Jump to content

एव्हीजी अँटिव्हायरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एव्ही़जी अँटिव्हायरस
antivirus software
स्थापना1991 संपादन
विकसकAVG Technologies संपादन
चालन प्रणाली (ओएस)विंडोज एक्सपी, ओएस एक्स, ॲन्ड्रॉइड संपादन
संचेतन आवृत्ती24.8.9372 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.avg.com संपादन
परवानाproprietary license संपादन
Business modelfreemium संपादन

एव्हीजी अँटीव्हायरस हा संगणक आणि उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी वापरला जाणारे एक अँटीव्हायरस उपयोजन सॉफ्टवेर आहे.[] याची निर्मिती सुरुवातीला १९९२ मध्ये चेक प्रजासत्ताक (तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया) मधील ग्रिफसॉफ्ट या कंपनीने केली होती. या कंपनीचे नाव नंतर एव्हीजी टेक्नॉलॉजीझ' असे झाले. एव्हीजी हे अँटी-व्हायरस गार्ड या नावाचे संक्षिप्त रूप आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट विंडोझ, मॅक ओएस आणि अँड्रॉइड यांसारख्या विविध कार्यप्रणालींवर उपकरणांना विविध संगणकीय व्हायरस, मालवेर, आणि स्पायवेरपासून संरक्षण देते.[]

हे उपयोजन फ्रीमियम मॉडेल अंतर्गत उपलब्ध आहे, ज्यामध्ये मूलभूत सुरक्षेसाठी मोफत आवृत्ती आणि प्रगत सुरक्षेसाठी व्यावसायिक असते.[] या सॉफ्टवेरमध्ये रिअल-टाईम स्कॅनिंग, ईमेल स्कॅनिंग, वेब सुरक्षितता आणि फिशिंग-विरोधी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. २०१६ मध्ये सायबर सुरक्षा कंपनी अव्हास्टने एव्हीजी टेक्नॉलॉजीझ विकत घेतली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "AVG AntiVirus". Wikipedia.
  2. "AVG Official Website". AVG.
  3. "AVG Technologies". Wikipedia.