इरिट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एरिट्रिया या पानावरून पुनर्निर्देशित)
इरिट्रिया
ሃገረ ኤርትራ
دولة إرتريا
इरिट्रियाचा ध्वज इरिट्रियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Ertra, Ertra, Ertra
(इरिट्रिया, इरिट्रिया, इरिट्रिया)
इरिट्रियाचे स्थान
इरिट्रियाचे स्थान
इरिट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अस्मारा
अधिकृत भाषा तिग्रिन्या, अरबी, इंग्लिश
सरकार एकपक्षीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इसायास अफेवेर्की
 - पंतप्रधान जमीर तांबोळी
महत्त्वपूर्ण घटना
 - इटालियन राजवटीची समाप्ती नोव्हेंबर १९४१ 
 - युनायटेड किंग्डमसंयुक्त राष्ट्रे अंमलाची समाप्ती १९५१ 
 - स्वातंत्र्य २४ मे १९९१ 
 - कायदेशीर स्वातंत्र्य २४ मे १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,१७,६०० किमी (१०१वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१४
लोकसंख्या
 -एकूण ६०,८६,४९५ (२०१२ अंदाज) (१०७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५१.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.३९७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७७७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३४९ (कमी) (१७७ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन नाक्फा
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ ER
आंतरजाल प्रत्यय .er
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २९१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


इरिट्रिया (तिग्रिन्या: ኤርትራ ʾErtrā ; अरबी: إرتريا Iritriyā , इंग्लिश: State of Eritrea) हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबियायेमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडलेल्या इरिट्रियावर मध्य युगीन काळात इथियोपियनओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. इ.स. १८९० साली इटलीने येथे आपली पहिली वसाहत (इटालियन इरिट्रिया) स्थापन केली जी दुसऱ्या महायुद्धानंतर बरखास्त करण्यात आली. त्यानंतर इथियोपियाने ह्या भूभागावर आक्रमण करून तो बळकावला व इरिट्रिया इथियोपियाचा १४वा प्रांत बनला. इथ्योपियाच्या जुलुमी राजवटीस कंटाळलेल्या इरिट्रियाने १९६१ सालापासून सुमारे ३० वर्षे स्वातंत्र्यलढा चालू ठेवला ज्याला १९९१ साली यश मिळून इरिट्रियास स्वातंत्र्य मिळाले.

सध्या इरिट्रियामध्ये एकपक्षी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत असून इसायास अफेवेर्की हा १९९१ सालापासून ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या राजवटीमध्ये इरिट्रियात सर्रास मानवी हक्कांची पायमल्ली होत असून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सततच्या युद्धांमुळे तसेच अनेक दशकांच्या गुलामगिरीमुळे इरिट्रियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून येथील जीडीपी वाढीचा दर केवळ २ टक्के आहे. ह्यामुळे इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतुःसीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: