एअरलिफ्ट
Jump to navigation
Jump to search
एअरलिफ्ट | |
---|---|
दिग्दर्शन | राजा कृष्ण मेनन |
निर्मिती | निखिल अडवाणी |
कथा | राजा कृष्ण मेनन |
प्रमुख कलाकार |
अक्षय कुमार निम्रत कौर |
संगीत |
अमाल मलिक अंकित तिवारी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २२ जानेवारी २०१६ |
वितरक | फॉक्स स्टार स्टुडियोज |
अवधी | १२५ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹३० कोटी |
एकूण उत्पन्न | ₹२३२ कोटी |
एअरलिफ्ट हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड थरारपट आहे. १९९० साली इराकने कुवेत देशावर आक्रमण करून येथील सत्ता बळकावली. ह्यानंतरच्या तसेच आखाती युद्धकाळात भारताच्या एअर इंडिया ह्या विमानवाहतूक कंपनीने कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुमारे १.७५ लाख लोकांची सुखरूप सुटका केली. ह्या सत्यघटनेवर एअरलिफ्टचे कथानक आधारित आहे. एअरलिफ्टमध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असून निम्रत कौर, इनामुलहक, अवतार गिल इत्यादींच्या सहाय्यक भूमिका आहेत.
एअरलिफ्ट टीकाकारांच्या व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला व त्याला तिकिट खिडकीवर चांगला प्रतिसाद लाभला.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील एअरलिफ्ट चे पान (इंग्लिश मजकूर)