इला भट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इला भट
Ela Bhatt with her grandchildren (cropped).jpg
जन्म ७ सप्टेंबर, इ.स. १९३३
अहमदाबाद, गुजरात
निवासस्थान अहमदाबाद, गुजरात
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
जोडीदार रमेश भट
पुरस्कार पद्मश्री (इ.स. १९८५)
पद्मभूषण (इ.स. १९८६)
मॅग्सेसे पुरस्कार (इ.स. १९७७)
इंदिरा गांधी पुरस्कार (इ.स. २०११)

इला रमेश भट (७ सप्टेंबर, इ.स. १९३३) या भारतातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केले आहे.[१]

कार्य[संपादन]

इ.स. १९७२ साली इला भट यांनी असंघटित महिला कामगारांसाठी `सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन' (SEWA सेवा) ही संघटना स्थापन केली.

प्रस्तावित राष्ट्रीय महिला आयोगाची उद्दिष्टे आणि कार्य ठरविण्याची जबाबदारी इला भट यांच्यावर सोपविलेली होती. त्यासाठी त्यांनी भारतभरातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या भेटी घेऊन श्रमशक्ती अहवाल तयार केला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Bhatt, Ela Ramesh : CITATION" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2013-12-21. २६ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)