एस्टोनिया क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५
एस्टोनिया क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी माल्टाचा दौरा केला.[१]
दौऱ्यातील सर्व सामने मार्सा येथील मार्सा स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात आले. आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेपूर्वी ३ आणि ४ मे २०२५ रोजी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी१० मालिका खेळवण्यात आली. माल्टाने पाचही सामने जिंकून टी१० मालिका ५–० अशी जिंकली.[२]
तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ६ आणि ७ मे २०२५ रोजी खेळवण्यात आली. माल्टाने पहिला सामना २६ धावांनी जिंकला. एस्टोनियाने दुसरा सामना चार गडी राखून जिंकत मालिकेत बरोबरी साधली. माल्टाने तिसरा सामना १०१ धावांनी जिंकून मालिका २–१ अशी जिंकली.[३]
मालिकेत माल्टाच्या प्रियन पुष्पराजनने सर्वाधिक १६७ धावा केल्या आणि सर्वाधिक सहा बळी घेतले. एस्टोनियाच्या स्टेफन गूचने सर्वाधिक १२५ धावा केल्या. एस्टोनियासाठी अर्सलान अमजद, स्टेफन गूच, प्राणय घीवाला आणि हबीब खान यांनी प्रत्येकी चार बळी घेतले.[४]
संघ
[संपादन]
|
टी१० मालिका
[संपादन]पहिला टी१० सामना
[संपादन]दुसरा टी१० सामना
[संपादन]तिसरा टी१० सामना
[संपादन]चौथा टी१० सामना
[संपादन]पाचवा टी१० सामना
[संपादन]आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]दुसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]वि |
||
प्रियन पुष्पराजन १०३ (४० चेंडू) अली मसूद ३/३२ (४ षटके) |
रुपम बरुआ ४८ (२२ चेंडू) डेव्हिड मार्क्स २/२५ (४ षटके) जसविंदर सिंग २/२९ (४ षटके) प्रियन पुष्पराजन २/२ (१ षटक) |
- एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Malta Cricket to host Men's and Women's T20I series in May 2025" [माल्टा क्रिकेट मे २०२५ मध्ये पुरुष आणि महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिकांचे आयोजन करणार]. झारस्पोर्ट्झ ग्लोबल (इंग्रजी भाषेत). १५ एप्रिल २०२५. ३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Malta Tour Wrap: Swieqi Shine, Malta Dominate in ECIs and T20Is" [माल्टा दौऱ्याचा आढावा : ईसीआय आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिकांमध्ये माल्टाचे वर्चस्व]. युरोपियन क्रिकेट नेटवर्क (इंग्रजी भाषेत). १० मे २०२५. 2026-02-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Estonia tour of Malta 2025 – Fixtures and Results" [एस्टोनिया क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५ – सामने आणि निकाल]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Estonia tour of Malta, 2025 – Statistics" [एस्टोनिया क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५ – आकडेवारी]. क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- 1 2 "Estonia Tour of Malta 2025, Live Streaming: Schedule, Guide – All You Need To Know" [एस्टोनिया क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५ : वेळापत्रक, मार्गदर्शिका आणि संघ]. आउटलुक इंडिया (इंग्रजी भाषेत). ५ मे २०२५. ३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Estonia tour of Malta 2025 – Team Players" [एस्टोनिया क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५ – संघातील खेळाडू]. स्पोर्ट्स तक (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Malta vs Estonia 2025 Squads" [माल्टा विरुद्ध एस्टोनिया, २०२५ – संघ]. क्रिकट्रॅकर (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

