एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर या पानावरून पुनर्निर्देशित)
एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
ಎಂ.ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ
एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
मैदान माहिती
स्थान बंगळूर, कर्नाटक
स्थापना १९६९
आसनक्षमता ३८,३००[१]
मालक कर्नाटक राज्य सरकार
प्रचालक कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना
यजमान कर्नाटक क्रिकेट संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारतीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २२-२७ नोव्हेंबर १९७४:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. ४-८ मार्च २०१७:
भारत  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा. २६ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २ नोव्हेंबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२० २५ डिसेंबर २०१२:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम २०-२० १ फेब्रुवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (कन्नड: ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ; रोमन लिपी: M. Chinnaswamy Stadium) हे भारतातील बंगळूर, कर्नाटक स्थित क्रिकेटचे मैदान आहे. नयनरम्य कब्बन पार्क, क्वीन्स रोड, कब्बन आणि उपनगरीय एम्.जी. रोड यांच्या कवेत आणि बंगळूर शहराच्या मध्यभागी वसलेले हे मैदान सुमारे चार दशके जूने आहे. पूर्वी ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) स्टेडियम म्हणून ओळखले जाई. नंतर एम. चिन्नास्वामी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव मैदानाला देण्यात आले. त्यांनी असोसिएशनची चार देशके सेवा केली तसेच ते १९७७ ते १९८० दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे अध्यक्ष सुद्धा होते. ३८,००० आसनक्षमता[२] असलेले हे मैदान नियमित परणे कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, प्रथम वर्गीय क्रिकेट सामने आणि त्याच बरोबर इतर सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघांचे ते होम ग्राउंड आहे. मैदानाचे मालकी हक्क कर्नाटक राज्य सरकारकडे आहेत आणि ते सध्या ९९ वर्षांसाठी KSCAला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. चिन्नास्वामी मैदान हे भारतातील आणि कदाचित जगातील पहिले असे मैदान आहे, जेथे मोठ्या प्रमाणावर वीजेचे उत्पादन करण्यासाठी सौर पॅनेल बसवले गेले. KSCA ने "गो ग्रीन" उपक्रमाअंतर्गत हे पॅनेल बसवले.

इतिहास आणि विकास[संपादन]

कर्नाटक सरकारच्या पुढाकाराने मैदानाची कोनशीला १९६९ मध्ये बसविण्यात आली आणि १९७० मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले. १९७२-७३ च्या मोसमात मैदान प्रथम प्रथम-श्रेणी सामन्यांसाठी वापरले गेले. आणि वेस्ट इंडीच्या १९७४-७५ मोसमातील दौऱ्यावेळी मैदानाला कसोटी दर्जा मिळाला.

मैदानावर पहिली कसोटी २२ ते २९ नोव्हेंबर १९७४ दरम्यान खेळवली गेली. योगायोगाने, ही वेस्ट इंडीजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनीज यांची पदार्पणाची कसोटी होती. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजच्या संघाने मन्सूर अली खान पतौडीच्या भारतीय संघाचा २५६ धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने त्यांचा पहिला कसोटी विजय ह्याच मैदानावर १९७६-७७ च्या मोसमात टोनी ग्रेगचा इंग्लिश संघाविरुद्ध नोंदवला. मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ६ सप्टेंबर १९८२ रोजी खेळवला गेला. भारताने ह्या सामन्यान श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला.

ह्या मैदानावर १९९६ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्यांदा प्रकाश दिवे लावले गेले. प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दरम्यानचा उपांत्यपूर्व सामना. ९ मार्च १९९६ रोजी खेळवल्या गेलेल्या ह्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३९ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला. २००७ मध्ये, भारत आणि पाकिस्तान दरम्यान भारताची अवस्था ६१/४ अशी दयनीय झालेली असताना सौरव गांगुली आणि युवराज सिंगने ३०० धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडीत काढले. दिवसाच्या शेवटी भारताची धावसंख्या ३६५/५ अशी होती, की पूर्ण भारतात पहिल्या दिवसाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ह्या मैदानावरील ही सर्वोच्च भागीदारी आहे. ह्या मैदानावरील, सौरव गांगुलीच्या २३९ धावा ही डावखोऱ्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सन २००० मध्ये बीसीसीआयने बंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे केंद्र घोषित केल्यानंतर, ह्या मैदानावरील ह्या अकादमीमधून अनेक क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. मिस वर्ल्ड १९९६ कार्यक्रम ह्याच मैदानावर पार पडला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने मैदानाची क्षमता ७०,००० पर्यंत वाढविण्याचे नियोजित केले आहे. त्याशिवाय ७० ते ८० हजार आसनक्षमतेचे आणखी एक क्रिकेट मैदान तयार करण्याचे सुद्धा ठरवले आहे. परंतू, आजपर्यंत ह्यापैकी कोणतीही योजना आजवर अंमलात आली नाही. बंगळूर फ्रँचायझी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे हे होम ग्राउंड आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याला कर्नाटकचे निशाण आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या लाल आणि पिवळ्या रंगात रंगविले गेले.

चिन्नास्वामी मैदानाचे प्रकाशझोतातील विहंगम दृश्य.

आकडेवारी आणि विक्रम[संपादन]

प्रकार कसोटी एकदिवसीय टी२०
सर्वात मोठी धावसंख्या भारतचा ध्वज भारत ६२६ वि पाकिस्तान भारतचा ध्वज भारत ३८३/६ वि ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत २०२/६ वि इंग्लंड
सर्वात लहान धावसंख्या भारतचा ध्वज भारत २१४ वि पाकिस्तान भारतचा ध्वज भारत १६६/४ वि इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२२/९ वि वेस्ट इंडीज
सर्वोत्कृष्ट फलंदाजी पाकिस्तान युनिस खान २६७ वि भारत भारत रोहित शर्मा २०९ वि ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज आंद्रे फ्लेचर ८४* वि श्रीलंका
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी भारत हरभजन सिंग ११/२२४ वि ऑस्ट्रेलिया भारत युवराजसिंग ५/३१ वि आयर्लंड भारत युझवेंद्र चहल ६/२५
सर्वात मोठी भागीदारी पाकिस्तान युनिस खानइंझमाम उल हक ३२४ वि भारत ऑस्ट्रेलिया शेन वॉटसनब्रॅड हॅडिन १८३ वि कॅनडा पाकिस्तान मोहम्मद हफीझशोएब मलिक १०६ वि भारत
सर्वाधिक धावा भारत सचिन तेंडूलकर ८६९ भारत सचिन तेंडूलकर ५३४ भारत सुरेश रैना १०३
सर्वाधिक बळी भारत अनिल कुंबळे ४१ भारत झहीर खान १४ भारत युझवेंद्र चहल

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी[संपादन]

कसोटी[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२२-२७ नोव्हेंबर १९७४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६७ धावा धावफलक
२८ जानेवारी-२ फेब्रुवारी , १९७७ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १४० धावा धावफलक
१५-२० डिसेंबर, १९७८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१९-२४ सप्टेंबर, १९७९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
२१-२६ नोव्हेंबर, १९७९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
९-१४ डिसेंबर, १९८१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
१४-१९ सप्टेंबर, १९८३ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
१३-१७ मार्च, १९८७ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १६ धावा धावफलक
१२-१७ नोव्हेंबर, १९८८ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १७२ धावा धावफलक
२६-३० जानेवारी, १९९४ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत डाव आणि ९५ धावा धावफलक
१८-२० ऑक्टोबर, १९९५ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक
२५-२८ मार्च, १९९८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी धावफलक
२-६ मार्च, २००० भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका डाव आणि ७१ धावा धावफलक
१९-२३ डिसेंबर, २००१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
६-१० ऑक्टोबर, २००४ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१७ धावा धावफलक
२४-२८ मार्च, २००५ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १६८ धावा धावफलक
८-१२ डिसेंबर, २००७ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २००८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २०१० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
३१ ऑगस्ट-३ सप्टेंबर, २०१२ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
१४-१८ नोव्हेंबर, २०१५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका अनिर्णित धावफलक
४-८ मार्च, २०१७ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ७५ धावा धावफलक

एकदिवसीय[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२६ सप्टेंबर १९८२ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
२० जानेवारी १९८५ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी धावफलक
१४ ऑक्टोबर १९८७ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १६ धावा धावफलक
२७ ऑक्टोबर १९८९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ३ गडी धावफलक
२६ फेब्रुवारी १९९३ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४८ धावा धावफलक
१० नोव्हेंबर १९९३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे no result धावफलक
०९ मार्च १९९६ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत ३९ धावा धावफलक
२१ ऑक्टोबर १९९६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत २ गडी धावफलक
१४ मे १९९७ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक
२० मे १९९८ भारतचा ध्वज भारत केन्याचा ध्वज केन्या भारतचा ध्वज भारत ४ गडी धावफलक
०४ एप्रिल १९९९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२३ धावा धावफलक
२५ मार्च २००१ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ६० धावा धावफलक
१२ नोव्हेंबर २००३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६१ धावा धावफलक
१९ नोव्हेंबर २००५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
०६ जून २००७ आफ्रिका XI आशिया XI आशिया XI ३४ धावा धावफलक
२९ सप्टेंबर २००७ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया no result धावफलक
२३ नोव्हेंबर २००८ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १९ धावा धावफलक
०७ डिसेंबर २०१० भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
२७ फेब्रुवारी २०११ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बरोबरी धावफलक
०२ मार्च २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३ गडी धावफलक
०६ मार्च २०११ भारतचा ध्वज भारत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
१३ मार्च २०११ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया केन्याचा ध्वज केन्या ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६० धावा धावफलक
१६ मार्च २०११ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया कॅनडाचा ध्वज कॅनडा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी धावफलक
०२ नोव्हेंबर २०१३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ५७ धावा धावफलक

टी२०[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[६]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२५ डिसेंबर २०१२ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी धावफलक
२० मार्च २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी धावफलक
२१ मार्च २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी धावफलक
२३ मार्च २०१६ भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत १ धाव धावफलक
०१ फेब्रुवारी २०१७ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ७५ धावा धावफलक

प्रतिमासंग्रह[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "एम्. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआय". http://www.bcci.tv/venues/4/m-chinnaswamy-stadium (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-06-18. ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "महान भारतीय गोलंदाज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]