ये सहयोगी व्हावयाचे आहे का जन्मण्याच्या तयारीत असणाऱ्या नूतन अशा, अधिक चांगल्या जगतासाठी कार्य करावयाचे आहे.

ऑरोविलवासी[संपादन]

आज ऑरोविलमध्ये सुमारे ५९ देशांमधील सर्व वयोगटातील, सर्व जाती-धर्माचे, भाषांचे, विविध संस्कृतींचे सुमारे २५०० नागरिक राहतात. त्यातील सर्वात मोठे प्रमाण हे भारतीय नागरिकांचे आहे. ते १/३ इतके आहे.

ऑरोविल नगर-रचना[संपादन]

ऑरोविलच्या केंद्रस्थानी मातृमंदिर आहे आणि त्याच्या भोवती असणारे १२ बगिचे आहेत - हे बगिचे अस्तित्व, चेतना, परमानंद, प्रकाश, जीवन, शक्ती, ऐश्वर्य, उपयोगिता, प्रगती, तारुण्य, सुसंवाद, परिपूर्णत्व यांचे प्रतिनिधित्व करतात, ते ऑरोविलच्या मध्यवर्ती भागात आहेत. या केंद्राच्या सभोवार चार क्षेत्रं विस्तारलेली आहेत. औद्योगिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, आंतरराष्ट्रीय क्षेत्र आणि सांस्कृतिक क्षेत्र ही ती चार क्षेत्र आहेत.

औद्योगिक क्षेत्र[संपादन]

निवासी क्षेत्र[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्षेत्र[संपादन]

या क्षेत्रामध्ये प्रत्येक खंडातील देशांना स्थान असेल असे अपेक्षित आहे. त्या त्या देशाची लोकसंस्कृती, खाद्यपदार्थ, पेहराव, राहणीमान या सगळ्याची परस्परांना ओळख व्हावी हा यातील हेतू आहे. येथे आत्तापर्यंत तिबेट, भारत यासहित चार देशांची दालने तयार झालेली आहेत.

सांस्कृतिक क्षेत्र[संपादन]

कला, क्रीडा, संस्कृती आणि शिक्षण, संशोधन यांचे हे क्षेत्र आहे. येथील शिक्षण हे व्यक्तीच्या सामाजिक किंवा आर्थिक स्थानानुसार निर्धारित होत नाही, तर प्रत्येक व्यक्तीला तिला जे शिक्षण घेण्याची इच्छा असेल ते मुक्तपणे मिळण्याची सोय आहे.


ऑरोविल फौंडेशनचे अध्यक्ष[संपादन]

  • करण सिंग – माजी केंद्रीय मंत्री, १९९१
  • डॉ. एमएस स्वामीनाथन – प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ *
  • डॉ. किरीट जोशी – भारत सरकारचे माजी विशेष शैक्षणिक सल्लागार

सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळा[संपादन]

इ.स.२०१८ मध्ये या नगरीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्यानिमित्त झालेल्या समारंभामध्ये मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.

ऑरोविलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित प्रकाशित तिकीट
ऑरोविलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित प्रकाशित तिकीट


अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

संदर्भ[संपादन]