इस्ला मुहेरेस
Jump to navigation
Jump to search
इस्ला मुहेरेस (स्त्रीयांचे बेट) हे मेक्सिकोच्या किनाऱ्या लगत असलेले कॅरिबियन समु्द्रातील बेट आहे. युकातान द्वीपकल्पापासून १३ किमी पूर्वेस असलेले हे बेट ७ किमी लांब आणि ६५० मी रुंद आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथे १२,६४२ व्यक्ती राहतात. इस्ला मुहेरेस किंताना रू राज्याचा भाग आहे.
हे बेट कान्कुन या पर्यटनकेंद्रापासून जवळ आहे. येथे अनेक पुळणी असून जवळच्या पाण्यात स्कुबा डायव्हिंग[मराठी शब्द सुचवा] आणि स्नॉर्केलिंग[मराठी शब्द सुचवा]चे उद्योगही आहेत. येथून मुख्य भूमीवर जायला फेरी बोटी आहेत. इस्ला मुहेरेस राष्ट्रीय विमानतळ या बेटास विमानसेवा पुरवतो.
या बेटाचा उल्लेख इ.स. ५६४-१५१६ दरम्यानच्या माया संस्कृतीतील लिखाणात सापडतो. त्याकाळात हे बेट एकाब प्रांताचा भाग असल्याची नोंद आहे. येथील उथळ खाजणीतून मीठाची आगरे असल्याच्याही नोंदी आहेत.