ए.बी.ए. घनी खान चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ए.बी.ए. घनी खान चौधरी (नोव्हेंबर १, इ.स. १९२७- एप्रिल १४, इ.स. २००६) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मालदा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इंदिरा गांधी सरकारमध्ये इ.स. १९८० ते इ.स. १९८२ दरम्यान उर्जामंत्री आणि इ.स. १९८२ ते इ.स. १९८४ दरम्यान रेल्वेमंत्री होते. लोकसभेत निवडून जाण्यापूर्वी ते इ.स. १९५२ ते इ.स. १९८० या काळात पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य होते.