Jump to content

एम.एस. सुनील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
মাইক্রোসফট. সুনীল (bn); M.S. Sunil (fr); എം.എസ്. സുനിൽ (ml); M.S. Sunil (nl); ఎం.ఎస్.సునీల్ (te); एम.एस. सुनील (mr); M.S. Sunil (de); M.S. Sunil (ast); এম.এছ. সুনীল (as); M.S. Sunil (sq); M.S. Sunil (en); எம். எஸ். சுனில் (ta) Indian academic housing the homeless 1961- (en); Indian academic housing the homeless 1961- (en); Indiaas academicus (nl); India karimma ŋun nyɛ paɣa (dag)
एम.एस. सुनील 
Indian academic housing the homeless 1961-
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखc. इ.स. १९६१
केरळ
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
  • शैक्षणिक व्यक्ती
  • master builder
  • परोपकारी
नियोक्ता
  • कॅथोलिकेट महाविद्यालय पत्तनम्तिट्टा
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

डॉ. एम.एस. सुनील (जन्म: सुमारे १९६०) या एक भारतीय अध्यापक, मानवतावादी आणि परोपकारी व्यक्ती आहेत. या मुख्यतः बेघरांना घर बांधून देणाऱ्या परोपकारी म्हणून ओळखल्या जातात. सुनील यांनी डिसेंबर २०१६ मध्ये पत्तनम्तिट्टा येथे पाच संस्थापक सदस्य आणि सहा स्वयंसेवकांसह डॉ. एमएस सुनील फाउंडेशन या ना नफा गैर सरकारी संस्थेची स्थापना केली. ही संस्था अक्षय ऊर्जा आणि नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करून अल्प मूल्यांचे घरे आणि पौष्टिक अन्न गरीब कुटुंबांना पुरवण्याचा प्रयत्न करते. ही संस्था गरीब कुटुंबे तसेच अत्यल्प उत्पन्न असलेल्या सामाजिक गटांच्या राहणीमानात सुधारणा करण्याचे काम करते, ज्यामध्ये आदिवासी आणि सामाजिकदृष्ट्या वंचितांसह दुर्लक्षित असलेल्या विविध समुदायाचा समावेश आहे. भारत सरकारने सुनील यांना २०१७ सालचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा भारत सरकारचा महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो.

जीवन

[संपादन]

तिच्या परोपकाराची सुरुवात ती शाळेत असतानाच भिकारी मुलांना अन्न देण्यापासून झाली.[]

सुनील या केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठातील कॅथोलिकेट कॉलेज पत्तनम्तिट्टा येथे प्राणीशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. २०१६ मध्ये त्या प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या.[][]

२००५ मध्ये सुनील यांनी पाहिले की पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या त्यांच्या एका विद्यार्थिनीकडे राहण्यायोग्य घर नाहीये.[] याकरिता त्यांनी आपल्या मित्रांकडून पैसे आणि साहित्य गोळा करून त्यात, स्वतःच्या खिशातील पैसे घालून या विद्यार्थिनीकरिता घर बांधून दिले.[]

एमएस सुनील २०१७ चा नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

समाजाची पार्श्वभूमी आणि दारिद्र्य पातळीचे विश्लेषण केल्यानंतर, सुनील यांनी समाजातील राहणीमान सुधारण्यासाठी २००५ पासून अनेक प्रकल्प हाती घेतले आणि असंख्य कुटुंबांना मदत केली. २०१६ साली सेवा निवृत्ती घेऊन डॉ. एमएस सुनील फाउंडेशनची नोंदणी केली आणि अजून वेगाने कामास सुरुवात केली. 'बेघरांसाठी घर' हा डॉ. एमएस सुनील फाउंडेशनचा एक प्रमुख प्रकल्प आहे ज्याचा उद्देश गरजू लोकांसाठी, विशेषतः गरीब विधवा आणि रुग्णांसाठी घरे बांधणे आणि प्रदान करणे आहे.[] मार्च २०२१ पर्यंत गरिबातीगरीब लोकांसाठी बांधलेल्या घरांची संख्या २०० पर्यंत पोहोचली. ज्याचा सुमारे ८१० व्यक्तींना फायदा झाला. यासाठी त्यांना इतर सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले.[]

२०१७ साली सुनील यांची नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड झाली. त्यासाली केरळमधील एकूण तीन महिलांची निवड झाली होती. सुनील व्यतिरिक्त लिझीमोल फिलिपोस आणि श्यामला कुमारी या दोन महिलाना हा पुरस्कार देण्यात आला.[] २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने[] भारताचे राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार प्रदान केले.[] सुनील या बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य स्वतः खरेदी करतात आणि त्या प्रत्येक नवीन घराच्या बांधकामावर देखरेख देखील करतात. ही घरे कमीत कमी साधनसंपत्तीने बांधली जातात आणि परवडणारी असतात. घरे बांधताना काळजीपूर्वक प्रदूषण टाळून पर्यावरणीय संवर्धनावर लक्ष केंद्रित केले जाते. ६५० चौरस फूट क्षेत्रफळातील या घरात स्वयंपाकघर आणि शौचालयाचा देखील समावेश आहे. ही घरे ३५ दिवसांत बांधली जातात आणि त्यावर गॅल्वनाइज्ड स्टीलचे छप्पर असते.[]

२०२० मध्ये ती ९८ वर्षांच्या कार्त्यायनी अम्मा यांना भेटायला गेली होती. त्यासाली अम्माला नारी शक्ती पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. अम्मांनी यापूर्वी कधीही विमान प्रवास केला नव्हता. दिल्लीला जाण्यापूर्वी काही दिवस आधी सुनील यांनी त्यांना धीर दिला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Nari Shatki Puraskar citation". Ministry of WCD on Twitter. 8 March 2018. 19 January 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b "This Professor Did Not Stop with Teaching, but Went on To Build Houses for Poor People". www.theweekendleader.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b Kuttoor, Radhakrishnan (2018-03-07). "Charity 'home maker' gets her due on women's day". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-19 रोजी पाहिले.
  4. ^ "This professor wears many hats to help others". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2011-11-12. 2021-01-19 रोजी पाहिले.
  5. ^ "83 Homes and Counting: Retired Teacher Gifts the Homeless What They Need Most". The Better India (इंग्रजी भाषेत). 2017-12-23. 2021-07-11 रोजी पाहिले.
  6. ^ "This Retired Kerala Teacher Has Built 200 Homes for the Underprivileged Since 2005". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-05-02. 2021-07-11 रोजी पाहिले.
  7. ^ "Scientist, social worker and mural artist: Meet Nari Shakti winners from Kerala". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2018-03-08. 2021-01-18 रोजी पाहिले.
  8. ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-16 रोजी पाहिले.
  9. ^ "At 98, Karthyayani Amma prepares for 1st flight; to receive Nari Shakti Puraskar on Women's Day". Mathrubhumi (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.