एलिस (कॅन्सस)
city in Kansas | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | एलिस काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
एलिस हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एलिस काउंटीमध्ये असलेले छोटे शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १,९५८ इतकी होती. [१]
१८६७मध्ये कॅन्सस पॅसिफिक रेल्वेने येथील जागेवर पाणवठा बांधला व नंतर होमस्टेड कायद्यांतर्गत ही जागा खरेदी केली. तीन वर्षांनी १८७०मध्ये यूएस पोस्ट ऑफिस विभागाने येथे टपाल कार्यालय उघडले. [२] अजून तीन वर्षांनी कॅन्सस पॅसिफिकने शहर वसवले व येथे रेल्वे स्थानक, होटेल आणि काही दुकाने उघडली. [३] त्याच वर्षी, सिरॅक्युज आणि नंतर लुईव्हिल येथील लोक रेल्वेसाठी काम करण्यासाठी आले. [४] या सुमारास दक्षिणेकडून काउबॉइझनी हाकत आणलेल्या गुरांच्या कळपांसाठी एलिस हे विश्रांतीचे आणि रेल्वेद्वारे रवाना करण्याचे ठिकाण होते. [२] पुढे बुकोविना जर्मन मध्ये या भागात स्थायिक झाले. [५]
सुरुवातीच्या काळात एलिस (तसेच जवळचे हेस) सनडाउन टाउन होते, जेथे अंधार पडल्यानंतर अश्वेत अमेरिकन लोकांना वावरण्याची मुभा नव्हती. [६]
एलिस नगरपरिषदेत सहा सदस्य आणि एक महापौर असतात. महापौर आणि सर्व परिषद सदस्य दोन वर्षांसाठी निवडले जातात. [७] प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी परिषदेची बैठक होते. [८]
इंटरस्टेट ७० आणि यूएस ४० हे महामार्ग एलिसच्या उत्तरेकडून पूर्व-पश्चिम धावतात. कॅन्सस महामार्ग २४७ हा रस्ता शहरातून उत्तर-दक्षिण असा जातो. [९]
युनियन पॅसिफिक रेल्वेचा एक मालवाहतूक मार्ग एलिस शहरातून पूर्व-पश्चिम जातो. [९] [१०]
एलिस रिव्ह्यू हे स्थानिक साप्ताहिक वृत्तपत्र येथून प्रकाशित होते. [११]
क्रायस्लर कॉर्पोरेशनचा संस्थापक वॉल्टर पी. क्रायस्लरचे लहानपण येथे गेले.[१२]
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Profile of Ellis, Kansas in 2020". United States Census Bureau. December 6, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 6, 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "Welcome to...Ellis, Kansas". City of Ellis. 2010-02-06 रोजी पाहिले.
- ^ Empty citation (सहाय्य)
- ^ "Ellis County, Kansas - City of Ellis". The KSGenWeb Project. 2011-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-06 रोजी पाहिले.
- ^ "Homesteading in Ellis County - Ellis". Kansas Heritage Project. Fort Hays State University. 2010-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-06 रोजी पाहिले.
- ^ साचा:Citation/make link. (Interview). NPR. https://www.npr.org/templates/story/story.php?storyId=4503065.
- ^ "City Officials". City of Ellis. 2010-02-06 रोजी पाहिले.
- ^ "Ellis". Directory of Kansas Public Officials. The League of Kansas Municipalities. 2013-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-18 रोजी पाहिले.
- ^ a b "General Highway Map - Ellis County, Kansas" (PDF). Kansas Department of Transportation. 2010-06-01. 2010-12-18 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "CountyMap" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "UPRR Common Line Names" (PDF). Union Pacific Railroad. 2010-04-17 रोजी पाहिले.
- ^ "About this Newspaper: The Ellis review". Chronicling America. Library of Congress. 2009-09-27 रोजी पाहिले.
- ^ "Walter P. Chrysler's boyhood home". Walter P. Chrysler Boyhood Home and Museum. 2010-12-18 रोजी पाहिले.