एक दूजे के लिए
1981 film by K. Balachander | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा | |||
| निर्माता | |||
| Performer | |||
| वितरण |
| ||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| |||
एक दूजे के लिए हा १९८१ चा के. बालचंदर दिग्दर्शित भारतीय हिंदी रोमँटिक शोकांतिका चित्रपट आहे. बालचंदर यांच्या तेलुगू चित्रपट मारो चरित्र चा रिमेक असलेला हा चित्रपट आहे. कमल हासन (बॉलिवूड पदार्पण) आणि रती अग्निहोत्री हे वेगवेगळ्या कुटुंबातील प्रेमी जोडीच्या भूमिकेत आहेत जे त्यांच्या नात्याला विरोध करतात आणि त्यांना वेगळे करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. ह्या अर्थाने हा शेक्सपियरच्या शोकांतिक नाटक रोमियो अँड ज्युलिएट पासून प्रेरित आहे. यात माधवी आणि राकेश बेदी सहाय्यक भूमिकेत आहेत.
एक दूजे के लिए हा ५ जून १९८१ रोजी रिलीज झाला आणि
१० कोटी (US$२.२२ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई केली, ज्यामुळे तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला.[१][२] या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यांनी चित्रपटाच्या संगीताचे कौतुक केले - विशेषतः एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी गायलेले आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेले "तेरे मेरे बीच में" हे गाणे. २८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, या गाण्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार मिळाला. २९ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह १३ नामांकने मिळाली - ज्यापैकी त्याने तीन पुरस्कार जिंकले: सर्वोत्कृष्ट गीतकार (बक्षी), सर्वोत्कृष्ट पटकथा (बालचंदर) आणि सर्वोत्कृष्ट संपादन.
हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक "क्लासिक चित्रपट" म्हणून ओळखला जातो. [३][४][५]
संगीत
[संपादन]| गाणे | गायक |
|---|---|
| "तेरे मेरे बीच में" | एस.पी. बालसुब्रह्मण्यम |
| "मेरे जीवन साथी प्यार किया जा" | अनुराधा पौडवाल, एस.पी. बालसुब्रह्मण्यम |
| "हम तुम दोनो जब मिल जाएंगे" | लता मंगेशकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम |
| "तेरे मेरे बीच में" (डुएट) | |
| "हम बने तुम बने एक दुजे के लिए" | |
| "सोलाह बरस की" | लता मंगेशकर, अनुप जलोटा |
पुरस्कार
[संपादन]२९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - एस.पी. बालसुब्रह्मण्यम - "तेरे मेरे बीच में"[६]
२९ वे फिल्मफेअर पुरस्कार :
- सर्वोत्कृष्ट गीतकार - आनंद बक्षी - "तेरे मेरे बीच में" (विजय)
- सर्वोत्कृष्ट पटकथा - के. बालचंदर (विजयी)
- सर्वोत्कृष्ट संपादन - एन.आर. किटू (विजयी)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - एल.व्ही. प्रसाद (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - के. बालचंदर (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - कमल हासन (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रती अग्निहोत्री (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - माधवी (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार - असरानी (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - लक्ष्मीकांत-प्यारेलाल (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट गीतकार - आनंद बक्षी, "सोलह बरस की बाली उमर" (नामांकन)
- सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक - एस.पी. बालसुब्रह्मण्यम (नामांकन) "तेरे मेरे बीच में"
- सर्वोत्कृष्ट कथा - के. बालचंदर (नामांकन)
संदर्भ
[संपादन]- ↑ "Box Office 1981". Box Office India. 3 September 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 October 2009 रोजी पाहिले.
- ↑ "'Vishwaroop' gets good response in Hindi belts". The Times of India. 3 February 2013. 2013-02-03 रोजी पाहिले.
- ↑ "'Ek Duuje Ke Liye' turns 40: Four reasons that make Kamal Haasan-Rati Agnihotri's movie an evergreen classic". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2021-06-05. 2022-03-13 रोजी पाहिले.
- ↑ "'Ek Duje Ke Liye' Is The Best Movie Shot In The State, Says Goa CM, While 'Sholay' Was His All-Time Favourite Film . The movie was shot in 70 mm format and with stereophonic sound". Koimoi (इंग्रजी भाषेत). 2021-11-21. 2022-03-13 रोजी पाहिले.
- ↑ S, Srivatsan (2020-06-25). "Why watching 'Ek Duuje Ke Liye' was an unforgetable experience for Tapas Nayak". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-03-13 रोजी पाहिले.
- ↑ Mishra, Lalatendu (25 September 2020). "S.P. Balasubrahmanyam, the versatile voice that conquered Bollywood". द हिंदू. 25 October 2020 रोजी पाहिले.