Jump to content

इटलीचा पहिला उंबेर्तो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उंबेर्तो पहिला, इटली या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिला उंबेर्तो

पहिला उंबेर्तो (इटालियन: Umberto Ranieri Carlo Emanuele Giovanni Maria Ferdinando Eugenio di Savoia, उंबेर्तो रान्येरी कार्लो इमानुएले ज्योवान्नी मारिया फेर्दिनांदो यूजेन्यो दि सावॉया) (मार्च १४, इ.स. १८४४ - जुलै २९, इ.स. १९००) हा इटलीचा राजा होता. ९ जानेवारी, इ.स. १८७८ ते मृत्यूपर्यंत तो अधिकारारूढ होता. दुसरा वित्तोरियो इमानुएले याचा पुत्र असलेला पहिला उंबेर्तो इटलीतील तत्कालीन डाव्या विचारसरणीच्या, अराजकतावादी गटांमध्ये अतिशय अप्रिय होता. मिलान येथे झालेल्या बावा बेक्कारिस हत्याकांडाचे त्याने समर्थन केल्यानंतर त्याला विरोधकांच्या प्रखर टीकेला व कडवटपणाला तोंड द्यावे लागले. या घटनेनंतर दोनच वर्षांनी गाएतानो ब्रेस्ची नावाच्या अराजकतावाद्याने त्याची हत्या केली.

बाह्य दुवे

[संपादन]