Jump to content

उषाबेन वसावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ushaben Vasawa; उषाबेन वसावा; नारी शक्ती पुरस्कार विजेते; Ushaben Dineshbhai Vasawa; उषाबेन दिनेशभाई वसावा
उषाबेन वसावा 
नारी शक्ती पुरस्कार विजेते
माध्यमे अपभारण करा
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

उषाबेन दिनेशभाई वसावा या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील आदिवासी महिला, शेतकरी आणि कार्यकर्त्या आहेत. त्यांना सेंद्रिय शेती, महिला सक्षमीकरण आणि ५०० हून अधिक महिलांना जमिनीचा हक्क मिळवून दिल्याबद्दल २०२२ चा प्रतिष्ठित 'नारी शक्ती पुरस्कार' राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[] त्यांनी 'नवजीवन आदिवासी महिला मंच'च्या माध्यमातून महिलांना सेंद्रिय शेती व दारूबंदीसाठी प्रेरित केले आहे.[]

कारकिर्द

[संपादन]

उषा यांचे वयाच्या १७व्या वर्षी लग्न झाले होते. घरातच देशी दारू बनवणे व पिणे होत असे. उषा यांनी प्रखर विरोध करूनस्वतःच्या घरापासून दारूबंदीस सुरुवात केली.[][] त्यांचे पती दिनेशभाई वसावा हे सर्वसामान्य आदिवासी शेतकरी कुटुंबातील असून त्यांना पाच एकर जमीन होती. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंब चालवणे त्यांना मुश्किल जात होते. अशात एक दिवस त्यांना 'आगाखान रुरल सपोर्ट प्रोग्राम इंडिया' या संस्थेची माहिती मिळाली. ही संस्था गरजू, ग्रामीण तसेच आदिवासी व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांची माहिती पुरवणे तसेच तत्संबंधी इतर कार्य करत होती. २००५ साली उषा या संस्थेत सहभागी झाल्या. या संस्थेत त्यांना नेतृत्व गुण, महिला अधिकार, शासकीय योजना व सेंद्रिय शेतीची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले. पाच पैकी तीन एकर जमिनीत त्यांनी शेणखत, गांडुळ खत व घरगुती सेंद्रिय औषधी वापरून रसायन मुक्त शेती करण्यास सुरुवात केली.[] पहिल्या वर्षी पुरेसा अनुभव नसल्याने व मातीची घटलेली सुपिकता, यामुळे पीक कमी आले. हळूहळू त्यांनी त्यात डाळ, भाजीपाला, भुईमूग आणि लाल साळ आदी पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन काढण्यास सुरुवात केली. उर्वरित दोन एकर मध्ये कापूस लावला जात होता.[]

त्या म्हणतात, "आम्हाला बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही. आम्ही दरवर्षी आमच्या स्वतःच्या उत्पादनातून काही बियाणे वाचवतो. एक एकर जमिनीसाठी कंपोस्ट तयार करण्यासाठी २० किलो शेणखत, ५ लिटर गोमूत्र, एक किलो बेसन, १ किलो गूळ आणि ५ किलो माती लागते. हे मिसळल्यानंतर, ते काही काळ सुकण्यासाठी सोडले जातात. नंतर ते शेतात मिसळले जातात."[]

२०१२ साली त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या मदतीने 'नवजीवन आदिवासी महिला विकास मंच'ची स्थापना केली. याद्वारे तब्बल तीन हजार महिलांची त्यांची टीम बनली. या महिला सेंद्रिय शेती करणे तसेच शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे इतर उत्पादने बनवणे इत्यादी कामे स्वतः करतात.[]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

हजारो महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा आणि सक्षमीकरण करणाऱ्या उषा यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच इतर अनेक संस्थांनीही त्यांना सन्मानित केले आहे. तसेच २०२२ सालचा प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्कार देखील त्यांना भारत सरकार तर्फे देण्यात आला.[][]

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

संदर्भ

[संपादन]
  1. "Women leadership conclave: Young achievers narrate their stories of grit and success". इंडियन एक्स्प्रेस (इंग्रजी भाषेत). २०२६-०२-२३ रोजी पाहिले.
  2. 1 2 "At women's conclave, victors advice never to fear boys". डीएनए इंडिया (इंग्रजी भाषेत). २०२६-०२-२३ रोजी पाहिले.
  3. 1 2 3 "CII Foundation Woman Exemplars Win Nari Shakti Puraskar". ciiblog.in (इंग्रजी भाषेत). २०२६-०२-२३ रोजी पाहिले.
  4. 1 2 3 "न बीज खरीदा, न खाद! 3 एकड़ से कमाती हैं 2 लाख रुपए, 3 हजार को जोड़ा रोजगार से". द बेटर इंडिया (हिंदी भाषेत). २०२६-०२-२३ रोजी पाहिले.
  5. "Ushaben Dineshbhai Vasava being conferred with the Nari Shakti award by President Ram Nath Kovind". contentgarden.in (इंग्रजी भाषेत). २०२६-०२-२३ रोजी पाहिले.