Jump to content

ए. सीमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ए. सीमा
शिक्षण अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी, पी.एचडी.
ख्याती स्तनाचा कर्करोग ओळखण्याचे साधन निर्मिती
पदवी हुद्दा शास्त्रज्ञ
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार

ए. सीमा ह्या केरळमधील एक महिला शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी स्तनाधारपट्टिका (ब्रा) विकसित करणाऱ्या टीमचे नेतृत्व केले होते. सदरील ब्रा घातलेल्या महिलेला स्तनाचा कर्करोग आहे की नाही हे या ब्राच्या मदतीने ओळखून येते. व्यावसायिक विकासासाठी पाठवल्यानंतर, सीमा आणि त्यांच्या टीमच्या कामासाठी सीमा यांना २०१९ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जीवन

[संपादन]

सीमा ह्या केरळ राज्यातील कोझिकोड या मोठ्या शहरात राहतात. त्यांनी प्रथम तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी मिळवून नंतर विद्यावाचस्पती (पी.एचडी.) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ती केरळमधील सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET) नावाच्या संशोधन सुविधेत सामील झाली. []

सीमा आणि त्यांच्या टीमला थॅलेसेरी येथील मलबार कॅन्सर सेंटरने[] आवाहन केले होते की एखाद्या महिलेला स्तनाचा कर्करोग आहे की नाही हे निदान करण्यासाठी एक्स-रे मशीनपेक्षा अधिक सुटसुटीत हाताळण्याजोगे उपकरण शोधण्यासाठी काम करावे.[] त्यांनी तयार केलेले उपकरण स्पोर्ट्स ब्रासारखे दिसते आणि ते काही काळ घालून त्याद्वारे निदान करता येते. हे उपकरण मॅमोग्राम करण्यापेक्षा खूपच सोपे आहे एवढेच नाही तर नवीन उपकरणाला प्रक्रियेचे पर्यवेक्षण करण्यासाठी रेडिओलॉजिस्टची आवश्यकता नाही.[] या नवीन उपकरणाचा फायदा असा आहे की ते पंधरा वर्षांच्या महिला आणि मुली देखील वापरू शकतात. शरीराचा आकाराची अडचण यात येत नाही, तसेच या उपकरणाची किंमत सुमारे R$४५० असण्याची अपेक्षा आहे.[]

यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सीमा यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. ४१ महिलांना स्वतंत्रपणे आणि तीन महिलांना गटांमध्ये हा पुरस्कार देण्यात आला.[] यावेळी महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी तिथे होत्या आणि त्यानंतर पुरस्कार विजेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c Thomas, Elizabeth (2019-05-12). "Guts and glory!". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  2. ^ a b "This Kerala Scientist Won The Nari Shakti Puraskar For Devising A Bra To Detect Breast Cancer". IndiaTimes (इंग्रजी भाषेत). 2019-03-17. 2021-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ Pandit, Ambika (8 March 2019). "From masons, barbers to creators of forests and sustainable homes, nari shakti takes charge". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-05-13 रोजी पाहिले.
  4. ^ Mohammed, Irfan (2019-03-20). "India president confers Manju with Nari Shakti Puraskar award". Saudigazette (English भाषेत). 2021-01-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)