इसाबेल दि शारिएर

इसाबेल दि शारिएर (लग्नापूर्वी इसाबेला ॲग्नेटा फान टुइल फान सेरूस्केर्केन; २० ऑक्टोबर, १७४० – २७ डिसेंबर, १८०५) तथा मदाम दि शारिएर किंवा बेल फान झुइलें ही प्रबोधन काळातील एक डच आणि स्विस लेखिका होती. आयुष्याचा उत्तरार्ध स्वित्झर्लंडमधील न्यूशाटेल मध्ये घालवला. तिने अनेक कादंबऱ्या, पत्रके, नाटके लिहिली. यांशिवाय तिने संगीतही रचले. शारिएरचा अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी पत्रव्यवहार सांधला होता. तिला तिच्या काळातील समाजकारण आणि राजकारणात खूप रस होता. तिने फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात केलेले लेखन महत्वाचे मानले जाते. तिच्या लेखनाचे विषय धर्मातील विसंगतता, कुलीन घराण्यांतील जीवन आणि स्त्रियांची सामाजिक परिस्थिती हे होते.
इसाबेल डी चॅरियर यांनी कादंबऱ्या, पत्रके, नाटके आणि कविता लिहिल्या आणि संगीत दिले. कोलंबियामध्ये अनेक वर्षे राहिल्यानंतरच तिचा सर्वात उत्पादक काळ आला. तिच्या धार्मिक शंका, कुलीनता आणि स्त्रियांचे संगोपन या विषयांमध्ये समाविष्ट होते.
तिची ले नोबल ही पहिली कादंबरी १७६३ मध्ये प्रकाशित झाली. [१] हे कुलीन घराण्यांतील जीवनावरील व्यंग्य होते. ही कादंबरी आधी निनावी प्रसिद्ध झाली पण लवकरच ती शारिएरने लिहिल्याचे उघड झाले. तिच्या पालकांनी कादंबरी विक्रेत्यांकडून काढून घेतली. १७८८ मध्ये तिने नेदरलँड्स, फ्रांस आणि स्वित्झर्लंडमधील राजकीय परिस्थितीबद्दल पत्रके पहिल्यांदा प्रकाशित केली.