Jump to content

उकडहंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उकडहंडी हा पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारी असलेल्या महिकावती,केळवे, शिरगाव, माकुणसार, दातिवरे, मथाणे, कोरे, एडवण, चटाळे, वेढी ह्या गावातील लोक मकरसंक्रांतीच्या दिवशी बनवित असलेल्या पदार्थांचे नाव आहे. उकडहंडी बनविण्यासाठी खालील पदार्थ वापरले जातात.:-

  1. कोनफळ (कंद)
  2. बटाटे
  3. रताळे
  4. शेंगदाणे
  5. वालाच्या शेंगांचे दाणे
  6. हिरवे वाटाणे
  7. वांगी
  8. नवलकोल
  9. शेवग्याच्या शेंगा
  10. तूर
  11. हरभऱ्याचे चणे
  12. बोर
  13. तरले (माडाच्या झाडाचे कंद)

वरील सर्व भाज्या चिरून घ्यावयाच्या. एका टोपात/भांड्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर हिरव्या पातीचा कांदा त्यात परतून घ्यायचा. नंतर आले, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटण टाकावे. शिजल्यावर किसलेला ओला नारळ, मिरची पावडर, गरम मसाला, हळद, चवीपुरते मीठ, टाकावे. नंतर चिरलेली भाजी टाकावी. हे सर्व वाफेवर शिजवावे. हेच मिश्रण मडक्यात टाकून मडक्यात केळीचे पान टाकून आणि वरून मडक्याचे तोंड केळीच्या पानाने घट्ट बंद करून सर्व बाजूंनी सुका पालापाचोळा ठेवून व मडक्याच्या भोवती विस्तव रचून शिजवले जाते. साधारणपणे एक दोन तासात उकडहंडी तयार होते. वाफेवर शिजवलेली असल्यामुळे उकड आणि मडक्यात शिजवली असल्याने हंडी असे ह्याला उकडहंडी नाव पडले आहे. वाडवळी भाषेत ह्याला उकरांडी म्हणतात.तांदळाच्या भाकरीबरोबर ही केळीच्या पानावर खाल्ली जाते.वाडवळ,भंडारी,आगरी समाजात ही मकरसंक्रांत सणाच्या दिवशी खाल्ली जाते. []

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५