धाराशिव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उस्मानाबाद, उस्मानाबाद तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?धाराशिव

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° १०′ ००″ N, ७६° ०३′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ६४७ मी
जिल्हा धाराशिव जिल्हा
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
१,१२,०८५ (2011)
१.०७६ /
भाषा मराठी
प्रशासक तथा मुख्याधिकारी वसुदा पड
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३५०१
• +०२४७२
• MH-25
संकेतस्थळ: osmanabadmahaulb.maharashtra.gov.in/

धाराशिव (पूर्वीचे नाव उस्मानाबाद) हे महाराष्ट्रातील एक शहर आणि धाराशिव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

नामांतर[संपादन]

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार उस्मानाबाद शहराचे अधिकृत नाव धाराशिव आहे. परंतु, तालुका आणि जिल्हास्तरावर उस्मानाबाद हे नाव न्यायालयीन भाषेत अजूनही कायम आहे. तालुका व जिल्हास्तरावर नामांतरसंबंधी अधिसूचनेचा केवळ मसुदा प्रसिद्ध झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) अंतरिम आदेशानुसार शहराचे न्यायालयीन भाषेतील नाव उस्मानाबाद आहे, मात्र तालुका आणि जिह्याचे नाव उस्मानाबाद वापरले जाणे बंधनकारक आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार नगरपरिषदेचे नामांतर धाराशिव नगर परिषद असे करण्यात आले आहे. धाराशिव नाव वापरण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून उस्मानाबाद व धाराशिव नावाचा वादविवाद मुंबई उच्च न्यायालयात आजही प्रलंबित आहे.[१]

इतिहास[संपादन]

शहरातील धारासुरमर्दिनी मंदिर, तसेच धारा आणि शिव या प्राचीन योध्यांमुळे धाराशिव हे नाव ऐतिहासिक काळापासून प्रचलित आहे. ख्रिस्ताब्द १९०० च्या सुमारास निजाम कालीन नकाशात Dharaseo असा उल्लेख आढळतो. पुढे उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान असफ जाह याने सत्ताग्रहण केल्यावर त्याच्या नावावरून ठेवण्यात आले. त्यानंतर २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने उस्मानाबादचे नामांतर "धाराशिव" असे पूर्ववत केले.

लोकसंख्या[संपादन]

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार धाराशिव शहराची लोकसंख्या १,१२,०८५ होती. पैकी ५८,०९८ पुरुष तर ५३,९८७ स्त्रिया होत्या. १३,३४६ व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. धाराशिव शहराचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहे. साक्षरता प्रमाण ८८.१५% आहे. पुरुष साक्षरता ९३.४५% आहे, तर स्त्री साक्षरता ८२.५२% आहे

धाराशिव शहरातील धारासूर मर्दिनीचे मंदिर प्रसिद्ध आहे. शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. धाराशिव शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव' नावाची जैन लेणी आहेत. धाराशिव बहामणी आणि विजापूर संस्थानात आले. १९४८ पर्यंत धाराशिव हैदराबाद संस्थानात होते.

खास पदार्थ[संपादन]

धाराशिवचे गुलाब जामून प्रसिद्ध आहे. कुंथलगिरी जवळील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सरमकुंडी फाटा येथील खवा, पेढे प्रसिद्ध आहेत. दूध उत्पादनात घाटंग्री हे गाव अग्रेसर आहे.

शिक्षणसंस्था[संपादन]

धाराशिवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आहे.

वाहतूक[संपादन]

धाराशिव शहर राष्ट्रीय महामार्ग ५२[२] वर वसले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग संगरूर(पंजाब)-हिस्सार(हरियाणा)-कोटा-इंदूर-धुळे-छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव-तुळजापूर-सोलापूर-विजापूर-हुबळी-अंकोला(कर्नाटक) असा जातो.

धाराशिव शहर रेल्वे ने जोडले आहे. धाराशिव हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. धाराशिव येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर, पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला, नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "धाराशिव नव्हे 'उस्मानाबाद' हेच नाव वापरा, उच्च न्यायालयाचा आदेश!". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2023-06-10 रोजी पाहिले.
  2. ^ Details of National Highways (NHs) as on 31.03.2019

बाह्य दुवे[संपादन]