बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ بینظیر بھٹو بین الاقوامی ہوائی اڈہ | |||
---|---|---|---|
आहसंवि: ISB – आप्रविको: OPRN | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक/सैन्यवापर | ||
कोण्या शहरास सेवा | इस्लामाबाद आणि रावळपिंडी | ||
हब |
| ||
समुद्रसपाटीपासून उंची | १६८८ फू / ५०८ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 33°36′59″N 73°05′57″E / 33.61639°N 73.09917°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
१२/३० | ३२८७ | १०७८५ | डांबरी |
बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ISB, आप्रविको: OPRN) हा इस्लामाबाद ह्या पाकिस्तानच्या शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जात असे.
अपघात आणि घटना
[संपादन]- दिनांक एप्रिल २०, २०१२ला भोजा एरचे बोईंग ७३७-२०० विमान, फ्लाइट क्रमांक २१३ च्या दरम्यान कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्लामाबादच्या दिशेने स्थानिक उड्डाण करीत होते. [१]
विमान गंतव्य स्थानासाठी १० किलोमीटर अंतर राहिले असताना, हुसेन आबाद ह्या खेड्यानजीक स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.४० वाजता दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात ११ मुले धरून एकूण १२१ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. अपघातात सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले.