ईशा मुखर्जी
ईशा मुखर्जी (जन्म - १० ऑक्टोबर १९२५ - मृत्यू २३ फेब्रुवारी २०१३) [१] श्रीअरविंद यांच्या अनुयायी. दिलीप कुमार रॉय यांची भाच्ची म्हणून श्रीअरविंद आश्रमात त्यांची ओळख होती. श्रीअरविंद यांनी अगदी मोजक्या व्यक्तींनाच बंगाली भाषेत पत्र लिहिली होती, ईशा या त्यापैकी एक होत्या.
जीवन
[संपादन]ईशा या भावशंकर बॅनर्जी आणि माया देवी यांच्या कन्या. भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे प्रसिद्ध नेते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे ईशा यांचे आजोबा होते. तर बंगालचे प्रसिद्ध नाटककार, संगीतकार आणि गीतकार द्विजेन्द्रालाल रॉय हे त्यांच्या आईचे वडील होते. ऑगस्ट १९२५ मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन झाले. त्यांनी सर्व वारसासंपत्ती ईशा यांच्या नावे केली होती. सुप्रसिद्ध नर्तक शंभू महाराज यांच्याकडून ईशा यांनी नृत्यकलेचे शिक्षण घेतले. रामकृष्ण मठाचे भारत महाराज यांचे मार्गदर्शन ईशा यांना लाभले होते. १९३१ साली ईशा आपले मामा दिलीप कुमार रॉय यांना भेटण्याच्या निमित्ताने प्रथम पाँडिचेरी येथे गेल्या. १९३२ साली त्यांना अनपेक्षितपणे श्रीअरविंद यांचे दर्शन झाले. ईशा ही असाधारण मुलगी आहे, ही प्रतिक्रिया श्रीअरविंद यांनी दिली होती.
यथावकाश ईशा यांचे लग्न झाले आणि त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव देवरूप असे होते. त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकले नाही. १९७८ साली त्या श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या. ईशा यांची श्रीअरविंद, श्रीमाताजी आणि श्रीरामकृष्ण परमहंस ही तीन श्रद्धास्थाने होती.[२]
प्रकाशित लेखन
[संपादन]ॲन एक्स्ट्राऑर्डीनरी गर्ल - याच्यातील आशय ईशा मुखर्जी यांचा आहे आणि त्याचे शब्दांकन निरोद बरन यांनी केले आहे. [२]
संदर्भ
[संपादन]- ^ Esha Mukherjee: In Memoriam by Anurag Banerjee, March 17, 2013
- ^ a b "Esha - 'an extraordinary girl' : some episodes in her life". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-07 रोजी पाहिले.