एलिझाबेथ ओल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलिझाबेथ ओल्सन



एलिझाबेथ चेस ऑलसेन (१६ फेब्रुवारी १९८९) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. कॅलिफोर्निया येथे जन्मलेल्या ओल्सेनने वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. २०११ मध्ये मार्था मार्सी मे मार्लेन या थरारपटातून तिने पदार्पण केले. या कामासाठी तिची प्रशंसा झाली आणि तसेच समीक्षकांच्या चित्रपट पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळाले, त्यानंतर सायलेंट हाऊस या भयपट चित्रपटात तिने भूमिका केली. ओल्सेनला बाफ्टा रायझिंग स्टार अवॉर्ड नामांकन मिळाले आणि दोन वर्षांनी न्यू यॉर्क विद्यापीठातून तिने पदवी प्राप्त केली.

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मीडिया फ्रँचायझीमधील वांडा मॅक्सिमॉफ / स्कार्लेट विचच्या भूमिकेसाठी ऑलसेनला जगभरात ओळख मिळाली. अॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), आणि डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस (२०२२) या सुपरहिरो चित्रपटांमध्ये, तसेच मिनीसिरीज वांडाव्हिजन (२०२१) तिने काम केले. वांडाव्हिजन मधील कामासाठी तिला प्राइमटाइम एम्मी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

मार्व्हेल व्यतिरिक्त ओल्सेनने मॉन्स्टर फिल्म गॉडझिला (२०१४), मिस्ट्री फिल्म विंड रिव्हर (२०१७) आणि इंग्रिड गोज वेस्ट (२०१७) या नाट्यपटांत काम केले. तिने नाट्यमालिका सॉरी फॉर युवर लॉस (२०१८-२०१९) मध्ये अभिनय केला. यातील भूमिकेसाठी समीक्षकांचा चॉईस टेलिव्हिजन पुरस्कार नामांकन तिला मिळाले.

संदर्भ[संपादन]