इरोम चानु शर्मिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इरोम चानु शर्मिला ह्या मणिपूर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय कार्यकर्त्या तसेच कवी आहेत. मणिपूर राज्याच्या दहशतवादी लोकांच्या कृत्यांमुळे अशांत झालेल्या प्रदेशात सैन्याला विशेष हक्क देणारा कायदा(आफस्पा) आहे. तो मागे घेण्यात यावा या मागणीसाठी शर्मिला २ नोव्हेंबर २००० पासून उपोषण करीत आहेत. सलग १३ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम चानु शर्मिला या जगातील सर्वात जास्त काळ उपोषण करणाऱ्या व्यक्ती आहेत. गेली १२ वर्षे शर्मिला यांना नाकातून अन्न दिले जात आहे. त्यांना मणिपूरची "आयर्न लेडी' म्हणून ओळखले जाते.

संदर्भ[संपादन]