एवा कोपाच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एवा कोपाच

पोलंडची पंतप्रधान
कार्यकाळ
२२ सप्टेंबर २०१४ – १६ नोव्हेंबर २०१५
राष्ट्राध्यक्ष ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की
आंद्रेय दुदा
मागील डोनाल्ड टस्क
पुढील बियाता शिद्वो

सिव्हिक प्लॅटफॉर्मची पक्षाध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१४
मागील डोनाल्ड टस्क

पोलिश संसदेची सभापती
कार्यकाळ
८ नोव्हेंबर २०११ – २२ सप्टेंबर २०१४

जन्म ३ डिसेंबर, १९५६ (1956-12-03) (वय: ६७)
स्कारिशेफ, माझोव्येत्स्का प्रांत, पोलंड
राजकीय पक्ष सिव्हिक प्लॅटफॉर्म
धर्म रोमन कॅथलिक

एवा कोपाच (पोलिश: Ewa Bożena Kopacz[१]; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक पोलिश राजकारणी व पोलंडची माजी पंतप्रधान आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वी कोपाच पोलंडच्या संसदेची सभापती होती. हा मान मिळवणारी ती पोलंडमधील पहिलीच महिला राजकारणी आहे. २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क ह्याने पदाचा राजीनामा देऊन युरोपियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले व त्याच्या जागी कोपाचची पंतप्रधानपदावर निवड करण्यात आली.

ऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपाचच्या सिव्हिक प्लॅटफॉर्म पक्षाला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे कोपाचला पंतप्रधानपद सोडणे भाग पडले. बियाता शिद्वो ही पोलंडची नवी पंतप्रधान असेल.

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "Biuletyn Informacji Publicznej Instytutu Pamięci Narodowej". katalog.bip.ipn.gov.pl. 2019-05-12 रोजी पाहिले.