एस.के. शिवकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस.के.शिवकुमार

एस.के.शिवकुमार २०१५ मध्ये
जन्म १९५३
म्हैसूर, भारत
मृत्यू १३ एप्रिल २०१९ (वय ६६)
बंगलोर, कर्नाटक, भारत
नागरिकत्व भारतीय
कार्यक्षेत्र स्पेस कम्युनिकेशन्स
कार्यसंस्था माजी संचालक, भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना उपग्रह केंद्र
माजी संचालक, इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग व कमांड नेटवर्क
पुरस्कार पद्मश्री (२०१५)
कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार (२००८)

एस. के. शिवकुमार (१९५३ - १३ एप्रिल २०१९) हे कर्नाटक राज्यातील भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना (इस्रो) केंद्रांवर काम केले. २०१५ मध्ये त्यांना भारतातील चौथ्या सर्वोच्च क्रमांकाचा नागरिक पुरस्कार, पद्मश्री, देऊन गौरवण्यात आला.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण[संपादन]

शिवकुमार यांचा जन्म १९५३ मध्ये मैसूरमध्ये (आता कर्नाटक), भारत येथे झाला. त्यांनी मैसूर विद्यापीठातील बीएससी आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंगमध्ये बीईसी पदवी मिळविली. तसेच इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून फिजिकल इंजिनिअरिंगमधील एमटेक पूर्ण केले. २०१४ मध्ये कुवेम्पू विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएचडी प्राप्त केली.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The men behind the mission". NDTV. 22 October 2008. Archived from the original on 26 October 2008. 31 October 2008 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ "Dr. S K Shivakumar". www.isac.gov.in. 15 April 2019 रोजी पाहिले.