इस्लाम करिमोव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इस्लाम करिमोव
इस्लाम करिमोव


उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२४ मार्च १९९०
पंतप्रधान अब्दुलहाशीम मितारोव
ओत्किर सुल्तोनोव
शौकत मिर्झियोयेव
मागील पदनिर्मिती

जन्म ३० जानेवारी, १९३८ (1938-01-30) (वय: ८०)
समरकंद, उझबेक सोसाग, सोव्हियेत संघ
पत्नी तातियाना करिमोवा
अपत्ये गुलनारा करिमोवा, लोला करिमोवा

इस्लाम करिमोव (उझबेक: Ислом Абдуғаниевич Каримов; रशियन: Ислам Абдуганиевич Каримов; जन्म: ३० जानेवारी १९३८) हा मध्य आशियामधील उझबेकिस्तान देशाचा पहिला व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २४ मार्च १९९० रोजी करिमोव सोव्हियेत संघामधील उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्याचा प्रमुख बनला. ३१ ऑगस्ट १९९१ रोजी उझबेकिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या उझबेकिस्तानमधील पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये करिमोव ८६ टक्के मते मिळवून निवडून आला परंतु अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते ही निवडणुक अवैध होती.

१९९१ सालापासून करिमोवने उझबेकिस्तानमध्ये हुकुमशहाच्या थाटात सत्ता चालवली आहे. त्याच्या कारकिर्दीत मानवी हक्क, भाषणस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य इत्यादींवर गदा आणली गेली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]