एर इंडिया फ्लाइट १७१
अहमदाबाद विमानतळावर अपघात झालेले विमान | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | अहमदाबाद, अहमदाबाद जिल्हा, गुजरात, भारत | ||||
| चालक कंपनी | |||||
| सुरूवात | |||||
| अखेर | |||||
| सहभागी होणाऱ्यांची संख्या |
| ||||
| तारीख |
| ||||
| मृत्युंची संख्या |
| ||||
| जखमींची संख्या |
| ||||
| पासून वेगळे आहे | |||||
![]() | |||||
| |||||
एर इंडिया फ्लाइट १७१ ही भारतातील अहमदाबाद विमानतळावरून युनायटेड किंग्डममधील लंडन गॅटविक विमानतळावर जाणारे एक नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण होते. १२ जून २०२५ रोजी विमानतळावरून हवेत झेप घेतल्यावर लगेचच अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात हे विमान कोसळले. त्यातील सर्व २४२ लोक ठार झाले. या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानात २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. यांशिवाय जमिनीवरीलही डझनावारी लोक ठार झाल्याचा अंदाज आहे.
बोईंग ७८७ विमानप्रकाराचा पहिलाच जीवघेणा अपघात आहे. पूर्ण विमान नष्ट झाल्याचाही पहिलाच किस्सा आहे मलेशिया एरलाइन्स फ्लाइट १७ नंतरचा दुहेरी रांगा असलेल्या विमानात प्रवाशांचा मृत्यू झालेला हा पहिलाच विमान अपघात होता. १९८५ मध्ये एर इंडिया फ्लाइट १८२ वर बॉम्बस्फोट झाल्यानंतर एर इंडियाने विमान गमावल्याचाही हा पहिलाच किस्सा आहे.
विमान
[संपादन]अपघाता झालेले विमान ११ वर्षे जुने बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर होते. VT-ANB संकेताने नोंदणीकृत असलेल्या या विमानाला दोन जनरल इलेक्ट्रिक GEnx इंजिने होती. त्याने पहिल्यांदा १४ डिसेंबर २०१३ रोजी उड्डाण केले आणि २८ जानेवारी २०१४ रोजी एर इंडियाने याचा ताबा घेतला होता. [१]
प्रवासी आणि कर्मचारी
[संपादन]| राष्ट्रीयत्व | प्रवासी | क्रू | एकूण |
|---|---|---|---|
| १६९ | १२ | १८१ | |
| ५३ | -- | ५३ | |
| ७ | -- | ७ | |
| १ | -- | १ | |
| एकूण | २३० | १२ | २४२ |
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि एर इंडियाच्या माहितीनुसार विमानात एकूण २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी (११ मुले आणि २ अर्भके), [२] २ वैमानिक आणि १० कर्मचारी होते. [३] प्रवाशांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. [४] गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या अपघातात मृत्यू पावले. [५] [६] या उड्डाणाचे वैमानिक सुमित सभरवाल तर सहवैमानिक क्लाईव्ह कुंदर यांनी केले होते. त्यांना प्रत्येकी ८,२०० आणि १,१०० तासांचा विमान उडविण्याचा अनुभव होता. [७]
अपघात
[संपादन]फ्लाइट १७१ने अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी २३ वरून स्थानिक वेळेनुसार दुपारी १:३८ वाजता ( ०८:०८ UTC ) लंडन गॅटविकला जाण्यासाठी झेप घेतली. जमिनीपासून १९१ मी (६२५ फूट) उंचीवर गेलेले असताना विमानाच्या एडीएस-बी ट्रान्सपॉन्डरने ६२५ फूट (१९१ मी) आपात्कालीन संदेश पाठवला. त्यानंतर लगेचच विमानाशी संपर्क तुटला. मेघाणी नगर परिसरातील प्रत्यक्षदर्शींंना अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर धारपूरसह जवळपासच्या ठिकाणांवरून धुराचे दाट लोट दिसू लागले. [८] अहमदाबादच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, विमान बीजे मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. अपघातानंतर विमानाची अंशतः शाबूत शेपटी एका बहुमजली इमारतीतून बाहेर दिसत होती. [९]
मेटारच्या अहवालानुसार विमानाच्या उड्डाण्च्या वेळी हवामान स्थिर होते आणि दृश्यमानता स्पष्ट होती.
अहमदाबाद शहराचे पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अपघातात विमानातील कोणीही वाचलेले नाही आणि अपघातस्थळाच्या आसपासच्या परिसरातील रहिवाशांचाही मृत्यू झाला असावा. [१०]
अन्वेषण
[संपादन]या अपघाताच्या तपासाची जबाबदारी भारतीय विमान अपघात तपास ब्युरोला देण्यात आली. युनायटेड किंग्डमच्या एर अॅक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रँचने चार तपासकांचे पथक आणि अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने तपासात मदत करण्यासाठी एक गो टीम पाठवली. विमानाचे इंजिन तयार करणाऱ्या जीई एरोस्पेसने भारतात एक पथक पाठवून कॉकपिटमधील डेटाचे विश्लेषण करण्यासाठी मदत देऊ केली.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Flight history for aircraft - VT-ANB". Flightradar 24.
- ↑ "Why did Ahmedabad-London Air India flight crash? Black box holds all answers – here's what it is". Financial Express (इंग्रजी भाषेत). 12 June 2025. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ Solanki, Ajit; Roy, Rajesh (12 June 2025). "London-bound Air India flight with more than 240 aboard crashes after takeoff from Ahmedabad, India". AP News. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Ahmedabad plane crash live updates: Chances of any survivors slim, say sources". Hindustan Times. 12 June 2025. 2025-06-12 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Ex-Gujarat CM Vijay Rupani on Air India flight that crashed in Ahmedabad". India Today. 12 June 2025. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Ahmedabad Air India flight crash: Full passenger list released, includes ex-CM Vijay Rupani". The Times of India. 12 June 2025. ISSN 0971-8257. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Air India Ahmedabad-London flight crashes near airport in Meghani area". The Times of India. 12 June 2025. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Ahmedabad Plane Crash LIVE Updates: London-Bound Air India Flight Crashes Near Airport; Amit Shah Speaks To Gujarat CM". News18. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "London-bound plane with 53 Britons on board crashes in India". The Telegraph. London. 12 June 2025. 12 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Live updates: Air India plane headed to London crashes with more than 240 onboard". AP News (इंग्रजी भाषेत). 12 June 2025 रोजी पाहिले.
