ऐसी अक्षरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


२०११ सालच्या दिवाळीत, २६ ऑक्टोबर रोजी ऐसीअक्षरे.कॉम[१] हे संस्थळ सुरू झाले. पारंपरिक - छापील आणि अपारंपरिक (इलेक्ट्रॉनिक) माध्यमांमधला दुवा बनणे, मराठी साहित्यिक, बुद्धिवंतांच्या भेटीगाठी घडवून आणणे अशी ऐसी अक्षरेची उद्दिष्ट्ये आहेत.[२]

मराठी संस्थळांवर लिहित्या सदस्यांना संपादन-व्यवस्थापनाचे मर्यादित अधिकार देणारे ऐसी अक्षरे हे पहिले संस्थळ आहे. उदा. श्रेणीव्यवस्था[३] आणि धाग्यांना तारे देण्याची सुविधा[४]. वेगवेगळ्या व्यवसायांत असणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, लेखन ऐसी अक्षरेवर प्रसिद्ध होत असते. उदा.लेखक किरण नगरकर यांची तीन भागांत मुलाखत[५]. याशिवाय कोणताही विषय मांडण्यासाठी संस्थळाच्या सदस्यांना संपूर्ण अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळते. ऐसी अक्षरेच्या २०१४ सालच्या दिवाळी अंकाचा उल्लेख लोकसत्ताने 'सर्वोत्तम ऑनलाइन दिवाळी अंक' [६] असा केला. २०१५ सालच्या दिवाळी अंकाला[७] महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ऑनलाइन दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला.[८]

  1. "नवीन लेखन | ऐसीअक्षरे". www.aisiakshare.com. 2018-05-01 रोजी पाहिले. 
  2. "संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 2018-09-30 रोजी पाहिले. 
  3. "श्रेणीसंकल्पनेची माहिती | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 2018-09-30 रोजी पाहिले. 
  4. "धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 2018-09-30 रोजी पाहिले. 
  5. "किरण नगरकर मुलाखत : भाग १ । जडणघडणीविषयी | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 2018-09-30 रोजी पाहिले. 
  6. "स्वागत दिवाळी अंकांचे". Loksatta (mr-IN मजकूर). 2014-10-27. 2018-05-01 रोजी पाहिले. 
  7. "नव्वदोत्तरी - दिवाळी अंक २०१५ | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 2018-05-01 रोजी पाहिले. 
  8. "‘मसाप’च्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2016-03-25. 2018-05-01 रोजी पाहिले.