एर न्यू झीलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअर न्यू झीलंड
आय.ए.टी.ए.
NZ
आय.सी.ए.ओ.
ANZ
कॉलसाईन
NEW ZEALAND
स्थापना १९३९
हब ऑकलंड विमानतळ
वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडनी विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर एअरपॉइंट्स
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या माउंट कूक एअरलाइन
विमान संख्या १०७
मुख्यालय ऑकलंड, न्यू झीलंड
संकेतस्थळ http://www.airnewzealand.com
सिडनी विमानतळवर थांबलेले एअर न्यू झीलंडचे एअरबस ए३२० विमान

एअर न्यू झीलंड ही न्यू झीलंड देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. ऑकलंड महानगरामध्ये मुख्यालय, वेलिंग्टनक्राइस्टचर्च विमानतळांवर प्रमुख हब असणारी एअर न्यू झीलंड २०१५ साली न्यू झीलंडमधील २५ तर १५ देशांमधील २६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवत होती.

ही कंपनी १९९९पासून स्टार अलायन्सची सभासद आहे.[१]

इतिहास[संपादन]

सन १९४० मध्ये तस्मान एंपायर एअरवेज लिमिटेड (TEAL) म्हणून या विमान कंपनीचा उदय झाला. तेव्हा ह्या कंपनीची न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विमानसेवा होती . दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ही विमान कंपनी ऑकलंड ते सिडनी विमान सेवा चालवत होती. त्यात वेलिंग्टन आणि फिजी या मार्गाची भर घातली. या TEALचे ५०% शेअर्स न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियन शासनाने सन १९५३ मध्ये खरेदी केले. त्यामुळे मूळ कंपनीचा सन १९६० मध्ये व्यवसाय थांबला. विमान माल वाहतुकीचे न्यू झीलंड सरकारने आस्ट्रेलियाकडून ५०% शेअर्स खरेदी केले आणि ही विमान कंपनी सन १९६५मध्ये न्यू झीलंडची DC-8 म्हणून ओळखली जाऊ लागली.

या वाढलेल्या व्यवसायात एअर न्यू झीलंड डगलस DC-8sची पहिली जेट विमानसेवा सन १९६५मध्ये अमेरिका व आशियासाठी सुरू झाली आणि त्यात लॉस एंजेलिस आणि होनोलुलू या मार्गांची भर पडली. या विमान कंपनीने नंतर डगलस DC-10 सन १९७३मध्ये आणि नंतर DC-10s ताब्यात घेतले.

सन १९७८मध्ये या विमान कंपनीत नॅशनल एअरवेज कॉर्पोरेशन आणि तिच्याशी संलग्न असलेले सेफ एअर मिळाले. त्याने एअर न्यू झीलंड ही या देशची एकमेव विमान कंपनी झाली. त्यानंतर या कंपनीने मालवाहतूक सुरू केली. एअर न्यू झीलंडच्या विमान समुदायात दाखल झालेल्या कंपनीची बोईंग 737 आणि फ27 सामील झाली. सन १९९०मध्ये या विमान कंपनीने NZ कोड धारण केला.सन 1१९८१मध्ये या विमान कंपनीने बोईंग 747 आणि पुढील वर्षात लॉस एंजेलिसमार्गे लंडनसाठी सेवा सुरू केली.

कार्यालय[संपादन]

ऑकलंड शहरात वेस्टर्न रेक्लमेशन प्रेसिंक्ट 2,चे बीओमॉन्ट आणि फॅन्शवे रस्त्यावर १,६८,००० चौरस फूट जागेत एअर न्यू झीलंडचे कार्यालय आहे. त्याला जोडून ६ माळे असणाऱ्या दोन बिल्डिंगा आहेत. सर्व बाजूंनी काचा लावलेल्या आहेत त्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होतो. स्वयंचलितपणे सकाळी साडे सात वाजता दिवे चालू होतात आणि संध्याकाळी सहा वाजता बंद होतात. मानवी हालचालीच्या संवेदनेने बिल्डिंगमधील दिवे आपोआप चालू होतात आणि मानवी हालचाल नाही झाली तर १५ मिनिटे वाट पाहून आपोआप बंद होतात. ही बिल्डिंग बांधण्यासाठी आणि तिच्यात सोयीसुविधा करण्यासाठी ६ कोटी न्यू झीलंड डॉलर खर्च झाला आहे. सुरुवातीला या विमान कंपनीची कर्मचारीसंख्या, ऑकलंड मधील या चार बिल्डिंगा आणि CBD मधील तसेच कांही इतर बिल्डिंगांमध्ये धरून जेमतेम एक हजार होती. त्यांचा ग मध्ये समावेश होता.मक्कुयरी गूड्मन प्रॉपर्टि ट्रस्टची या जागेची मालकी आहे. सन 2006 मध्ये या विमान कंपनीने मुख्यतः 11 वशच्या भाडे कराराने प्रत्येक वर्षी 4.1 मिल्लियन डॉलर या दराने घेतलेली आहे. पुढील काळातील भाडे खर्च त्या त्या वर्षातील होणाऱ्या जागेच्या बाजार भावाप्रमाणे वाढ होणार आहे.[२] साहाय्यक विमान सेवा कंपनी एअर न्यू झीलंड कन्ससल्टिंग एअर न्यू झीलंड हॉलिडेज एअर न्यू झीलंड कार्गो. शिवाय एअर न्यू झीलंडच्या चार स्वतःच्या सहकारी विमान सेवा आहेत. एअर नेल्सन, ईगल एअरवेज,आणि माऊंट कुक एअर लाइन या स्थानिक विभागीय सेवा देणाऱ्या विमानसेवा आहेत.

बक्षीस (ॲवॉर्ड)[संपादन]

सन २००७ बेस्ट एअर लाइन साऊथ पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड सन २००७ ऑस्ट्रेलियाची लीडिंग व्यवसाय क्लास एअर लाइन पॅसिफिकची बेस्ट एअर लाइन – सन १९९४, ९५, ९६, ९९, २०००, २००१ ( ट्रॅव्हल वीकली ग्लोब ॲवॉर्ड ) बेस्ट पॅसिफिक एअर लाइन- १९९८, ९९, २०००, २००१, २००२, २००४ (TTG ॲन्युअल ट्रॅव्हल ॲवॉर्ड) सन २००८ बेस्ट प्रवाशी सेवा ॲवॉर्ड सन २००९ बेस्ट केबिन स्टाफ ऑस्ट्रेलिया / NZ रीजन सन २०१२ एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल ॲवॉर्ड सन २०११ प्रीमियम इकॉनोंमी स्पेससिट्स – “ वॉलपेपर डिझाइन ॲवॉर्ड “ सन २०१० एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल एअर लाइन ॲवॉर्ड आणि असे कितीतरी ॲवॉर्ड मिळालेले आहेत.[३]

कार्यक्रमाचे आयोजन[संपादन]

एअर न्यूझीलड ही कंपनी रग्बी स्पर्धा, वाइन पुरस्कार, फॅशन निर्यात पुरस्कार तसेच फॅशन वीक पुरस्कार हे सोहळे प्रायोजित करते.

घटना आणि अपघात[संपादन]

एअर न्यू झीलंड संबंधने खालील घटना घडल्या :

जून २०१०पर्यंत या कंपनीच्या १०हून अधिक अपघात झाले आहेत काही अपघा्तांत विमाने मोठे नुकसान झाले आहे.

४ जुलै १९६६ रोजी कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान उड्डाण करतेवेळी धावपट्टीवर धडकले. ५ कर्मचाऱ्यांपैकी २ ठार झाले.

२२ डिसेंबर १९७८ रोजी कंपनीचे एक लहान हवाई विमान पॅसिफिक महासागरावर हरवले, परंतु विमान-१०३ने ते शोधून काढले.

१७ फेब्रुवारी १९७९ रोजी कंपनीचे फॉकर फ्रेंडशिप माणिकौ हार्बरवर धडकले आणि एक कर्मचारी ठार झाला.

२८ नोव्हेंबर १९७९ रोजी फ्लाईट क्र. ९०१ चे विमान अंटार्टिकावरील रॉस आयलंड येथे दुसऱ्या विमानाला धडकले. त्यात २५७ प्रवाशी होते.

१९ मे १९८७ बोईंग 747-200 हाइजाक्ड. १०५ प्रवाशी आणि २४ वैमानिक यांना कोणतीही इजा झाली नाही.

३० ऑगस्ट २००२ बोइंग 747-400 फ्लप हरवला हे विमान उड्डाणानंतर १२ तासांनी लक्षात आले. ८ फेब्रुवारी २००८ फ्लाइट २२७९ एका स्त्री ने हाइजाक केले. तिने बॉम्ब ठेवल्याची भीती घातली. त्या घटनेत दोन्ही वैमानिक आणि एक प्रवाशी जखमी झाले. २७ नोव्हेंबर २००८ फ्लाइट 888T धडकले. ७ व्यक्ति ठार झाल्या.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "एयर न्यू झीलंड: तथ्ये आणि आकडे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "एयर न्यू झीलंड कार्यालय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-02-22. 2022-05-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "एअर न्यू झीलंड -१५ची उत्कृष्ठ एअरलाईन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: