एरबस कासा सी-२९५
एरबस सी-२९५ (पूर्वी कासा सी-२९५) हे एक मध्यम पल्याचे रणनीतिक वाहतूक विमान आहे. याची संरचना आणि उत्पादन स्पॅनिश एरोस्पेस कंपनी कासाने केले. ही कंपनी आता एरबस या युरोपियन बहुराष्ट्रीय एरबस संरक्षण आणि अंतराळ विभागाचा भाग आहे.
सी-२९५ चे उत्पादन आणि अंतिम बांधणी दोन्ही सामान्यतः स्पेनमधील सेव्हिया येथील सान पाब्लो विमानतळावरील एरबस संरक्षण आणि अंतराळ विभागाच्या कारखान्यांमध्ये केले जातात. [१] याशिवाय २०११ पासून, इंडोनेशियन एरोस्पेसने औद्योगिक सहकार्याद्वारे इंडोनेशियातील बांडुंग येथील त्यांच्या कारखान्यां मध्ये ही विमाने तयार केली आहेत. [२] २०२१मध्ये टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सने भारतीय वायुसेनेसाठी ४० विमाने भारतातील गुजरातमधील वडोदरा येथे परवाना-निर्मित करण्याचा करार केला गेला. [३] . यांशिवाय येथे भारतीय आरमार आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी सागरी गस्त घालण्यासाठी आणखी १२ विमाने तयार केली गेली.
सैनिकी वाहतूकी शिवाय सी-२९५चा वापर पॅराशूटधारी सैनिक आणि सामान उतरवणे, इलेक्ट्रॉनिक संदेशवहन (ELINT), रुग्णउचलणी (MEDEVAC) आणि सागरी गस्त यांसाठीही होतो. विमानाला विविध भूमिका पार पाडायला झटपट तयार करण्यासाठी उपकरणे जलदगतीने लावता आणि काढता येतात. या विमानाला नागरी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून विशेष मागणी नव्हती तरीही सरकारी आणि लष्करी संस्थांना हे विमान त्यांच्या प्रवासी वाहतूकी करता वापरता यावे यासाठी नागरी उड्डाण प्रमाणपत्र घेतले. मुख्यत्वे लष्करांतून वापरल्या जाणारे सी-२९५ २०१७मध्ये पहिल्यांदाच नागरी प्रवासी सेवेत दाखल झाले
भारत
[संपादन]वायुसेना
[संपादन]
२३ जुलै २०१२ रोजी भारतीय सैन्याने भारतीय सैन्याच्या जुन्या झालेल्या एचएस-७४८ एव्ह्रो विमानांच्या बदली ५६ वाहतूक विमाने पाहिजे असल्याचे जाहीर केले. [४]
८ मे २०१३ रोजी, भारतीय संरक्षण मंत्रालयाने बोईंग, लॉकहीड मार्टिन, एरबस डिफेन्स अँड स्पेस, अँटोनोव्ह, साब, इल्युशिन आणि अलेनिया एर्माची यासारख्या अनेक उत्पादकांकडून प्रस्ताव मागितले. काही न काही कारणाने एक एक प्रतिस्पर्धी गळल्यावर टाटा-एरबस कॉन्सोर्शियमला हे कंत्राट मिळाले. [५] [६] [४] हे कंत्राट सुमारे
१०,००० कोटी (US$२.२२ अब्ज) किमतीचे आहे.[४] [७] यानुसार वायुसेनेसाठी ४८ महिन्यांच्या आत ५६ विमाने पुरविण्यात येतील आणि अधिक ४० विमाने भारतात तयार केली जातील. या शिवाय या विमानांची देखभाल करण्याच्या सगळ्या व्यवस्था आणि सुविधा असतील.[८] [३] [९]
१३ सप्टेंबर २०२३ रोजी पहिले सी-२९५ भारतीय वायुसेनेला देण्यात आले. [१०] त्यानंतर अनुक्रमे ४ आणि २८ मे २०२४ रोजी दुसरे आणि तिसरे विमान देण्यात आले. [११] [१२] चौथे (CA 7104) आणि पाचवे (CA 7105) ५ जुलै २०२४ रोजी देण्यात आले. [१३] सहावे विमान २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत देण्यात आले. [१४] उर्वरित दहा विमाने ऑगस्ट २०२५ पर्यंत दरमहा एक या दराने देण्यात येतील आणि त्यानंतर वडोदरा प्लांटमधून देण्यात येतील. [१५]
२८ ऑक्टोबर २०२४ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते गुजरातमधील वडोदरा येथे विमानाच्या अंतिम असेंब्ली लाइनचे उद्घाटन करण्यात आले. [१४] [१६]
स्पॅनिश बनावटीचे शेवटचे विमान २ ऑगस्ट २०२५ रोजी स्पेनच्या सेव्हिया येथे भारतीय राजदूतांनी स्वीकारले [१७]
तपशील (C-295W)
[संपादन]- क्षमता: ७० सैनिक, ४८ पॅराट्रूप्स, २४ स्ट्रेचर आणि सात वैद्यकीय सहाय्यक, पाच १०८" मालपेट्या किंवा तीन लँड रोव्हर आकाराची हलकी वाहने.
- केबिनचे परिमाण: १२.६९ × २.७० × १.९० मीटर (४१.६३ x ८.८५८ x ६.२३ फूट)
- लांबी: २४.५० मी (८० फूट)
- विंग स्पॅन: २७.५९ मी (९१ फूट)
- उंची: ८.६६ मी (२८ फूट)
- कमाल पेलोड: ९,००० किलो (१९,८४२) पाउंड)
- जास्तीत जास्त टेकऑफ वजन: २३,२०० किलो (५१,१४७) पाउंड)
- कमाल लँडिंग वजन: २३,२०० किलो (५१,१४७) पाउंड)
- इंधन क्षमता: ७,४०० लिटर
- इंजिन प्रकार: २ x प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा PW१२७G
- इंजिन पॉवर: २,६४५ एसएचपी (१,९७२) किलोवॅट)
- क्रूझिंग स्पीड: २६० नॉट (४८२ किमी/तास; २९९ मैल/तास)
- फेरी रेंज: ५,७५० किमी (३,५७३) मैल)
- ३,००० किग्रॅ वजन घेउन पल्ला: ५,००० किमी
- ६,००० किग्रॅ वजन घेउन पल्ला: ३,७०४ किमी
- उंची मर्यादा: २५,००० फूट
- कमाल उंची मर्यादा: ३०,००० फूट
- उड्डाण धाव: ६७० मी (२,१९८) फूट) समुद्रसपाटीवरुन
- अवतरण धाव: ३२० मी (१,०५०) फूट) समुद्रसपाटीवर
- शस्त्रास्त्र बिंदू: ६ (प्रत्येक पंखाखाली तीन)
- शस्त्रास्त्र बिंदू क्षमता: आतल्या बिंदूंवर ८०० किग्रॅ; मध्यातील बिंदूंवर ५०० किग्रॅ; बाहेरच्या बिंदूंवर ३०० किग्रॅ
संदर्भ
[संपादन]- ^ Hoyle, Craig (14 May 2012). "IN FOCUS: How C-295 efficiency drive will help A400M programme". Flight International.
- ^ "PT. Dirgantara Indonesia (Persero)". indonesian-aerospace.com. 2 June 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 May 2020 रोजी पाहिले.
- ^ a b "CCS clears C-295 purchase worth $2.5 billion to replace IAF's Avros". Hindustan Times. 8 September 2021. 8 September 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c "Avro replacement: Independent panel set up to look into Airbus–Tata bid". The Economic Times. 2015-02-27. ISSN 0013-0389. 2025-01-11 रोजी पाहिले.
- ^ "Fresh tender likely after Tata–Airbus single bidder". Business Standard. 2014-11-01. 2025-01-11 रोजी पाहिले.
- ^ Broadsword. "Fresh tender likely after Tata–Airbus single bidders for Avro replacement". Broadsword by Ajai Shukla – Strategy. Economics. Defence. 2025-01-11 रोजी पाहिले.
- ^ "Long wait for Airbus to bag replacement contract for IAF's Avros". Business Standard. 2015-02-22. 2025-01-11 रोजी पाहिले.
- ^ "Cabinet approves procurement of 56 C-295MW transport aircraft for Indian Air Force". Press Information Bureau. 2021-09-08. 2025-01-11 रोजी पाहिले.
- ^ Philip, Snehesh Alex (8 September 2021). "IAF to get 56 C-295 Airbus aircraft as Modi govt clears 'Make in India' deal". ThePrint (इंग्रजी भाषेत). 24 September 2021 रोजी पाहिले.
- ^ "Airbus delivers first C295 to India" (Press release). Airbus. 2023-11-13. 2024-10-28 रोजी पाहिले.
- ^ "IAF takes delivery of second C295 transport aircraft". ANI. 2024-05-04. 2024-05-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-10-28 रोजी पाहिले.
- ^ Team, IADN Editorial (2024-05-29). "Airbus delivers 3rd C295 transport aircraft to IAF - IADN". - IADN (इंग्रजी भाषेत). 2024-10-28 रोजी पाहिले.
- ^ gargi.chaudhry. "Airbus to deliver another two C295 aircraft to Indian Air Force". Asianet News Network Pvt Ltd (इंग्रजी भाषेत). 2024-10-28 रोजी पाहिले.
- ^ a b "Tata Advanced Systems and Airbus inaugurate C295 Final Assembly Line in Vadodara, India" (Press release). Airbus. 2024-10-28. 2024-10-28 रोजी पाहिले.
- ^ "Explainer: Airbus-Tata C-295 project could do what Suzuki did for automobile sector in India". The Tribune (इंग्रजी भाषेत). 2024-10-29 रोजी पाहिले.
- ^ "All about the C295 aircraft manufacturing plant, inaugurated by PM Modi in Vadodara". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-10-28. 2024-10-28 रोजी पाहिले.
- ^ "India receives Airbus C-295 military transport aircraft from Spain". The Indian Express. 2 August 2025. 2 August 2025 रोजी पाहिले.