एम.आर. श्रीनिवासन
former Chairman of Atomic Energy Commission India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जानेवारी ५, इ.स. १९३० बंगळूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे २०, इ.स. २०२५ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता |
| ||
कार्यक्षेत्र | |||
अपत्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
मालूर रामस्वामी श्रीनिवासन (५ जानेवारी १९३० - २० मे २०२५), हे एक भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि यांत्रिक अभियंता होते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात आणि 'दाबित जड पाणी अणुभट्टी' (प्रेशराइज्ड हेवी-वॉटर रिॲक्टर) च्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकार तर्फे २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१]
श्रीनिवासन यांचा जन्म १९३० मध्ये बंगळुरू येथे झाला. त्यांच्या एकूण आठ भावंडांपैकी ते तिसऱ्या क्रमांकाचे होते. त्यांनी म्हैसूरच्या इंटरमिजिएट कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय अभ्यासक्रमात त्यांनी भाषा विषयात संस्कृत आणि इंग्रजी भाषा निवडली होती. भौतिकशास्त्र हे त्यांचे पहिले प्रेम असूनही, ते मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या नव्याने सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (सध्याचे विश्वेश्वरय्या विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय) प्रवेश घेतला. त्यांनी १९५० साली यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि १९५४ मध्ये कॅनडातील माँत्रिऑल येथील मॅकगिल विद्यापीठातून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी देण्यात आली. त्यांचे विशेषज्ञता क्षेत्र गॅस टर्बाइन तंत्रज्ञान होते.[२]
श्रीनिवासन यांचे २० मे २०२५ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.[३]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- कन्नड राज्योत्सव पुरस्कार, २०१७[४]
- आशियाई शास्त्रज्ञ १००, आशियाई शास्त्रज्ञ, २०१६
- २०१५ मध्ये पद्मविभूषण[५]
- १९९० मध्ये पद्मभूषण.[५]
- १९८४ मध्ये पद्मश्री[५]
- केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळाचा हीरक महोत्सवी पुरस्कार
- इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) चा सर्वोत्कृष्ट डिझायनर पुरस्कार
- विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी संजय गांधी पुरस्कार
- विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी ओम प्रकाश भसीन पुरस्कार
- होमी भाभा यांना भारतीय विज्ञान काँग्रेसकडून सुवर्णपदक
- बंगळुरू येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार
- इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- ^ "Advani, Amitabh Bachchan, Dilip Kumar get Padma Vibhushan". Bharti Jain. The Times of India. 25 January 2015. 26 January 2015 रोजी पाहिले.
- ^ "Life Time Contribution Award In Engineering Fact sheet" (PDF). publisherssociation of Separation Scientists and Technologists. 2016-03-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 Jan 2015 रोजी पाहिले.
- ^ "Former Atomic Energy Commission Chairman M.R. Srinivasan passes away". द हिंदू (इंग्लिश भाषेत). २० मे २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "PM Modi didn't respond to my pleas on language policy: CM Siddaramaiah - Bengaluru News". The Times of India. 2 November 2017. 10 July 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- Pages using the JsonConfig extension
- M. (given name)
- २०व्या शतकातील भारतीय अभियंते
- २०व्या शतकातील भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
- विज्ञान व तंत्रज्ञानातील पद्मश्री पुरस्कारविजेते
- बंगलोरमधील शास्त्रज्ञ
- कर्नाटकातील अभियंते
- विज्ञान व तंत्रज्ञानातील पद्मविभूषण पुरस्कारविजेते
- विज्ञान व तंत्रज्ञानातील पद्मभूषण पुरस्कारविजेते
- इ.स. १९३० मधील जन्म
- इ.स. २०२५ मधील मृत्यू