ऊस विकास अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  • 'ऊस विकास अधिकारी' हा साखर कारखान्याने नेमलेला अधिकारी असतो, ज्याच्याकडे त्या साखर कारखान्याच्या परिक्षेत्रात पिकवला जाणाऱ्या ऊसाच्या विकासाची जबाबदारी निश्चित केलेली असते.
  • 'ऊस विकास अधिकारी' (Cane Development Officer, CDO) हा कृषी पदवीधर (बी.एस्.सी. अ‍ॅग्री किंवा एम्.एस्.सी. अ‍ॅग्री) असतो. शेतकरी व साखर कारखान्यातील निवडून आलेले संचालक मंडळ यांच्याशी संवादासाठी चांगल्या संभाषण कलेबरोबरच त्याला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते. म्हणूनच 'ऊस विकास अधिकारी' हा साखर कारखाना व उस पिकवणारे शेतकरी यातील दुवा समजला जातो.
  • कारखान्याच्या परिक्षेत्रात पिकवला जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रफळाच्या नोंदी ठेवणे, कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या नोंदी ठेवणे व संबधित कामे 'ऊस विकास अधिकारी' करतो. साखर कारखान्याने उस विकासासाठी जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजना उस विकास अधिकाऱ्यामार्फत राबवल्या जातात. जसे, खतांचे वाटप, शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या योजना राबवणे.
  • 'ऊस विकास अधिकारी' हा कारखान्याच्या ’शेतकी अधिकारी’ किंवा काहीवेळा कारखान्याच्या ’कार्यकारी संचालकां’कडून मिळणाऱ्या निर्देशांचे पालन करतो.