Jump to content

एर आइसलँड कनेक्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर आइसलॅंड
आय.ए.टी.ए.
NY
आय.सी.ए.ओ.
FXI
कॉलसाईन
FAXI
स्थापना १९९५
हब रेक्याविक विमानतळ
विमान संख्या
गंतव्यस्थाने १३
पालक कंपनी आइसलॅंडएर
मुख्यालय रेक्याविक, आइसलॅंड
एर आइसलॅंडचे फोक्कर ५० विमान

एर आइसलॅंड (इस्लेन्स्का: Flugfélag Íslands) ही आइसलॅंड देशामधील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. आइसलॅंडच्या रेक्याविक शहरात तिचे मुख्य कार्यालय आहे.[] ही त्यांची नियमित सेवा स्थानिक स्थळांना पुरविते तसेच ग्रीनलंड आणि फारोए बेटावर देते. एर आइसलॅंडचे मुख्य केंद्र रेय्क्जाविक विमानतळ आणि अकुरेयरी विमानतळ आहेत.[] आइस लॅंडर हा हिचा सहाय्यक संघ आहे.

इतिहास

[संपादन]

त्र्यग्ग्वि हेलगासोन (नोरौर्फ्लुग) यांनी अकुरेयरी येथे ही एर लाइन सुरू केली.

1-5-1975 रोजी फ्लूग्फेलग नोरौर्लंड्स म्हणून अधिकृत रित्या नोंदणी झाली होती.

सन 1997 मध्ये स्थानिक आइसलॅंडएर आणि नॉरलॅंड एर ( फ्लूग्फेलग नोरौर्लंड्स ) यांचे एकत्रीकरण झाले आणि चालू घडीला एर आइसलॅंड या नावाने टी अस्तित्वात आली. टी मार्च 2007 पासून 226 कर्माच्याऱ्यासह आइसलॅंड एर संघाचे मालकीची झाली.[]

विमानताफा

[संपादन]

ताफा

[संपादन]
आइसलँडएरच्या रंगात रंगवलेले फ्लुगफेलॉग इसलँड्सचे डॅश ८–४०० विमान

फेब्रुवारी २०२५ च्या सुमारास फ्लुगफेलॉग इसलँड्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता. ही सगळी विमाने आता आइसलँडएर नावाखाली सेवारत आहेत:[]

एर आइसलँड कनेक्टचा ताफा
विमानसेवेतऑर्डरप्रवासीनोंदी
डी हॅविलँड कॅनडा डॅश ८-२०० ३७ आइसलँडएरच्या रंगात (livery).
डी हॅविलँड कॅनडा डॅश ८-४०० ७४ आइसलँडएरच्या रंगात (livery).
एकूण

गंतव्यस्थानांपैकी, ग्रीनलँडमधील बहुतेक आणि आइसलँडमधील काही धावपट्ट्यांची लांबी १,१०० मीटर पेक्षा कमी आहे. अशा धावपट्ट्यांसाठी एर आइसलँड कनेक्टकडे असलेले क्यू२०० हे एकमेव विमान सुसंगत आहे. त्यांच्या निवृत्त ताफ्यात फॉकर ५० विमानांचा समावेश आहे.[][]

गंतव्यस्थाने

[संपादन]
नूक विमानतळावर एर आइसलँड कनेक्टचे डॅश ८–२०० विमान

मार्च २०२१ मध्ये आइसलँडएरमध्ये विलीन होण्यापूर्वी एर आइसलँड कनेक्टची गंतव्यस्थाने.

देशशहरविमानतळनोंदी
ग्रीनलँड इलुलिसात इलुलिसात विमानतळ मोसमी
काँगरलुसुआक काँगरलुसुआक विमानतळ बंद
कुलुसुक कुलुसुक विमानतळ
नार्सार्सुआक नार्सार्सुआक विमानतळ मोसमी
नेर्लेरिट इनात नेर्लेरिट इनात विमानतळ बंद
नूक नूक विमानतळ
आइसलँड अकुरेरी अकुरेरी विमानतळ
एगिल्सस्तादिर एगिल्सस्तादिर विमानतळ
ग्रिमसे ग्रिमसे विमानतळ बंद
हुसाविक हुसाविक विमानतळ बंद
हॉफन हॉर्नफ्योर्दुर विमानतळ बंद
इसाफ्योर्दुर इसाफ्योर्दुर विमानतळ
रौफारहॉफन रौफारहॉफन विमानतळ बंद
रेक्याविक केफ्लाविक आंतरराष्ट्रीय विमानतळ
रेक्याविक विमानतळ मुख्य ठाणे
वेस्तमानैयर वेस्तमानैयर विमानतळ बंद
व्होपनाफ्योर्दुर व्होपनाफ्योर्दुर विमानतळ बंद
थॉर्शॉफन थॉर्शॉफन विमानतळ बंद
युनायटेड किंगडम अ‍ॅबर्डीन अ‍ॅबर्डीन विमानतळ बंद
बेल्फास्ट जॉर्ज बेस्ट बेल्फास्ट सिटी विमानतळ बंद

कोडशेर करार

[संपादन]

एर आइसलँड कनेक्टचे अटलांटिक एरवेझद्वारे संचालित फेरो बेटांच्या फ्लाइट्सवर, तसेच नॉर्लँडएरद्वारे संचालित ग्रिमसे, थॉर्शॉफन, व्होपनाफ्योर्दुर आणि नेर्लेरिट इनात विमानतळ सेवांवर कोडशेर करार होते.

दुर्घटना आणि अपघात

[संपादन]
  • २९-५-१९४७ रोजी एर आइसलॅंड C-४७ A TF-ISI हेओइन्स्फ्जोरौर, वायईटीएचई वाईट हवामानामुळे धडकले आणि २५ विमान प्रवाशी ठार झाले. आइसलॅंड एर साठी ही घटना सर्वात वाईट होती.
  • १४-४-१९६३ रोजी एर आइसलॅंड विककेर्स विस्कौंट TF-ISU हे हृमफक्षी नावाने ओळखले जाणारे विमान विमानतळापासून १० मैल अंतरावरील फोर्नेबू येथील नेसोया येथील लोकवसाहतीत धडकले. ८ प्रवाशी आणि ४ सहायक कर्मचारी — हे सर्वजण त्यात आपले जीव गमावले. अपघाती मृत्यू या स्वरूपात त्याची नोंद झाली.
  • ४-३-२०११ रोजी डॅश ८ TF-JMB हे विमान नूक विमानतळावर उतरत होते, त्याला एक पक्षी ठोकरला आणि त्यामुळे ते विमान धावपट्टीवरून बाजूला घसरले आणि विमानाचे उजवे चाक तुटले. विमानातील सर्व ३१ व्यक्ति विनादुखापत सुरक्षित होते. तरीसुद्धा ते विमान आइसलॅंड एर ने बाद केले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "एर आइसलॅंड" (इंग्लिश भाषेत). ०७-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. 1 2 "डिरेक्टरी-वर्ल्ड एरलाईन" (इंग्लिश भाषेत). ०७-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. "Global Airline Guide 2019 (Part One)". Airliner World. October 2019: 15.
  4. Milla Ósk Magnúsdóttir (21 April 2017). "Sögu Fokker vélanna hjá FÍ lýkur". RÚV (आईसलँडिक भाषेत). 3 March 2018 रोजी पाहिले.
  5. Birgir Þór Harðarson (21 April 2017). "Flugfélagið selur allar Fokker-vélarnar". Kjarninn (आईसलँडिक भाषेत). 3 March 2018 रोजी पाहिले.
  6. {{स्रोत बातमी
    • |दुवा = https://www.planespotters.net/airline/Flugfelag-Islands
    • |प्रकाशक = प्लेनस्पॉटर्स.नेट
    • |अ‍ॅक्सेसदिनांक = ०७-१०-१५
    • |title = एर आइसलॅंड फ्लीट लिस्ट
    • |भाषा = इंग्लिश
    }}

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: