२०२५ साली चीन देशातील निंग्बो येथे आयोजित विश्वचषक स्पर्धेत तिने १० मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले.तिने याओ क्विआनझुन ह्या खेळाडूला ०.१ गुणाने हरवले व भारताला पहिले पदक मिळवून दिले.ह्या स्पर्धेत दक्षिण कोरिया च्या ओह येजिन हिला कास्यपदक मिळाले.
ईशा आणि रिधम सांगवान ने प्राथमिक फेरीत ५७८ गुण मिळवले होते व अंतिम टप्प्यात स्थान निर्माण केले होते. शेवटच्या टप्प्यात पहिल्या पाच शॉटनंतर रिधम पहिली आणि ईशा दुसरी होती. नंतरच्या पाच शॉटनंतर रिधम पाचवी व ईशा आघाडीवर होती. रिधम पाचवी राहिल्याने बाद झाली. शेवटचे सहा शॉट्स बाकी असताना ईशा १.१ गुणाने सर्व स्पर्धकांच्या पुढे होती.नंतर याओचा खेळ चांगला होऊन ईशाची आघाडी फक्त ०.६ गुण एवढी राहिली. शेवटच्या क्षणी ईशा २४२.६ गुण मिळवून पहिली आली व सुवर्णपदकाची दावेदार ठरली.[१]