एलीनॉर रूझवेल्ट
American diplomat and activist, First Lady of the United States from 1933 to 1945 (1884–1962) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | ऑक्टोबर ११, इ.स. १८८४ मॅनहॅटन Anna Eleanor Roosevelt | ||||
| मृत्यू तारीख | नोव्हेंबर ७, इ.स. १९६२ Upper East Side | ||||
| मृत्युची पद्धत |
| ||||
| मृत्युचे कारण |
| ||||
| चिरविश्रांतीस्थान |
| ||||
| Floruit |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| निवासस्थान |
| ||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय | |||||
| नियोक्ता |
| ||||
| सदस्यता |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| कार्यक्षेत्र |
| ||||
| मातृभाषा |
| ||||
| कुटुंब |
| ||||
| वडील |
| ||||
| आई |
| ||||
| भावंडे |
| ||||
| अपत्य |
| ||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| कर्मस्थळ | |||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
ॲना एलीनॉर रूझवेल्ट (११ ऑक्टोबर, १८८४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका – ७ नोव्हेंबर, १९६२) या एक अमेरिकन राजकीय व्यक्तिमत्व, मुत्सद्दी आणि कार्यकर्त्या होत्या.[१][२] त्यांचे पती फ्रँकलिन डि. रुझवेल्ट यांच्या १९३३ ते १९४५ या चार अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्या अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या. या पदावर त्या सर्वाधिक काळ होत्या.[१] आपल्या प्रवासातून, सार्वजनिक सहभागातून आणि समर्थनातून त्यांनी या भूमिकेला मोठ्या प्रमाणात नवीन आकार दिला.
कारकीर्द
[संपादन]१९४५ मध्ये आपल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी १९५२ पर्यंत संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून काम केले आणि मानवाधिकार सार्वत्रिक जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यात आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यात अग्रगण्य भूमिका बजावली. १९४८ मध्ये जाहीरनामा स्वीकारल्यावर सभेने त्यांना उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत मानवंदना दिली.[३][४] राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी त्यांच्या मानवाधिकार कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना "जगाची प्रथम महिला" म्हटले.[५]
रूझवेल्ट या प्रतिष्ठित आणि श्रीमंत रुझवेल्ट आणि लिव्हिंगस्टन कुटुंबातील सदस्य आणि माजी राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांच्या भाची होत्या.[४] त्यांचे बालपण दुःखी होते, कारण लहान वयातच त्यांना आई-वडिलांचा आणि एका भावाचा मृत्यू सहन करावा लागला होता. वयाच्या १५ व्या वर्षी, त्यांनी लंडनमधील ॲलेन्सवुड बोर्डिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि तेथील संस्थापक व संचालक मेरी सोवेस्त्रे यांच्याकडून त्या खूप प्रभावित झाल्या. अमेरिकेत परतल्यावर, १९०५ मध्ये त्यांनी त्यांचे पाचवे चुलतभाऊ फ्रँकलिन डेलानो रूझवेल्ट यांच्याशी लग्न केले. १९०६ ते १९१६ दरम्यान त्यांनी सहा मुलांना जन्म दिला, त्यापैकी एकाचा लहानपणीच मृत्यू झाला. १९१८ मध्ये एलीनॉरला तिच्या पतीचे तिची सामाजिक सचिव, लुसी मर्सर हिच्यासोबतचे प्रेमसंबंध कळल्यानंतर रूझवेल्ट दांपत्याचे वैवाहिक जीवन गुंतागुंतीचे झाले. त्यांची सासू सारा हिच्या मध्यस्थीमुळे हे संबंध अधिकृतपणे संपुष्टात आले.[६] त्यानंतर, दोन्ही भागीदारांनी आपापले स्वतंत्र अजेंडे राबवायला सुरुवात केली आणि एलिनॉर विमेन्स ट्रेड युनियन लीगमध्ये सामील झाल्या व न्यू यॉर्क राज्यातील डेमोक्रॅटिक पक्षात सक्रिय झाल्या. १९२१ मध्ये पक्षाघाताच्या आजाराने ग्रस्त झाल्यानंतर, रूझवेल्ट यांनी आपल्या पतीला राजकारणात टिकून राहण्यासाठी राजी करण्यात मदत केली. १९२८ मध्ये फ्रँकलिन न्यू यॉर्कचे गव्हर्नर म्हणून निवडून आल्यानंतर आणि फ्रँकलिनच्या उर्वरित राजकीय कारकिर्दीत, रूझवेल्ट नियमितपणे त्यांच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहत असत; आणि जेव्हा त्यांचे पती राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तेव्हा प्रथम महिला म्हणून त्यांनी या भूमिकेच्या वर्तमान व्याप्तीवर आणि भविष्यावर मोठा प्रभाव टाकला.
रूझवेल्ट त्यांच्या काळात जगातील सर्वात जास्त प्रशंसित आणि शक्तिशाली महिलांपैकी एक होत्या.[६] तरीही, व्हाईट हाऊसमधील त्यांच्या सुरुवातीच्या काळात, त्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे, विशेषतः आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या नागरी हक्कांच्या समर्थनामुळे वादग्रस्त ठरल्या. नियमित पत्रकार परिषदा घेणाऱ्या, दैनिक वृत्तपत्रात स्तंभ लिहिणाऱ्या, मासिकात स्तंभ लिहिणाऱ्या, साप्ताहिक रेडिओ कार्यक्रम सादर करणाऱ्या आणि राष्ट्रीय पक्षाच्या अधिवेशनात भाषण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपतींच्या पत्नी होत्या. काही प्रसंगी, त्यांनी आपल्या पतीच्या धोरणांशी जाहीरपणे असहमती दर्शवली. त्यांनी कार्यस्थळी महिलांच्या विस्तारित भूमिका, आफ्रिकन अमेरिकन आणि आशियाई अमेरिकन लोकांचे नागरी हक्क आणि दुसऱ्या महायुद्धातील निर्वासितांच्या हक्कांसाठी आवाज उठवला.
१९४५ मध्ये आपल्या पतीच्या मृत्यूनंतर रुझवेल्ट यांनी अमेरिकेला संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील होण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रह धरला. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांत प्रवेश केल्यानंतर त्या तेथील मानवाधिकार समितीच्या पहिल्या प्रतिनिधी बनल्या. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष म्हणून काम केले आणि मानवाधिकारांच्या सार्वत्रिक जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्याचे काम पाहिले. नंतर, त्यांनी जॉन एफ. केनेडी प्रशासनाच्या महिलांच्या स्थितीवरील अध्यक्षीय आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या मृत्यूपर्यंत, रूझवेल्ट यांना "जगातील सर्वात प्रतिष्ठित महिलांपैकी एक" मानले जात होते; द न्यू यॉर्क टाइम्सने त्यांच्या मृत्युलेखात त्यांना "जवळजवळ सार्वत्रिक आदराचे पात्र" म्हटले.[७] १९९९ मध्ये, रूझवेल्ट यांना गॅलपच्या "२० व्या शतकातील सर्वाधिक प्रशंसित व्यक्तींच्या यादीत" पहिल्या दहामध्ये नववे स्थान मिळाले होते,[८] आणि गॅलपच्या वार्षिक "सर्वाधिक प्रशंसित महिला" सर्वेक्षणामध्ये १९४८ ते १९६१ दरम्यान तेरा वेगवेगळ्या वर्षांमध्ये त्या सर्वाधिक प्रशंसित महिला म्हणून गणल्या गेल्या.[९]
चरित्र
[संपादन]अॅना इलिनॉर रूझवेल्ट यांचा जन्म ११ ऑक्टोबर १८८४ रोजी मॅनहॅटन, न्यू यॉर्क शहरात,[१०] [११] अॅना रेबेका हॉल आणि इलियट रूझवेल्ट यांच्या घरी झाला.[१२] लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या मधल्या नावाने, इलिनॉर, ओळखले जाणे पसंत होते. त्यांच्या वडिलांच्या बाजूने, त्या राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांच्या भाची होत्या. त्यांच्या आईच्या बाजूने, त्या टेनिस चॅम्पियन व्हॅलेंटाईन गिल "व्हॅली" हॉल तिसऱ्या आणि एडवर्ड लुडलो हॉल यांच्या भाची होत्या.[१३]
एलीनॉरची आई ७ डिसेंबर १८९२ रोजी डिप्थेरियाने मरण पावली आणि तिचा भाऊ इलियट ज्युनियर पुढच्या मे महिन्यात त्याच आजाराने मरण पावला.[१४] तिचे वडील, एक मद्यपी होते ज्यांना सॅनिटोरियममध्ये ठेवण्यात आले, ते १४ ऑगस्ट १८९४ रोजी डिलीरियम ट्रेमेन्सच्या झटक्यात खिडकीतून उडी मारल्यानंतर मरण पावले.[१५] रूझवेल्टच्या बालपणीच्या दुःखांमुळे ती आयुष्यभर नैराश्याला बळी पडली.[१५] तिचा दूसरा भाऊ हॉल नंतर मद्यपानाच्या व्यसनाने ग्रस्त झाला.[१६] रूझवेल्ट हॉलवर खूप प्रेम करायची आणि जेव्हा १९०७ मध्ये त्याने ग्रोटन स्कूलमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा ती त्याच्यासोबत पालक म्हणून गेली.[१७]
तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर, रूझवेल्टचे पालनपोषण न्यू यॉर्कमधील टिवोली येथील लिव्हिंगस्टन कुटुंबातील तिच्या आईच्या आजी, मेरी लिव्हिंगस्टन लुडलो हॉल यांच्या घरी झाले.[१८] असुरक्षित आणि प्रेमासाठी भुकेलेली असल्यामुळे, ती स्वतःला "कुरूप बदक" समजत असे.[१९] तथापि, रूझवेल्टने वयाच्या १४ व्या वर्षी लिहिले की: "एखादी स्त्री कितीही साधी असली तरी, जर तिच्या चेहऱ्यावर सत्य आणि निष्ठा यांची छाप असेल, तर सर्वजण तिच्याकडे आकर्षित होतील."[२०]
१९०२ च्या उन्हाळ्यात, रूझवेल्टची तिच्या वडिलांचे पाचवे चुलतभाऊ, फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट, यांच्याशी न्यू यॉर्कमधील टिव्होलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये भेट झाली.[२१] त्या दोघांमध्ये गुप्त पत्रव्यवहार आणि प्रेमसंबंध सुरू झाले आणि २२ नोव्हेंबर १९०३ रोजी त्यांचा साखरपुडा झाला.[३] एलिनॉरचे काका, राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट, जे सेंट पॅट्रिक डे परेडसाठी न्यू यॉर्क शहरात असणार होते, त्यांच्या सोयीसाठी त्या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तारीख १७ मार्च १९०५ निश्चित केली. त्यांनी आपल्या भावाच्या जागी उभे राहून वधूचे कन्यादान करण्यास सहमती दर्शवली.[२२]
एलिनॉर आणि फ्रँकलिन यांना सहा मुले होती:
- अॅना इलिनॉर रूझवेल्ट (१९०६–१९७५)
- जेम्स रूझवेल्ट दुसरा (१९०७–१९९१)
- फ्रँकलिन रूझवेल्ट (१९०९–१९०९)
- इलियट रूझवेल्ट (१९१०–१९९०)
- फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट ज्युनियर (१९१४–१९८८)
- जॉन अस्पिनवॉल रूझवेल्ट (१९१६–१९८१)
सप्टेंबर १९१८ मध्ये एलिनॉरला, फ्रँकलिनच्या एक सुटकेसमध्ये सामाजिक सचिव लुसी मर्सरने त्याला लिहिलेल्या प्रेमपत्रांचा एक गठ्ठा सापडला. तो मर्सरसाठी आपल्या पत्नीला सोडण्याचा विचार करत होता. तथापि, त्याचे राजकीय सल्लागार, लुई होवे, आणि त्याच्या आईच्या दबावामुळे, ते जोडपे विवाहित राहिले.[३] त्या क्षणापासून त्यांचे नाते अधिक राजकीय भागीदारीचे बनले आणि ते जिव्हाळ्याचे राहिले नाही.[६]
ऑगस्ट १९२१ मध्ये, हे कुटुंब कॅनडातील न्यू ब्रन्सविकमधील कॅम्पोबेलो बेटावरील त्यांच्या उन्हाळी घरी सुट्टी घालवत होते, तेव्हा फ्रँकलिन यांना पक्षाघाताचा आजार झाल्याचे निदान झाले, जो त्यावेळी पोलियो असल्याचे मानले जात होते.[२३][२४] आजारपणात, रूझवेल्ट यांनी केलेल्या शुश्रूषेमुळे फ्रँकलिन हे कदाचित मृत्यूपासून वाचले.[२५]
मृत्यू
[संपादन]एप्रिल १९६० मध्ये, न्यू यॉर्क शहरात कारची धडक बसल्यानंतर लगेचच रूझवेल्ट यांना ॲप्लास्टिक ॲनिमियाचे निदान झाले. १९६२ मध्ये, त्यांना स्टिरॉइड्स देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या अस्थिमज्जेतील क्षय रोगाचा सुप्त प्रकार सक्रिय झाला,[२६] आणि ७ नोव्हेंबर १९६२ रोजी, वयाच्या ७८ व्या वर्षी, अप्पर ईस्ट साइडवरील मॅनहॅटनमधील त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.[२७] त्यावेळी त्यांची मुलगी ॲना त्यांची काळजी घेत होती.[२६][२८] राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी रूझवेल्ट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी जगभरातील सर्व अमेरिकन ध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले.[२८]
संदर्भ
[संपादन]- 1 2 Moore, Frazier (September 10, 2014). "PBS' 'The Roosevelts' portrays an epic threesome". Associated Press. September 10, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2014 रोजी पाहिले.
- ↑ Fazzi, Dario (March 7, 2017). "Eleanor Roosevelt's Peculiar Pacifism: Activism, Pragmatism, and Political Efficacy in Interwar America". European Journal of American Studies. 12 (1). doi:10.4000/ejas.11893.
- 1 2 3 Rowley 2010.
- 1 2 "Eleanor Roosevelt Biography". Biography. August 22, 2019. August 23, 2019 रोजी पाहिले.
- ↑ "First Lady of the World: Eleanor Roosevelt at Val-Kill". National Park Service. November 5, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 20, 2008 रोजी पाहिले.
- 1 2 3 [Betty Boyd Caroli Betty Boyd Caroli] Check
|url=value (सहाय्य). Missing or empty|title=(सहाय्य) - ↑ "Mrs. Roosevelt, First Lady 12 Years, Often Called 'World's Most Admired Woman'". The New York Times. November 8, 1962. December 23, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 3, 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Mother Teresa Voted by American People as Most Admired Person of the Century". The Gallup Organization. December 31, 1999. November 4, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 20, 2008 रोजी पाहिले.
- ↑ "Most Admired Man and Woman". August 13, 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Question: Where did ER and FDR live?". George Washington University. November 29, 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 14, 2014 रोजी पाहिले.
- ↑ "The Eleanor Roosevelt Papers Project". gwu.edu.
- ↑ "Eleanor Roosevelt Biography". National First Ladies' Library. June 9, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 13, 2010 रोजी पाहिले.
- ↑ Graham, Hugh Davis (Spring 1987). "The Paradox of Eleanor Roosevelt: Alcoholism's Child". Virginia Quarterly Review. 63 (2): 210–230. PMID 11618247. June 22, 2016 रोजी पाहिले.
- ↑ Goodwin 1994, पान. 94.
- 1 2 Goodwin 1994, पान. 95.
- ↑ Goodwin 1994, पान. 276.
- ↑ Goodwin 1994, पान. 276–77.
- ↑ Goodwin 1994.
- ↑ Lash 1971, pp. 48, 56, 57, 74, 81, 89–91, 108–10, 111–3, 145, 152–5, 160, 162–3, 174–5, 179, 193–6, 198, 220–1, 225–7, 244–5, 259, 273–6, 297, 293–4, 302–3
- ↑ Black, Allida (2009). "Anna Eleanor Roosevelt". White House. March 13, 2010 रोजी पाहिले – National Archives द्वारे.
- ↑ "1884–1920: Becoming a Roosevelt". The Eleanor Roosevelt Papers Project via George Washington University. November 16, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 24, 2012 रोजी पाहिले.
- ↑ de Kay 2012.
- ↑ "F. D. Roosevelt Ill of Poliomyelitis". The New York Times. September 16, 1921. October 18, 2016 रोजी पाहिले.
- ↑ Ward, Geoffrey C.; Burns, Ken (2014). The Roosevelts: An Intimate History. New York: Alfred A. Knopf. p. 236. ISBN 9780307700230.
- ↑ Goldman, Armond S.; Goldman, Daniel A. (2017). Prisoners of Time: The Misdiagnosis of FDR's 1921 Illness. EHDP Press. ISBN 978-1939824035.
- 1 2 "Health". in Beasley, Maurine Hoffman; Holly Cowan Shulman; Henry R. Beasley (2001). The Eleanor Roosevelt Encyclopedia. Greenwood Publishing Group. pp. 230–32. ISBN 978-0-313-30181-0. December 10, 2012 रोजी पाहिले.
- ↑ James Malanowski (July 17, 1959). "Dead & Famous; Where the Grim Reaper has Walked in New York". Spy. April 10, 2013 रोजी पाहिले.
- 1 2 "U.S. Flags Flying at Half-Staff As a Tribute to Mrs. Roosevelt" (PDF). The New York Times. November 9, 1962. April 1, 2009 रोजी पाहिले.
- संदर्भग्रंथ
- Rowley, Hazel (2011). Franklin and Eleanor: An Extraordinary Marriage. Melbourne University Publishing. ISBN 9780522851793.
- Rowley, Hazel (2010). Franklin and Eleanor: An Extraordinary Marriage. Farrar, Straus and Giroux. ISBN 978-0-374-15857-6.
- Goodwin, Doris Kearns (1994). No Ordinary Time. Simon & Schuster. ISBN 978-0-684-80448-4.
- Lash, Joseph P. (1971). Eleanor and Franklin. New York City: W.W. Norton. ISBN 978-1-56852-075-9.
- Lash, Joseph P. (1972). Eleanor: The Years Alone. William S. Konecky. ISBN 978-1568520896.
- Michaelis, Davis. Eleanor (Simon & Schuster, 2020) आयएसबीएन 1439192057.
- de Kay, James Tertius (2012). Roosevelt's Navy. New York: Pegasus. pp. 9–10. ISBN 978-1-60598-285-4.